चालू घडामोडी : ०६ जानेवारी २०२०
Current Affairs 06 january 2020
प्रशांत जगपात व नितीन पवारला सुवर्णपदक
हाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि पुण्यातील अमनोरा टाऊनशीपचे विकसक असलेल्या सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे आयोजित 63 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत माती विभागात सोलापूरचा प्रशांत जगपात (86 किलो) व कोल्हापूर शहराचा नितीन पवार (70 किलो) यांनी सुवर्णपदके पटकावले.
म्हाळुंगे- बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकूल येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत हे अतीतटीचे सामने रंगले होते. यात सोलापूरचा प्रशांत जगपात (86 किलो) व कोल्हापूर शहराचा नितीन पवार (70 किलो) यांनी सुवर्णपदक पटकावले. आज 70 व 86 किलो वजनी गटातील माती विभागातील अंतिम फेरीचे सामने पार पडले. यात 86 किलो वजनी गटात माती विभागात सोलापूरच्या प्रशांत जगताप याने अहमदनगरच्या आकाश भिंगारेला 8-2 गुणांनी पराभूत करत सुवर्णपदक पटकावले. प्रशांत हा वयाच्या 22 व्या वर्षी प्रथमच महाराष्ट्र केसरी वजनी गट स्पर्धेतीत सहभागी झाला आणि पहिल्याच वर्षी सुवर्णपदकावर त्याने आपली मोहर उमटविली.
बेन स्टोक्सचा क्षेत्ररक्षणात विक्रम
एका डावात सर्वाधिक वेळा पाच झेल टिपणारा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स हा इंग्लंडचा पहिला खेळाडू ठरला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर त्याने ऑनरिख नॉर्कीएचा झेल टिपला. दुसऱ्या स्लिपमध्ये स्टोक्सने हे पाचही झेल टिपले.
तर इंग्लंडच्या 1019 सामन्यांमध्ये एका डावात चार झेल टिपण्याची किमया 23 वेळा घडली आहे.
जागतिक कसोटी सामन्यांमध्ये पाच झेल पकडणारा स्टोक्स हा 11वा खेळाडू आहे. अलीकडेच ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने एका डावात पाच झेल टिपले होते.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन सहा दिवस उलटून गेल्यानंतर अखेर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली असून मंत्री व राज्यमंत्री यांच्यातील खातेवाटप पुढीलप्रमाणे आहे.
मंत्री :उद्धव बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री
सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय, व इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमुन न दिलेले विषय/खाती
अजित अनंतराव पवार,उप मुख्यमंत्री
वित्त, नियोजन
सुभाष राजाराम देसाई
उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा
अशोक शंकरराव चव्हाण
सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम वगळून)
छगन चंद्रकांत भुजबळ
-अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील
कामगार, राज्य उत्पादन शुल्क
जयंत राजाराम पाटील
जलसंपदा व लाभक्षेत्र विकास
नवाब मोहम्मद इस्लाम मलिक
अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता
अनिल वसंतराव देशमुख
गृह
विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
महसूल
राजेंद्र भास्करराव शिंगणे
अन्न व औषध प्रशासन
राजेश अंकुशराव टोपे
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
हसन मियालाल मुश्रीफ
ग्राम विकास
नितीन काशिनाथ राऊत
उर्जा
वर्षा एकनाथ गायकवाड
शालेय शिक्षण
जितेंद्र सतिश आव्हाड
गृहनिर्माण
एकनाथ संभाजी शिंदे
नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
सुनिल छत्रपाल केदार
पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण
विजय वडेट्टीवार
इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भुकंप पुनर्वसन
अमित विलासराव देशमुख
वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य
उदय रविंद्र सामंत
उच्च व तंत्र शिक्षण
दादाजी दगडू भुसे
कृषि, माजी सैनिक कल्याण
संजय दुलिचंद राठोड
वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन
लाबराव रघुनाथ पाटील
पाणी पुरवठा व स्वच्छता
के.सी. पाडवी
आदिवासी विकास
संदिपानराव आसाराम भुमरे
रोजगार हमी, फलोत्पादन
बाळासाहेब उर्फ श्यामराव पांडुरंग पाटील
सहकार, पणन
अनिल दत्तात्रय परब
परिवहन, संसदीय कार्य
अस्लम रमजान अली शेख
वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास
यशोमती ठाकूर (सोनवने)
महिला व बालविकास
शंकराराव यशवंतराव गडाख
मृद व जलसंधारण
धनंजय पंडितराव मुंडे
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
आदित्य उद्धव ठाकरे
पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार
राज्यमंत्री
अब्दुल नबी सत्तार
महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य
सतेज उर्फ बंटी डी. पाटील
गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण
शंभुराज शिवाजीराव देसाई
गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन
ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू
जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार
दत्तात्रय विठोबा भरणे
सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन
विश्वजीत पतंगराव कदम
सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा
राजेंद्र श्यामगोंडा पाटील यड्रावकर
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य
संजय बाबुराव बनसोडे
पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य
प्राजक्त प्रसादराव तनपुरे
नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन
आदिती सुनिल तटकरे
उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क.
कीर्तन महोत्सवात ८३६ मुलींचा नामकरण सोहळा; आंतरराष्ट्रीय नोंद
चिमुकल्या मुलींचे इवल्याशा डोळ्यांनी कुतूहलपणे पाळण्यातील रंगीबेरंगी फुग्यांकडे पाहणे, ते धरण्यासाठी हात उंचावणे.. जवळच फेटा बांधून उभ्या असलेल्या आई, आत्यांकडे एक नजर फिरवणे, यासह सोबतीला कानावर पडणाऱ्या बारशाच्या गितांचा मंजूळ आवाज व नातेवाईकांना वाटली जाणारी मिठाई अशा उत्साही वातावरणात एकाचवेळी ८३६ मुलींच्या नामकरणाचा सोहळा बीडमधील कीर्तन महोत्सवात रविवारी रंगला. स्त्री भ्रूण हत्येचा डाग लागलेल्या जिल्ह्यत असे चित्र आशादायी वाटत होते. या अभूतपूर्व नामकरण सोहळ्याने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद केली आहे.