Current Affairs : 06 January 2021
भारतामधील सर्वात आनंदी शहरांच्या यादीची घोषणा
भारतामधील सर्वात आनंदी शहरांच्या यादीची घोषणा करण्यात आली आहे.
‘इंडियन सिटीज हॅपीनेस रिपोर्ट २०२०’च्या या यादीमधील देशातील सर्वाधिक आनंदी शहरांपैकी अव्वल २५ शहरांमध्ये महाराष्ट्रातील तीन शहरे आहेत.
या यादीमध्ये देशातील सर्वात आनंदी असणाऱ्या ३४ शहरांची यादी देण्यात आली आहे. प्राध्यापक राजेश पिल्लानिया यांनी ऑक्टोबर २०२० ते नोव्हेंबर २०२० दरम्यान देशभरातील वेगवेगळ्या शहरांमधील १३ हजारहून अधिक जणांचे सर्वेक्षण करुन ही यादी तयार केली आहे.
देशातील सर्वात आनंदी शहरांच्या यादीमध्ये लुधियाना, अहमदाबाद आणि चंदिगड ही तीन शहरे अव्वल स्थानी आहेत. तर टू टीयर सीटींच्या यादीमध्ये अहमदाबाद, हैदराबाद आणि नवी दिल्ली ही शहरे सर्वाधिक आनंदी शहरे ठरली आहेत.
त्याचप्रमाणे टू-टीयर सिटींच्या यादीत लुधियाना, चंदिगड आणि सुरत या तीन शहरांनी बाजी मारली आहे. वयोमान, शिक्षण, कमाई आणि एकंदरीत एखाद्या शहरात राहताना मिळणाऱ्या सुखसोयी तसेच जीवनशैली यांच्या आधारे ही यादी तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मोठ्या शहरांमध्ये अविवाहित नागरिक हे विवाहितांपेक्षा अधिक आनंदी असल्याचेही या सर्वेक्षणात दिसून आलं आहे.
महाराष्ट्रामधील तीन शहरांचा या यादीमध्ये समावेश आहे. राज्याची संस्कृतिक राजधानी असणारं पुणे शहर या यादीत १२ व्या स्थानी आहे. राज्याची उपराजधानी असणारं नागपूर शहर १७ व्या स्थानी तर राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई २१ व्या स्थानी आहे. सर्वाधिक आनंदी शहरांच्या यादीमध्ये गुजरातमधील अनेक शहरांचा समावेश आहे.
अॅलिस भारतातील नवे ब्रिटिश उच्चायुक्त
अॅलेक्झांडर अॅलिस यांना भारतातील नवे ब्रिटिश उच्चायुक्त करण्यात आले आहे.
५३ वर्षांचे अॅलिस उपराष्ट्रीय संरक्षण सल्लागार तसेच युरोपीय संघातून बाहेर पडण्यासाठी स्थापन केलेल्या विभागात महासंचालक होते.
कराटेपटू रोहित भोरे यांची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन यांच्या 2020 च्या पुस्तकामध्ये कराटेपटू रोहित भोरे यांची नोंद झाली आहे.
तर याची दखल घेऊन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, यांनी त्याचे अभिनंदन करुन भोरे यांना प्रमाणपत्र दिले आहे.
सन 2018 व 2019 वर्षा मध्ये पाच हजारपेक्षा अधिक बृहन्मुंबई महानगरपालिका (बी.एम.सी) मॅनिंग मोपिंग स्वच्छता कामगारांना फिटनेस, नैराश्य व चिंतामुक्त, नशा मुक्ती, सेल्फ डिफेन्स, योग्य आहार करीता दिलेले प्रशिक्षणसाठी त्याचबरोबर 800 पेक्षा अधिक शालेय, महाविद्यालय मुलींना, अनाथ मुले, मुलींना मोफत कराटे मार्शल आर्ट या कलेचे प्रशिक्षण दिल्या बदल.
तसेच कराटे या क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट असे राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय, आशिया, विश्व् व लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स करून महाराष्ट्र राज्याचे व भारत देशाचे नाव कराटे क्रीडा प्रकारात उंचावल्याबद्दल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन यांनी 2020च्या पुस्तकामध्ये रोहित भोरे यांच्या नावाची नोंद ही “कराटे एक्स्पर्ट” म्हणून केलेली आहे.