⁠
Uncategorized

चालू घडामोडी : ०६ जुलै २०२०

Current Affairs 06 July 2020

जगातील सर्वात मोठे १० हजार खाटांचे कोविड सेंटर दिल्लीत

  • दिल्लीतील छतरपूर भागात १००० बेडच्या सरदार वल्लभभाई पटेल कोविड रुग्णालयाचे उद्घाटन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांनी केले. याची उभारणी भारतीय संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) केली आहे. यातील वॉर्डांना गलवानमधील शहीद जवानांची नावे दिली अाहेत.
  • कोरोनाचे हे जगातील सर्वात मोठे रुग्णालय आहे. या सेंटरमध्ये लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्यांवर उपचार केले जातील.
  • येथे व्हेंटिलेटरऐवजी ऑक्सिजनची सुविधा आहे. ती १,००० बेडसाठी उपलब्ध होऊ शकते. येथे लक्षणे असलेले, परंतु घरी क्वॉरंटाइनची सुविधा नसलेल्या रुग्णांवरही उपचार केले जातील. या सेंटरची जबाबदारी आयटीबीपी आणि सीआरपीएफ कर्मचाऱ्यांवर आहे.

जर्मन चषक फुटबॉल स्पर्धा : बायर्न म्युनिकचे विक्रमी विजेतेपद

Untitled 19 2
  • बुंडेसलिगापाठोपाठ बायर्न म्युनिकने जर्मन चषक फुटबॉल स्पर्धेचे विक्रमी विजेतेपद पटकावले. बायर्न म्युनिकने अंतिम लढतीत बायर लेव्हरक्युसेनला ४-२ असे नमवले.
  • रॉबर्ट लेवानडोस्कीच्या दोन गोलांसह डेव्हिड अल्बा आणि सर्जी नाब्री यांनी प्रत्येकी एक गोल केला. लेवानडोस्कीने याबरोबरच हंगामातील एकूण गोलांची संख्या ५० वर नेली. बायर्न म्युनिकचे हे जर्मन लीगचे २० वे विजेतेपद ठरले. ऑगस्टमध्ये चॅँपियन्स लीग जिंकून एका हंगामात तीन जेतेपदे पटकवण्याचा बायर्नचा प्रयत्न असेल.
  • बायर्न म्युनिकच्या घरच्या मैदानात एरवी ७५ हजार प्रेक्षकांची क्षमता आहे. मात्र प्रेक्षकांशिवाय लढती खेळण्यात येत असताना जर्मन चषकाच्या अंतिम लढतीत अवघ्या ६९१ जणांना प्रवेश देण्यात आला होता.
  • त्यात जर्मन फुटबॉल संघाचे प्रशिक्षक जोकीम ल्यू यांचा समावेश होता. सप्टेंबरमध्ये नव्या हंगामाची सुरुवात होईल तेव्हा काही मोजक्या प्रेक्षकांना प्रवेश देण्याचा जर्मन फुटबॉल अधिकाऱ्यांचा विचार आहे.

आकाश भारताचा ६६ वा ग्रँडमास्टर

Untitled 25 2
  • तमिळनाडूचा जी. आकाश भारताचा ६६वा ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू ठरला आहे. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाकडून (फिडे) ग्रँडमास्टर म्हणून आकाशच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
  • चेन्नईच्या आकाशचे ‘फिडे’ क्रमवारीत २४९५ रेटिंग आहे. ‘‘भारताच्या ग्रँडमास्टरच्या यादीत मला स्थान मिळाले याचा अभिमान आहे.
  • यापुढेही मेहनत घेणार असून लवकरच २६०० रेटिंग करायचे आहे. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करायचे असल्याने बुद्धिबळ काही महिने खेळत नव्हतो.

जून महिन्यात जेएनपीटीद्वारे ८९ टक्के निर्यात

coronavirus: 89% exports by JNPT in June | coronavirus: जून महिन्यात जेएनपीटीद्वारे ८९ टक्के निर्यात 
  • कोरोनाच्या प्रकोपामुळे लॉकडाऊन झालेले असतानाही जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टला (जेएनपीटी) गतवर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत यंदाच्या जून महिन्यात ८९ टक्के निर्यात करण्यात यश आले आहे.
  • जागतिक बाजारपेठेतील पुरवठा साखळी कायम ठेवण्यामध्ये याचा मोठा लाभ होत आहे. जेएनपीटी हे देशातील महत्त्वाचे कंटेनर हाताळणी केले जाणारे बंदर आहे. जेएनपीटी बंदराद्वारे २ लाख ८९ हजार २९२ टीईयूची हाताळणी करण्यात आली आहे.
  • ही कामगिरी मे २०२०च्या तुलनेत ५.२९ टक्के अधिक आहे. जून महिन्यात १६६ मालवाहू जहाजे जेएनपीटीमध्ये आली. याद्वारे एकूण ४.०७ दशलक्ष टन मालाची हाताळणी करण्यात आली. रेल्वे आॅपरेशनमध्ये एकूण ५११ रेक्सची वाहतूक करण्यात आली.

जगातलं तिसरं मोठं क्रिकेट मैदानही भारतात

rAJASTHAN sTADIUM
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येत्या काही वर्षांमध्ये भारतीय क्रिकेटचं महत्व अधिक अधोरेखित होणार आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानाला मागे टाकत अहमदाबाद येथे जगातलं सर्वात मोठं क्रिकेट मैदान काही महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलं.
  • या मैदानात १ लाखांपेक्षा जास्त प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. मेलबर्नच्या मैदानाची प्रेक्षकक्षमता ही ८० हजार एवढी आहे.
  • यानंतर जगातलं तिसरं मोठं क्रिकेट मैदानही भारतात तयार होणार आहे. राजस्थान क्रिकेट असोसिएशनने याबद्दलची घोषणा केली असून, या मैदानाची क्षमता ७५ हजार एवढी असणार आहे.
  • या मैदानासाठी जयपूर जवळील चौम्प गावाजवळ जमीन निश्चीत करण्यात आलेली असून, सुमारे १०० एकर जमिनीवर हे मैदान उभारलं जाणार आहे.

Related Articles

Back to top button