चालू घडामोडी : ०६ सप्टेंबर २०२०
Current Affairs : 06 September 2020
Ease of doing business : आंध्र प्रदेशचं पहिलं स्थान कायम
देशांतर्गत आणि जागतिक गुंतवणुकदारांना आकर्षित करणं, व्यावसायिक परिस्थितीत सुधारणा आणणं आणि राज्यांमध्ये स्पर्धा निर्णाण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ईज ऑफ डुईंग बिझनेसची रँकिंग जाहीर करण्यात आलं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे रँकिंग जाहीर केलं.
यामध्ये सलग दुसऱ्या वर्षीही आंध्र प्रदेशनं आपलं स्थान कायम ठेवलं आहे. तर उत्तर प्रदेशनंही मोठी झेप घेत दुसरं स्थान मिळवलं असून तेलंगणला तिसरं स्थान देण्यात आलं आहे.
२०१८ मध्येही अशाप्रकारचं रँकिंग जाहीर करण्यात आलं होतं.
या यादीत चौथ्या स्थानावर मध्यप्रदेश, पाचव्या स्थानावर झारखंड, सहाव्या स्थानावर छत्तीसगढ, सातव्यावर हिमाचल प्रदेश आणि आठव्या स्थानावर राजस्थान ही राज्ये आहेत.
उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या राज्यांनी यादीत मोठी झेप घेतली आहे.
गेल्या वर्षी उत्तर प्रदेश बाराव्या तर स्थानावर तर हिमाचल प्रदेश सोळाव्या स्थानावर होते. २०१५ पासून आतापर्यंत रँकिंगमध्ये सर्वाधिक सुधारणा आणण्यात लक्षदीप सर्वात पुढे आहे.
२०१५ मध्ये लक्षद्वीप ३३ व्या स्थानावर होते. परंतु यावर्षी लक्षद्वीपनं १५ व्या स्थानावर उडी घेतली आहे. तर दिव-दमण आणि उत्तराखंडनंही १२ स्थानांची झेप घेतली आहे.
डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धा : मो फराह, हसन यांचे विक्रम
चार वेळा ऑलिम्पिक विजेतेपद पटकावणाऱ्या मो फराह आणि नेदरलँड्सची सिफान हसन यांनी डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत दमदार कामगिरी करत एक तासाच्या शर्यतीत नव्या विक्रमांची नोंद केली.
रिकाम्या स्टेडियममध्ये ब्रिटनच्या फराहने पुनरागमन करताना एक तासामध्ये २१,३३० मीटरचे अंतर पार के ले. त्याने इथियोपियाच्या हायले गेब्रसेलासी याने रचलेला २१,२८५ मीटरचा विक्रम मोडीत काढला.
फराहने २०१७ मध्ये रस्त्यावरील शर्यतीत भाग घेणे थांबवले होते, पण पुढील वर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये १० हजार मीटरचे जेतेपद कायम राखण्यासाठी त्याने पुनरागमनचा निर्णय घेतला.
सिफान हसनने महिलांच्या शर्यतीत १८,९३० मीटर इतके अंतर पार करत नवा विक्रम प्रस्थापित के ला. तिने २००८ मध्ये डायर टय़ूनने रचलेला १८,५१७ मीटरचा विक्रम मोडला.
महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान
अहमदनगर जिल्ह्यातील गोपाळवाडी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक नारायण मंगलाराम आणि मुंबई येथील भाभा अणुशक्तीकेंद्र शाळेच्या शिक्षिका संगीता सोहनी यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त कोवीड19 च्या पार्श्वभूमीवर दूरदृष्य प्रणालीद्वारे ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार- 2020’ चे वितरण करण्यात आले.
देशाच्या विविध भागातून या कार्यक्रमात सहभागी 47 शिक्षकांना उल्लेखनीय योगदानासाठी विविध श्रेणीमध्ये गौरविण्यात आले. महाराष्ट्रातील दोघा शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला.