Current Affairs 07 April 2020
जेम्स बॉण्ड सीरिजमधील ‘बॉण्डगर्ल’ ऑनर ब्लॅकमॅनचं निधन
जेम्स बॉण्ड सीरिजमधील ‘गोल्डफिंगर’ यातील बॉण्ड गर्ल अर्थात अभिनेत्री ऑनर ब्लॅकमॅन हिचं निधन झालं आहे.
मनोरंजन क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय ‘जेम्स बॉण्ड’ या व्यक्तिरेखेवर आधारित अनेक चित्रपट आणि सीरिजची निर्मिती करण्यात आली आहे. या सीरिजमधील जेम्स बॉण्ड हे पात्र जसं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतं. त्याचप्रमाणे यातील ‘बॉण्डगर्ल’ची देखील चाहत्यांमध्ये क्रेझ आहे.
पंतप्रधान, मंत्र्यांच्या पगारात कपात
पंतप्रधान, केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, तसेच खासदारांच्या वार्षिक वेतनात ३० टक्के कपात करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि सर्व राज्यपाल यांनी स्वत:हून वार्षिक ३० टक्के वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
टाळेबंदीनंतर ‘हॉटस्पॉट’चे विभाग वगळून उर्वरित विभागांना कसे सुरू करता येईल, याचा आराखडा करण्याचे आदेशही पंतप्रधानांनी दिले आहेत.
पगारातील कपातीचा निर्णय बारा महिन्यांसाठी (आर्थिक वर्ष २०२०-२१) असून त्यासंदर्भातील अध्यादेशाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. खासदार निधीतून होणाऱ्या योजनाही पुढील दोन वर्षांसाठी (२०२०-२१ व २०२१-२२) स्थगित करण्यात आल्या आहेत. ७,९०० कोटींचा खासदार निधी तसेच, ३० टक्के वेतन सरकारच्या एकात्मिक फंडात जमा केले जाणार असल्याचे केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेसाठी भारताची दावेदारी
२०२७ साली एएफसी आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेच्या यजमानपदाचे हक्क मिळवण्यासाठी भारताने आपली निविदा सादर केली आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) अधिकृतपणे याबाबतची घोषणा केली आहे.
भारताने ही बोली जिंकल्यास, आशिया खंडातील प्रतिष्ठेची समजली जाणारी ही स्पर्धा भारतात पहिल्यांदाच आयोजित केली जाईल. ‘‘ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, असे आम्ही आशियाई फुटबॉल महासंघाला (एएफसी) आम्ही कळवले आहे.
भारताने तीन वेळा ही स्पर्धा जिंकली आहे, पण एकदाही या स्पर्धेचे आयोजन के ले नाही. २०२७च्या आशियाई चषकासाठी उत्सुक असलेला भारत हा पहिला देश ठरला आहे.
भारताने २०२३च्या ‘एएफसी’ आशियाई स्पर्धेच्या यजमानपदासाठी थायलंड, इंडोनेशिया आणि दक्षिण कोरियासह बोली लावली होती, पण ऑक्टोबर २०१८ मध्ये भारताने माघार घेतली. त्यानंतर थायलंड आणि दक्षिण कोरियानेही माघार घेतल्यामुळे या शर्यतीत चीन हा एकमेव देश राहिला होता.
आता २०२७च्या ‘एएफसी’ आशियाई चषकाच्या आयोजनासाठी भारतासह दक्षिण कोरियाही शर्यतीत असण्याची शक्यता आहे. भारताने आतापर्यंत २०१७च्या कुमार विश्वचषक तसेच २०२०च्या कुमारी विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदाचे हक्क मिळवले आहेत. तसेच २०२२ मध्ये महिलांच्या ‘एएफसी’ आशियाई चषकाचे यजमानपदही भारताने मिळवले आहेत.
देशात प्रथमच पुण्यात संजीवनी मोबाइल वाहनाचा प्रयोग
पुणे पोलिस आयुक्तालयाने देशामध्ये प्रथमच बंदोबस्तावरील पोलिस कर्मचाऱ्यांसाठी मोबाइल मिस्टिंग सॅनिटायझेशन वाहन ही सुविधा अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्या संकल्पनेतून उपलब्ध करण्यात आली.
सदर सुविधा ही बसवण्यासाठी पुणे पोलिस मोटार परिवहन विभागामधील वाहनाचा उपयोग करण्यात आला आहे. सदर गाडीमध्ये प्रेशर फॉगिंग सिस्टिम वापरण्यात आली आहे. सदर गाडीमध्ये कर्मचारी ६ ते ७ सेकंदांसाठी उभे राहिल्यास निर्जंतुकीकरण होऊन त्याचा परिणाम काही तासांसाठी राहतो. या वाहनाद्वारे कर्तव्यास ज्या ठिकाणी पोलिस कर्मचारी कामास असतील त्या ठिकाणी जाऊन ही सुविधा देण्यास मदत होईल. भारतात पुणे पोलिसांनी प्रथमच संजीवनी वाहनाचा असा प्रयोग केला आहे.
अमेरिकेकडून भारताला २९ लाख डॉलरची मदत
अमेरिकेने आपल्या यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (यूएसएड) या एजन्सीमार्फत भारताला ‘करोना’चा सामना करण्यासाठी २९ लाख डॉलरची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
‘यूएसएड’ ही जागतिक पातळीवरील आघाडीची संस्था आहे. त्यामुळे भारताला मिळणाऱ्या या मदतीमुळे ‘करोना’विरोधात सुरू असलेल्या प्रयत्नांना निश्चितच बळ मिळणार आहे,’ असेही केनेथ जेस्टर यांनी म्हटले आहे.