Current Affairs 07 December 2019
‘पॉक्सो’ गुन्हेगारांचा दयेच्या अर्जाचा अधिकार काढून घ्यावा- राष्ट्रपती
महिलांवरच्या राक्षसी हल्ल्यांमुळे देशाच्या विवेकालाच हादरा बसला आहे त्यामुळे ज्यांना पॉक्सो कायद्याखाली दोषी ठरवण्यात आले आहे त्यांचा दयेच्या अर्जाचा (याचिकेचा) अधिकार काढून घेतला पाहिजे, असे मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले. देशातील महिला अत्याचाराच्या घटनांवर त्यांनी जळजळीत भाष्य करताना ठोस संदेश दिला.
अशा आरोपींचा दयेच्या अर्जाचा अधिकार नाकारायचा की नाही याचा निर्णय संसदेने घ्यायचा आहे, त्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागेल. पण आमचा सर्वाचा विचार आता त्या दिशेने आहे, असे त्यांनी माउंट अबू येथे महिला सुरक्षेवर आयोजित कार्यक्रमात सांगितले.
दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा : भारताची ४१ पदकांची कमाई
दक्षिण आशियाई क्रीडा स्पध्रेच्या पाचव्या दिवशी शुक्रवारी भारताने एकूण ४१ पदकांची कमाई करीत अग्रस्थान कायम राखतानाच यजमान नेपाळपासूनचे अंतरही वाढवले आहे. भारताने १९ सुवर्ण, १८ रौप्य आणि चार कांस्यपदकांची भर घातली. आता भारताच्या खात्यावर ८१ सुवर्ण, ५९ रौप्य आणि २५ कांस्य अशी एकूण १६५ पदके जमा आहेत. दुसऱ्या स्थानावरील नेपाळच्या खात्यावर ११६ पदके (४१ सुवर्ण, २७ रौप्य, ४८ कांस्य) जमा आहेत. शुक्रवारी बॅडमिंटनपटूंनी चार सुवर्णपदकांची कमाई करीत वर्चस्व गाजवले.
साहित्य संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला प्रकाशकाचा सन्मान
यंदा ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे १० ते १२ जानेवारी दरम्यान होत आहे. दर वर्षी संमेलनामध्ये एक प्रकाशक आणि एका साहित्यिकाचा विशेष सन्मान केला जातो. साहित्य संमेलनाच्या ९३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला प्रकाशकाचा सन्मान केला जाणार आहे. शब्दालय प्रकाशनाच्या सुमती लांडे यांना संमेलनात गौरवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण साहित्यिक भास्कर चंदनशिव यांचाही सन्मान होणार आहे.
पत्रकारांना परदेशी एजंट घोषित केलं जाणार; रशियन सरकारचा निर्णय
मुक्त पत्रकार आणि ब्लॉगर्सना परदेशी एजंट घोषित करण्याच्या प्रस्तावाला रशियन सरकारनं मंजुरी दिली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी याबद्दलच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केल्यानंतर देशात एकच गदारोळ झाला.
नव्या कायद्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांना माध्यम आणि सरकारी संघटनांना परदेशी एजंट घोषित करण्याचे अधिकार मिळाले आहेत. हा नवा कायदा तत्काळ लागू करण्यात आल्याची माहिती रशियन सरकारनं संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. राजकारणात सहभाग घेणाऱ्या आणि परदेशातून पैसे स्वीकारणाऱ्यांना नव्या कायद्यामुळे परदेशी एजंट परदेशी एजंट घोषित करता येऊ शकतं. सरकारी यंत्रणेनं एखाद्या व्यक्तीला परदेशी एजंट ठरवल्यास त्या व्यक्तीला निर्दोषत्व सिद्ध करणारी कागदपत्रं द्यावी लागतील किंवा दंड भरावा लागेल.
पाश्चिमात्य देश आमच्या पत्रकारांना परदेशी एजंट ठरवतात. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी हा कायदा मंजूर केल्याचं रशियन सरकारकडून सांगण्यात आलं आहे. २०१७ मध्ये रशियानं पहिल्यांदा अशा प्रकारचा कायदा केला होता. त्यावेळी आरटी टेलिव्हिजनला अमेरिकेनं परदेशी एजंट घोषित केलं होतं.
अझीम प्रेमजी ठरले आशियातील सर्वात मोठे दानशूर व्यक्ती
विप्रो कंपनीचे एके काळचे प्रमुख अझीम प्रेमजी हे आशियातील सर्वात दानशूर व्यक्ती ठरले. फोर्ब्ज मासिकाने आशियातील ३0 दानशूर व्यक्तींची यादी प्रकाशित केली असून, त्यात प्रथमच स्थानावर अझीझ प्रेमजी आहेत.
या ३0 दानशूरांच्या यादीत भारतातील किरण मजुमदार-शॉ, त्यांचे पती जॉन शॉ व हेक्सावेअर टेक्नॉलॉजीचे संस्थापक व चेअरमन अतुल निशार यांचीही नावे आहेत.
बायकॉन लिमिटेडच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक किरण मजुमदार शॉ व त्यांचे पती जॉन शॉ यांनी युनिव्हर्सिटी आॅफ ग्लासगोला ५३ कोटी ४५ हजार लाखांची देणगी दिली.