Current Affairs 07 February 2022
भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन
वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला करोनाची लागण झाली होती. त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर २८ जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आलं होतं. मात्र ५ फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. पण उपचादारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

लता मंगेशकर यांचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील नोंदवले गेले होते. इतिहासात सर्वाधिक रेकॉर्ड केलेल्या गाण्यांचा विक्रम त्याच्या नावावर आहे.
१९७४ मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने आपल्या एडिशनमध्ये लता मंगेशकर यांना सर्वाधिक गाणी रेकॉर्ड केलेल्या कलाकार म्हणून घोषित केले.
लता मंगेशकर यांचा हा विश्वविक्रम त्यांची धाकटी बहीण आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी मोडला. २०११ मध्ये, सर्वात जास्त गाणी रेकॉर्ड करणारी गायिका म्हणून त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आणि त्यांनी पेक्षा जास्त भाषांमध्ये ११,००० सोलो, युगल आणि कोरस गाणी गायली असल्याचे अधिकृतपणे नोंदवले गेले आहे. मात्र, आता हे शीर्षक दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील गायिका पुलपाका सुशीला यांच्या नावावर नोंदवण्यात आले आहे.
लता मंगेशकर यांना भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार आणि लीजन ऑफ ऑनर यासह अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले.
भारत सरकारचे पुरस्कार
१९६९ – पद्मभूषण
१९८९ – दादासाहेब फाळके पुरस्कार
१९९९ – पद्मविभूषण
2001 – भारतरत्न
2008 – भारताच्या स्वातंत्र्याच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त “वन टाइम अवॉर्ड फॉर लाइफटाइम अचिव्हमेंट”
महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार
1997 – महाराष्ट्र भूषण पुरस्कार
2001 – महाराष्ट्र रत्न (प्रथम प्राप्तकर्ता)
U19 World Cup 2022 : भारत पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन

भारत पाचव्यांदा अंडर १९ विश्वविजेता बनला आहे.
भारताने अंतिम सामन्यात इंग्लंडला हरवत पाचव्यांदा अंडर १९ क्रिकेट वर्ल्डकप पटकावला. अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा चार विकेट्स राखून पराभव केला.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारताच्या या विश्वविजेत्या खेळाडूंसाठी आणि सपोर्ट स्टाफसाठी बक्षिसांची घोषणा केली आहे. वर्ल्डकपविजेत्या प्रत्येक खेळाडूला ४० लाख आणि सपोर्ट स्टाफच्या प्रत्येक सदस्याला २५ लाखाचे बक्षीस जय शाह यांनी जाहीर केले आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज राज बावाने घातक गोलंदाजी करत इंग्लंडच्या टॉप ऑर्डरला उद्ध्वस्त केले. या विश्वचषकात बावा एक महान अष्टपैलू खेळाडू म्हणून उदयास आला आहे. राज बावाला सामनावीर घोषित करण्यात आले.
कर्णधार : यश धुल
काश्मीर खोऱ्यातील मतदारसंघांत फेरबदल; पुनर्रचनेबाबतचा सीमांकन आयोगाचा अहवाल तयार

सर्वोच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र व राज्य निवडणूक आयुक्त के. के. शर्मा यांचा समावेश असलेला हा आयोग ६ मार्च २०२० रोजी स्थापन करण्यात आला होता.
जम्मू भागातील राजौरी आणि पूंछ यांचा समावेश करून अनंतनाग लोकसभा मतदारसंघाची फेररचना करण्याचा, तसेच काश्मीर विभागात फार मोठय़ा प्रमाणावर बदल करण्याचा प्रस्ताव या विस्तृत अहवालाद्वारे देण्यात आला आहे.
हा अहवाल फारूक अब्दुल्ला, हसनैन मसुदी, नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार अकबर लोन, जितेंद्र सिंह आणि भाजपचे खासदार असलेले जुगल किशोर या पाच सहयोगी सदस्यांना पाठवण्यात आला आहे. त्यांना या अहवालाबाबत १४ फेब्रुवारीपर्यंत सूचना पाठवण्यास सांगण्यात आले आहे.