Current Affairs : 07 November 2020
प्रदूषण नियंत्रण समितीअध्यक्षपदी एम. कुट्टी

केंद्र सरकारने दिल्लीचे माजी मुख्य सचिव एम. एम. कुट्टी यांची दिल्ली, एनसीआरमध्ये प्रदूषण रोखण्यासाठी स्थापन झालेल्या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
सरकारने आयआयटी दिल्लीचे प्रो. मुकेश खरे, आयएमडीचे माजी महासंचालक रमेश केजे यांच्यासह नऊ सदस्यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्त्या ३ वर्षांसाठी असतील.
आयसीसी क्रमवारीत कोहली, रोहितची मुसंडी
भारताच्या क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) जागतिक एकदिवसीय क्रमवारीत फलंदाजांमध्ये अव्वल दोन स्थानांवर कायम आहेत.
कोहली (871) अग्रस्थानी असून रोहित (855) दुसऱ्या स्थानावर आहे. करोना साथीमुळे एकदिवसीय क्रिकेट गेल्या सात महिन्यांपासून कोहली आणि रोहितने खेळलेले नाही.
मात्र तरीदेखील अव्वल दोन स्थाने त्यांना राखता आली आहेत.कोहली आणि रोहित वगळता भारताचा एकही फलंदाज अव्वल 10 जणांमध्ये नाही. गोलंदाजांमध्ये भारताचा जसप्रीत बुमरा (719) दुसऱ्या स्थानी कायम आहे.
बुमरा वगळता भारताचा एकही गोलंदाज अव्वल 10 मध्ये नाही.तर ‘आयसीसी’ सांघिक क्रमवारीत इंग्लंड अव्वल स्थानी कायम असून भारत दुसऱ्या स्थानावर आहे.
मारुती चितमपल्ली यांना पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार

महाराष्ट्र पक्षिमित्रतर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, यावर्षीचा पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार मारुती चितमपल्ली यांना जाहीर करण्यात आला. इतर पुरस्कारांमध्ये पक्षी संवर्धन व सुश्रुषा पुरस्कार तांदलवाडी जि. जळगाव येथील उदय सुभाष चौधरी यांना तर पक्षी संशोधन पुरस्कार डॉ. अमोल सुरेश रावणकर, अचलपूर व किरण मोरे, अमरावतीयांना विभागून देण्यात आला आहे. पक्षी जनजागृती पुरस्कार नाशिक येथील सतीश गोगटे यांना जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे २०१९ पासून या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली.
सोलापूरमध्ये होणार पुरस्कार वितरण – यंदाच्या पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनात करण्यात येणार आहे. यावर्षी ३४ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन सोलापूर येथे २०२१ मध्ये आहे. या पुरस्कारांचे वितरण या संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात केले जाणार आहे.
ज्ञानेंद्रो निंगोम्बाम हॉकी इंडियाचे नवे अध्यक्ष

मणिपूरचे ज्ञानेंद्रो निंगोम्बाम हाॅकी इंडियाचे (एचआय) बिनविरोध नवे अध्यक्ष बनले.
त्यांनी मोहंमद मुश्ताक अहमदची जागी घेतली. मुश्ताक यांना वरिष्ठ उपाध्यक्ष बनवले.
निंगोम्बाम नॉर्थ ईस्टचे पहिले व्यक्ती आहेत, ज्यांना ही जबाबदारी मिळाली. ते दोन वर्षे या पदावर राहतील.
२००९ ते २०१४ दरम्यान ते मणिपूर हॉकीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हाेते. मुश्ताक अहमदने पद सोडल्यानंतर त्यांना हंगामी अध्यक्ष बनवण्यात आले होते.
भारतातील सगळ्यात उंच माणूस; 8 फुट उंचीसाठी गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड

भारतात आठ फुट उंची असलेला माणूस आहे. या माणसाने गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सगळ्यात उंच माणसाचा रेकॉर्ड केला आहे.
धर्मेद्र सिंग प्रताप असं या 45 वर्षीय माणसाचं नाव आहे. ते उत्तर प्रदेशचे रहिवासी आहे. त्यांची उंची आठ फुट दोन इंच आहे.
या उंचीमुळे ते भारतातील सगळ्यात उंच माणूस म्हणून ओळखले जातात. नुकताच त्यांच्या उंचीमुळे त्यांनी सर्वात उंच माणसाला गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड देउन सन्मानित केलं आहे.
अमेरिकेतील गॅस कंपनी भारतात गुंतवणूक करणार
अमेरिकेतील गॅस क्षेत्रातील मोठी कंपनी ऐअर प्रॉडक्ट अँड केमिकल्स भारतात पुढील पाच वर्षात पाच ते दहा अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे.
ही कंपनी भारतातील कोल इंडिया आणि इतर कोळसा कंपन्याबरोबर सहकार्य करार करून कोळसा आधारित औद्योगिक गॅस निर्मिती क्षेत्रात अनेक प्रकल्प उभारणार आहे.
या कंपनीच्या जगभरात 750 शाखा आहेत. पन्नास देशात ही कंपनी कार्यरत आहे.
भारतात उद्योगांना लागणाऱ्या विविध वायूची गरज वाढणार आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही भारतामध्ये प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचे या कंपनीचे उपाध्यक्ष रिचर्ड बुकॉक यांनी सांगितले.