Uncategorized
Current Affairs 08 April 2019
मालदीवच्या माजी राष्ट्रपतींचा प्रचंड बहुमताने विजय
- मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद (५१) यांनी दोन तृतीयांश बहुमत मिळवित पुनरागमन केले आहे. या दणदणीत विजयानंतर नशीद यांनी सरकारी भ्रष्टाचार संपवण्याचा आणि सुधारणा करण्याचा संकल्प जाहीर केला.
- झालेल्या संसदीय निवडणुकीत नशीद यांच्या मालदीवियन डेमोक्रेटिक पार्टीने ८७ सदस्यांच्या सभागृहात दोन तृतीयांश बहुमत मिळवले. त्यामुळे हद्दपारी संपवून मायदेशी परतल्यानंतर नशीद यांनी केवळ पाच महिन्यांमध्ये प्रचंड विजय मिळवत संसदेचे सर्वोच्च पद प्राप्त केले आहे.
- नशीद यांच्या प्रचंड विजयामुळे त्यांचे प्रतिस्पर्धी आणि एकाधिकार कारभार करणारे माजी राष्ट्रपती अब्दुल्ला यमीन यांना मतदारांकडून सणसणीत चपराक मिळाली आहे.
‘धनुष’ लष्करात होणार दाखल
- भारतीय बनावटीची आणि पहिली ‘स्वदेशी बोफोर्स’ म्हणून ओळखली जाणारी ‘धनुष’ तोफ लष्करामध्ये दाखल होण्यास सज्ज झाली आहे.दारुगोळा कारखान्याकडून (ओएफबी) लष्कराला ही तोफ देण्यात येईल.
- भाजप सरकारच्या काळात ‘मेक इन इंडिया’ योजनेंतर्गत ‘धनुष’ तोफेची निर्मिती करण्यात आली. या तोफेसाठी जवळपास ८१ टक्के भागांचा पुरवठा देशातूनच झाला आहे.
- १५५मिमी / ४५ कॅलिबर ची ही तोफ आहे. ‘देसी बोफोर्स’ म्हणूनही या तोफेला ओळखले जाते. सर्व प्रकारच्या भूभागामध्ये या तोफेचा वापर होऊ शकतो. ‘इनर्शिअल नेव्हिगेशन बेस्ड् साइटिंग सिस्टीम’, ‘ऑटो लेइंग’ सुविधा, ‘ऑनबोर्ड बॅलिस्टिक कॉम्प्युटेशन’ आणि दिवसा-रात्री तोफा डागण्याच्या यंत्रणेचा यामध्ये समावेश आहे.
लोकसभेच पाहिलं मतदान आयटीबीपीचे डीआयजी सुधाकर नटराजन यांनी केलं
- आयटीबीपीचे डीआयजी (एटीएस) सुधाकर नटराजन यांनी प्रथम मतदान केलं, अशी माहिती आयटीबीपीच्या प्रवक्त्यांनी दिली.
- इंडो-तिबेट पोलीस दलाच्या (ITBP) ८० जवानांनी आज अरुणाचल प्रदेशातील लोहितपूरमध्ये अॅनिमल ट्रेनिंग स्कूलमधील मतदान केंद्रावर पोस्टल बॅलेटद्वारे मतदान केलं.
- अरुणाचल प्रदेशमधील दुर्गम भागात कार्यरत असलेल्या आयटीबीपीच्या दुसऱ्या युनिटमधील जवानही पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
अब होगा न्याय! लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची टॅगलाईन
- गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाची अब की बार मोदी सरकार ही घोषणा चांगलीच गाजली होती. यानंतर आता काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्याय योजनेला केंद्रस्थानी ठेवत ‘अब होगा न्याय’ घोषणा दिली आहे.
- काँग्रेसनं ‘अब होगा न्याय’ घोषणा दिली आहे. किमान उत्पन्न योजनाच काँग्रेसच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी असेल, हे या घोषणेतून काँग्रेसनं अधोरेखित केलं आहे. न्याय योजनेच्या अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 72 हजार रुपये देण्याचं आश्वासन राहुल गांधींनी दिलं आहे. देशातील 20 टक्के लोकांना या योजनेचा लाभ मिळेल, असा दावा त्यांनी केला.
विक्रम किर्लोस्कर सीआयआय अध्यक्षपदी
- किर्लोस्कर सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तसेच, टोयोटा किर्लोस्करचे मोटरचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांची भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) अध्यक्षपदी निवड झाली आहे. महासंघाचे विद्यमान अध्यक्ष राकेश भारती मित्तल यांच्याकडून किर्लोस्कर यांनी सूत्रे स्वीकारली.
- २०१९-२० या आर्थिक वर्षासाठीची नवी कार्यकारिणी सीआयआयने शुक्रवारी घोषित केली. कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक व सीईओ उदय कोटक यांची नियोजित अध्यक्षपदी तर, टाटा स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक टी. व्ही. नरेंद्रन यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. उद्योग महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झालेले विक्रम किर्लोस्कर हे सीआयआयमध्ये तीन दशकांपासून सक्रिय असून ग्लोबल इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी अलायन्स बोर्डच्या (जीआयटीए) स्थापनेपासून (२०१२-१३) ते अध्यक्षपदी आहेत. सीआयआयच्या विविध राष्ट्रीय समित्या व परिषदांचे अध्यक्षस्थान भूषवले आहे.
भारताची १२ पदकांची कमाई
- भारताच्या युवा टेबल टेनिसपटूंनी घाना कनिष्ठ खुल्या टेबल टेनिस स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सात सुवर्ण, तीन रौप्य आणि दोन कांस्यपदके अशी एकूण १२ पदकांची कमाई केली. महाराष्ट्राच्या अनन्या चांदे आणि दिया चितळे यांनी चमकदार कामगिरी करत एकूण नऊ पदके (७ सुवर्ण, १ रौप्य, १ कांस्य) पटकावली.
- दियाने मुलींच्या कनिष्ठ एकेरी गटात पहिले सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर तिने पदकांचा धडाका कायम ठेवला. दियाने मॉरिशसच्या नंदेश्वरी जलीमसह कनिष्ठ दुहेरी आणि सांघिक गटात आणखीन दोन सुवर्णपदकांची कमाई केली.
- अनन्या चांदेने दियापेक्षा अधिक चांगली कामगिरी करत चार सुवर्णपदकांची कमाई केली. तिने मुलींच्या गटात सुवर्णपदक मिळवतआपल्या अभियानाची सुरुवात केली. अनन्याने मागे वळून न पाहता एकापाठोपाठ पदके पटकावली. मुलींच्या कॅडेट एकेरी, दुहेरी आणि सांघिक गटातही तिने सुवर्णपदक पटकावले. अनन्याने कनिष्ठ दुहेरी गटातही इंग्लंडच्या रुबी चॅनसह रौप्यपदक आणि मुलींच्या कनिष्ठ एकेरीत कांस्यपदकाची कमाई केली.