---Advertisement---

चालू घडामोडी : ०८ एप्रिल २०२०

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Current Affairs 08 April 2020

अनुराग श्रीवास्तव परराष्ट्र मंत्रालय प्रवक्ते

भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी अनुराग श्रीवास्तव यांनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणून पदभार स्वीकारला आहे. आयएफएसच्या १९९९ बॅचचे अधिकारी श्रीवास्तव हे ऑस्ट्रियात भारतीय राजदूत नियुक्त झालेले रवीशकुमार यांची जागा घेतील.

Super Moon | वर्षातील सर्वात मोठ्या आणि चमकदार चंद्रांच दर्शन

Super Moon | वर्षातील सर्वात मोठ्या आणि चमकदार चंद्रांच दर्शन; पाहा फोटो

बुधवारी (8 एप्रिल) मध्यरात्री या वर्षातील सर्वात मोठा चंद्र म्हणजेच, सुपर मून पाहायला मिळाला. एवढचं नाही तर चंद्राचा रंग देखील बदललेला पाहायला मिळाला.
भारतात सुपरमून 12 वाजून 10 मिनिटांनी पाहायला मिळाला. हे दृश्य 12 मिनिटांपर्यंत पाहता आलं. यावेळी चंद्र हा पृथ्वीच्या अगदी जवळ आल्यामुळे रात्रीचा चंद्र गुलाबी रंगाचा दिसून आला.
पिंक सुपरमून हे फक्त एक नाव आहे, त्यामागे कोणतेही वैज्ञानिक कारण नाही. अमेरिका आणि कॅनडामध्ये या हंगामात फ्लॉक्स सुबुलाटा नावाच्या फुलाचा बहर येतो, या फुलामुळे आज दिसणाऱ्या चंद्राला पिंक सुपरमून म्हटले जाते. हे फुल गुलाबी रंगाचे असते. त्यामुळे याला मॉस पिंक असे देखील म्हणतात.

न्यूयॉर्कमध्ये भारतीय पत्रकाराचं करोनामुळे निधन

Indian American journalist Brahm Kanchibotla dies of corona

न्यूयॉर्कमध्ये भारतीय वंशााचे पत्रकार ब्रह्म कांचीबोटला यांचं करोनाने निधन झालं आहे. त्यांच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील शोक व्यक्त केला आहे. भारत-अमेरिकेमधील संबंध चांगले निर्माण करण्यात ब्रह्म कांचीबोटला यांचा मोठा वाटा होता असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
ब्रह्म कांचीबोटला हे 66 वर्षांचे होते. ते युनायटेड न्यूज ऑफ इंडियाचे प्रतिनिधी होते. त्यांनी आपल्या 28 वर्षांच्या पत्रकारितेच्या करिअरमध्ये 11वर्ष फायनांन्शियल पब्लिकेशनमध्ये कंटेंट एडिटर म्हणून काम केलं आहे. त्यांनी यानंतर न्यूज इंडिया टाइम्स वीकली मध्ये देखील काम केलं आहे.

स्टेट बँकेने घटवले कर्जदर

SBI Online user? You won't be able to do net banking if you don't ...

भारती स्टेट बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट अर्थात एमसीएलआर ०.३५ टक्क्याने घटवला आहे. यामुळे सर्व प्रकारच्या मुदतीची कर्जे स्वस्त होणार आहेत. नवे कर्जदर १० तारखेपासून लागू होणार आहेत.
एक वर्ष मुदतीच्या कर्जांसाठी व्याजदर ७.७५ टक्क्यांवरून ७.४० टक्क्यांवर आणण्यात आला आहे. जवळजवळ सर्वच प्रकारच्या ग्राहकोपयोगी कर्जांसाठी एक वर्ष मुदतीच्या कर्जाचा दर संदर्भ म्हणून घेतला जातो.
हे नवे कर्जदर लागू झाल्यानंतर एमसीएलआर संलग्न गृहकर्जे स्वस्त होतील. ३० वर्षे मुदतीचे गृहकर्ज एक लाख रुपयांमागे २४ रुपयांनी स्वस्त होईल, असे बँकेने सांगहितले आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now