Current Affairs 08 August 2020
गिरीश चंद्र मुर्मू यांची कॅगपदी नियुक्ती
- गिरीश चंद्र मुर्मू यांची कॅगपदी (Comptroller and Auditor General of India ) नियुक्ती केली आहे.
- केंद्र सरकारनं ३७० कलम रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरचं विभाजन करून केंद्र शासित प्रदेश केला. त्यानंतर गिरीश चंद्र मुर्मू यांची राष्ट्रपतींनी जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालपदी नियुक्ती केली होती. गुजरात केडरचे आयएएस अधिकारी असलेल्या जी.सी. मुर्मू यांनी २९ ऑक्टोबर २०१९ रोजी उपराज्यपालपदाची सूत्रे हाती घेतली होती. उपराज्यपाल पदीचा कारभार हाती घेण्यापूर्वी मुर्मू वाणिज्य मंत्रालयात सचिव पदावर कार्यरत होते.
- त्यांच्या जागेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी माजी केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांची नियुक्ती केली आहे. मुर्मू यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर मुर्मू यांची नियंत्रक व महालेखा परीक्षक (Comptroller and Auditor General of India) पदी नियुक्ती केली आहे. यासंदर्भात आदेशही काढण्यात आला आहे.
- नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना जी.सी. मुर्मू हे प्रधान सचिव म्हणून कार्यरत होते. त्यानंतर आता मुर्मू कॅग म्हणून काम पाहणार आहेत. कॅगचा कार्यकाळ सहा वर्षांचा आहे.
- मात्र, या पदासाठी निवृत्तीचं वय ६५ वर्ष असून, मुर्मू हे केवळ पाच वर्षच पदावर राहू शकतात. कॅग हे घटनात्मक पद असून, केंद्र आणि राज्य सरकारांच्या खात्यांचं लेखा परिक्षण करण्याची जबाबदारी कॅगवर असते. कॅगचा रिपोर्ट संसदेत आणि विधानसभेमध्ये मांडण्यात येतो.
१०० अब्ज डॉलर संपत्ती, झुकेरबर्ग तिसऱ्या स्थानी
- झुकेरबर्ग १०० अब्ज डॉलर्स नेटवर्थ असलेल्या उद्योजकांच्या यादीत सामील झाले.
- फेसबुकचे समभाग ७ टक्क्यांनी वधारत २६६.६ डॉलरवर पोहोचले. ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सनुसार, मार्क यांनी प्रथमच या यादीत स्थान मिळवले आहे. यात जेफ बेजोस आणि बिल गेट्स पूर्वीपासूनच आहेत. मात्र मार्क काही वेळेतच यादीमधून बाहेर पडले.
प्रा. प्रदीपकुमार जोशी यूपीएससीचे अध्यक्ष
- प्रा. प्रदीपकुमार जोशी यांची शुक्रवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) अध्यक्षपदी निवड झाली. ते अरविंद सक्सेना यांची जागा घेतील.
- जोशी यांचा कार्यकाळ १२ मे २०२१ पर्यंत असेल. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष असलेले जोशी मे २०१५ मध्ये यूपीएससीचे सदस्य झाले.