Current Affairs : 08 December 2020
भारतीय वंशाचे अनिल सोनी WHO फाऊंडेशनचे पहिले सीईओ
भारतीय वंशाचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ अनिल सोनी यांना जागतिक आरोग्य संघटना फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्त करण्यात आलं आहे.
आरोग्य विषयक समस्यांना तोंड देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं या जागतिक आरोग्य संघटना फाऊंडेशनची निर्मिती केली आहे. अनिल सोनी हे या संघटनेचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी बनले आहेत.
अनिल सोनी यांच्याकडे १ जानेवारीपासून मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार दिला जाणार आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनं करोना महासाथीच्या दरम्यान मे २०२० मध्ये जागतिक आरोग्य संघटना फाऊंडेशनची सुरूवात केली होती.
आतापर्यंत अनिल सोनी हे ग्लोबव हेल्थकेअर कंपनी वियाट्रिस सोबत कार्यरत होते. ते ‘ग्लोबल इन्फेक्शन डिजिज’चे प्रमुख म्हणून वियाट्रिसमध्ये सेवा बजावत होते.
ओरछा, ग्वाल्हेर शहरांना युनेस्कोचा वारसा दर्जा
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर व ओरछा या ऐतिहासिक शहरांना युनेस्कोच्या जागतिक वारसा शहरांच्या यादीत स्थान मिळाले आहे.
शहरी स्थळ शिल्प प्रवर्गात हा बहुमान मिळाल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना म्हणजे युनेस्कोने या शहरांना वारसा शहरांचा दर्जा दिला. त्यामुळे आता ग्वाल्हेर व ओरछा शहरांची स्थिती बदलणार आहे.
युनेस्को व राज्य सरकारचे पर्यटन खाते या शहरांसाठी सर्वंकष आराखडा तयार करून त्यांचे सौंदर्य वाढवणार आहे.
दक्षिण आशियासाठी आदर्शवत ठरेल असे प्रकल्प यात हाती घेतले जातील.
वारसा यादीत समावेश झाल्यानंतर मानसिंग प्रासाद, गुजरी महाल व सहस्र बाहू मंदिर यावर रासायनिक प्रक्रिया केली जाणार असून तसे केल्याने त्यातील कला जास्त प्रकर्षांने दिसून येणार आहे.
ग्वाल्हेर- ग्वाल्हेरची स्थापना नवव्या शतकात झाली. तेथे गुर्जर प्रतिहार राजवंश, तोमर, बाघेल, कछवाहो, शिंदे घराण्यांचे राज्य होते. त्यांनी ठेवलेल्या स्मृतिखुणा आजही तेथील स्मारके, किल्ले व राजवाडे यात बघायला मिळतात.
ओरछा- हे शहर मंदिरे व राजप्रासादांसाठी प्रसिद्ध आहे. १६ व्या शतकात बुंदेला राजांची ती राजधानी होती. तेथे राजमहाल, जहांगीर महाल, रामराजा महाल, राय प्रवीण महाल व लक्ष्मीनारायण मंदिर आहे.
जेहाननं रचला इतिहास; F2 रेस जिंकणारा पहिला भारतीय ड्राइव्हर ठरला
बहरीन येथे पार पडलेल्या फॉर्मुला टू रेसमध्ये भारताच्या जेहान दारुवाला यानं इतिहास रचला आहे.
साखिर ग्रां. प्री या स्पर्धेत जेहानं यांनं फार्मुटा टू रेस जिंकली आहे. अशी कामगिरी करारा जेहान पहिला भारतीय ठरला आहे.
फॉर्मूला टू विजेता मिक शूमाकर आणि डेनिअल टिकटुम यांच्याविरोधातील लढतीत २२ वर्षीय जेहाननं विजय मिळवला.
रेयो रेसिंगसाठी ड्राइव्हिंग करणाऱ्या जेहानं यानं ग्रीडवर दूसऱ्या क्रमांकानं सुरुवात केली होती.
दुसऱ्या कर्मांकावर जपानी युकी सुनोडा राहिला. जेहान आणि युकी यांच्यामध्ये फक्त ३.५ सेकंदाचं अंतर होतं. गतविजेता टिकटुम तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला.
२१ डिसेंबर रोजी गुरू आणि शनी ३९७ वर्षांनंतर जवळ येतील
गुरू आणि शनी हे सौर यंत्रणेतील सर्वात मोठे ग्रह, ३९७ वर्षांनंतर आकाशात एकमेकांना स्पर्श करताना बघायला मिळतील. हा योगायोग २१ डिसेंबर रोजी पाहायला मिळेल.
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, या दुर्मिळ घटनेत या दोघांमधील आभासी अंतर केवळ ०.०६ अंश असेल.
या दोन्ही चंद्रांना एक डिग्री अंतराने पाहण्याची संधी मिळेल. असा योग नंतर ३७६ वर्षांनंतर येईल. आपण सध्या खुल्या डोळ्यांनी शनी आणि गुरुला आकाशात पाहू शकतो.
शनी चांदीच्या रंगाच्या रिंग्जमध्ये गुंडाळलेला असून त्याचे टायटन आणि रे हे उपग्रहही दिसतील. गुरुचे ४ उपग्रह गायनामिड, कॅलेस्टो, आयओ व युरोपा हेदेखील या वेळी खगाेलप्रेमींना बघायला मिळणार अाहेत.
पहिल्यांदा गॅलिलियो यांनी पाहिली होती ही घटना : महान शास्त्रज्ञ गॅलिलियो गॅलिली यांनी टेलिस्कोप बनवल्यावा १६२३ मध्ये शनी व गुरुला इतक्या जवळून पाहिले होते. दुर्बिणीच्या सुविधेच्या उपलब्धतेमुळे, ग्रह आणि नक्षत्रांसह विश्वाच्या अनेक रहस्यमय व दिशाभूल करणाऱ्या वस्तुस्थितीची सत्यता कळाली. या घटनेची रोचकता आणखीन वाढली आहे कारण ही खगोलशास्त्रीय घटना वर्षाच्या सर्वात छोट्या दिवशी होणार आहे. शास्त्रज्ञांनी या दुर्मिळ घटनेला ‘ग्रेट कंजेक्शन’ असे नाव दिले अाहे.