हवाईदल-इस्रोची अंतराळात मानव पाठविण्यासाठी तयारी सुरू
- अंतराळात मानव पाठविण्याच्या मोहिमेची तयारी सुरू झाली असून, यासाठी इस्रो आणि हवाईदल यांच्यात संयुक्त प्रयत्न सुरू झाले आहेत, अशी माहिती लष्करी वैद्यकीय सेवेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल बिपीन पुरी यांनी दिली.
- लष्करी वैद्यकीय महाविद्यालय (एएफएमसी) तर्फे ६७व्या वार्षिक लष्करी वैद्यकीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात भारतीय लष्कराच्या तिन्ही दलातील वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले आहेत.
- अंतराळ क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकण्यासाठी भारताकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत. अंतराळात मानव पाठविण्याचा पंतप्रधान यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. २०२२ पर्यंत अंतराळात भारतीय मानवाला पाठविण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.
- भारतीय भूमिवरून भारतीय बनावटीच्या यानाने अंतराळवीर अवकाशात पाठविला जाणार आहे. यात अंतराळात मानवी जीवरक्षक प्रणालीवर भर देण्यात येणार आहे. इन्स्टिट्यूटआॅफ एरोस्पेस मेडिसिन या संस्थेकडे यासाठी अत्याधुनिक यंत्रणा असल्याने इस्रोकडून संस्थेची निवड केली आहे.
रिझव्र्ह बँकेची व्याज दरकपात; धोरणातही ‘तटस्थ’तेचा अंगीकार
- कर-दिलासा देणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पानंतर, मध्यमवर्गीय आणि पगारदारांना त्यांचे कर्जाच्या हप्त्यांचा भार हलका करणारे पाऊल रिझव्र्ह बँकेने टाकले. महागाई दर नियंत्रणात राहील या अपेक्षेने रेपो दरात पाव टक्क्यांची कपात करून, मध्यवर्ती बँकेने तो ६.२५ टक्क्यांवर आणल्याने, घर आणि वाहनांसाठी बँकांची कर्जे स्वस्त होण्यास वाव निर्माण झाला आहे.
- नवनियुक्त गव्हर्नर दास यांच्या कार्यकाळातील ही पहिली, तर ऑगस्ट २०१७ नंतर, म्हणजे जवळपास दीड वर्षांच्या अंतराने झालेली रेपो दर कपात आहे.
- वाणिज्य बँका ज्या दराने रिझव्र्ह बँकेकडून निधी मिळवतात, तो रेपो दर आता ०.२५ टक्के कपातीसह ६.२५ टक्क्यांवर आला आहे, तर रिझव्र्ह बँकेद्वारे वाणिज्य बँकांकडून ज्या दराने निधी घेतला जातो, तो रिव्हर्स रेपो दरही पाव टक्के कपातीसह ६ टक्के झाला आहे.
- चालू वर्षांत डिसेंबपर्यंत महागाई दर हा ३.९ टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही, असा सुधारित अंदाजही पतधोरण आढाव्यातून वर्तविला गेला आहे. डिसेंबर २०१८ मध्ये किरकोळ किंमत निर्देशांकवर आधारित महागाई दर २.१९ टक्के अशा दीड वर्षांच्या नीचांकावर गेल्याचे आढळून आले आहे.
- रिझव्र्ह बँकेने आर्थिक वर्ष २०१९-२० करिता अर्थव्यवस्था ७.४ टक्क दराने वाढ करेल असे अंदाजले आहे.
रिलायन्स जिओला एजिस ग्रॅहम बेल पुरस्कार
- माहिती व संपर्क तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरी रिलायन्स जिओने पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. नवव्या एजिस ग्रॅहम बेल पुरस्कावर रिलायन्स जिओने मोहर उमटविली. गोवा सरकारच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम एंटरटेन्मेंट सोसायटी ऑफ गोवा या संस्थेच्या सभागृहात शुक्रवारी पार पडला.
- रिलायन्स जिओचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित जगातील पहिला ब्रँड एन्गेजमेंट प्लॅटफॉर्म ‘जिओइंटरॅक्ट’ला सर्वांत नावीन्यपूर्ण मूल्यवर्धित सेवेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गोव्याचे माहिती तंत्रज्ञान सचिव अमेय अबियंकर, एजिस नॉलेजचे विश्वस्त भूपेश डाहेरीया आणि परीक्षक सुधीर गुप्ता व भरत छबरवाल यांच्या हस्ते हा पुरस्कार रिलायन्स जिओचे महाराष्ट्र आणि गोवा सर्कलचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश दुर्वे यांनी स्वीकारला.
UP Budget 2019 : योगी सरकारच्या अर्थसंकल्प
- उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारनं ७ फेब्रुवारी रोजी आपला तिसरा अर्थसंकल्प मांडला. अर्थ मंत्री राजेश अग्रवाल यांनी एकूण ४ लाख ७९ हजार ७०१ कोटी १० लाख रुपयांचा (४,७९,७०१ लाख कोटी रुपये) अर्थसंकल्प मांडला.
- या अर्थसंकल्पात गेल्या वर्षीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी वाढ करण्यात आलीय. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी योगी कॅबिनेटची बैठक पार पडली. यामध्ये अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. अर्थसंकल्पात २१ हजार २१२ कोटी ९५ लाखांच्या नव्या योजनांचा समावेश करण्यात आलाय. उ.प्र. अर्थसंकल्पात गुरांसाठी ६१२ कोटी
उत्तर प्रदेशने राज्याचा अर्थसंकल्प गुरुवारी सादर केला. यामध्ये पाळीव गुरांसाठी तसेच गायींचे गोठे बांधण्यासाठी ६१२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. - अयोध्येच्या विकासासाठी ३०१ कोटी रुपयांची तरतूद असून यापैकी २०० कोटी रुपये अयोध्या विमानतळासाठी तर १०१ कोटी रुपये शहरातील पर्यनस्थळांच्या विकासासाठी वापरण्यात येणार आहेत.
- यामध्ये अरबी-फारसी मदरशांसाठी ४५९ कोटी तर पूलबांधणीसाठी २,१०० कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत.
जागतिक बँके अध्यक्षपदी डेव्हिड मॅलपास?
- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी गुरुवारी डेव्हिड मॅलपास यांच्या नावाची शिफारस केली आहे. मात्र मॅलपास हे जागतिक बँकेचे टीकाकार म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या पदावर आल्यास ते या यंत्रणेचे महत्त्व कमी करण्यासाठी प्रयत्न करतील, अशी चिंता व्यक्त होत आहे.
- ६२ वर्षीय मॅलपास हे सध्या अमेरिकेच्या अर्थखात्यात परराष्ट्र संबंध विभागात सचिव आहेत. ट्रम्प यांनी केलेल्या शिफारशीला जागतिक बँकेच्या संचालकांच्या गटाची मंजुरी मिळाल्यास, मॅलपास हे जागतिक बँकेचे अध्यक्ष म्हणून जिम यांग किम यांची जागा घेतील. किम यांनी नुकतेच, आपला कार्यकाळ संपण्याच्या तीन वर्षे आधी अचानक पद सोडले होते.
- जागतिक बँकेच्या निधीमध्ये अमेरिकेचे सर्वाधिक योगदान असून आतापर्यंत अध्यक्षपदावरील व्यक्तीची निवड अमेरिकेकडून होत होती. मात्र अलिकडच्या काळात अन्य देशांनी या पद्धतीला विरोध केला आहे. त्यातच जागतिक बँकेवर उघडपणे टीका करणाऱ्या व्यक्तीला अध्यक्षपदी नेमण्यास विरोध होण्याची शक्यता आहे.
सुवर्णपदक विजेता तिरंदाज जसपाल सिंग याचा अपघाती मृत्यू
- भारताचा तिरंदाज जसपाल सिंह (२३) आणि राष्ट्रीय तिरंदाज व NIS परीक्षेतील टॉपर सरस सोरेन (२८) यांचा मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यातील लालपूर एयर स्ट्रिपजवळ अपघाती मृत्यू झाला.
- जसपाल सिंह आणि सरस सोरेन हे दोघेही राष्ट्रीय ज्युनियर तिरंदाजी स्पर्धेसाठी जात होते. गेल्या वर्षी थायलंड येथे झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत जसपाल सिंह याने सुवर्णपदक जिंकले होते. तर सोरेन २ महिन्यांपूर्वी झालेल्या NIS प्रमाणपत्र परीक्षेत पहिला आला होता. दोघेही रांचीच्या एक्स्पोर्ट क्लबमधून राष्ट्रीय खेळाडू बनले होते.