३०० कोटींच्या स्पाइस बॉम्बसाठी भारताचा करार
- भारताने इस्रायलशी ३०० कोटी रुपये किंमतीच्या स्पाइस बॉम्ब खरेदीचा करार केला आहे. भारतीय हवाई दल इस्रायलकडून १०० SPICE बॉम्बची खरेदी करणार आहे. हे बॉम्ब भारताने बालाकोट येथे करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात वापरले होते.
- स्पाइस बॉम्ब आपल्या भेदक क्षमतेसाठी विशेष ओळखले जातात. पुलवामा हल्ल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून भारतीय हवाई दलानं पाकिस्तानातील बालाकोट येथे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या छुप्या तळांवर हवाई हल्ले केले होते. त्या हल्ल्यांसाठी हेच स्पाइस बॉम्ब वापरण्यात आले. हा बॉम्ब एका विशिष्ट जीपीएस गायडन्स किटसोबत लावला जातो. यामुळे बॉम्ब नेमकं लक्ष्य गाठण्यात यशस्वी ठरतात.
एस.जयशंकर यांनी घेतली भूटानच्या पंतप्रधानांची भेट
- मोदींच्या सरकार मध्ये विदेश व्यवहार मंत्री म्हणून समाविष्ट करण्यात आलेले ‘एस. जयशंकर’ यांनी भूटानचे पंतप्रधान ‘डॉ. लोटे शेरिंग’ यांची भेट घेतली आहे. एस. जयशंकर यांची परराष्ट्र मंत्री म्हणून निवड झाल्यानंतर ही पहिलीच भेट आहे.
- चीन आणि अमेरिका यांच्याशी असलेल्या भारताच्या संबंधांचा त्यांना विशेष अभ्यास आहे. त्यामुळे त्यांची परराष्ट्र मंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे.
ब्रिटीश पंतप्रधानांनी दिला पक्ष नेतेपदाचा राजीनामा
- ब्रिटीश पंतप्रधान थरेसा मे यांनी कॉन्झरव्हेटीव्ह पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी या पदाचा औपचारीक राजीनामा दिल्यानंतर आता नवीन पंतप्रधान निवडीची औपचारीक प्रक्रिया तेथे सुरू झाली आहे. ब्रेक्झिट संबंधातील
- आपल्या आश्वासनाची पुतर्ता करण्यात अपयश आल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
- तीन वर्षांपुर्वी म्हणजे सन 2016 मध्ये थेरेसा मे यांनी ब्रिटीश पंतप्रधानपद स्वीकारले होते.
चीनला टक्कर; भारत अंतराळात करणार युद्धाभ्यास
- चीनला टक्कर देण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षा आणखी मजबूत करण्यासाठी भारताने जोरदार तयारी सुरू केली आहे. भारताने मार्च महिन्यात अॅन्टी सॅटेलाइट (A-Sat) क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती.
- भारत आता पुढील महिन्यात पहिल्यांदाच अंतराळात युद्धाभ्यास करणार असून या योजनेला ‘IndSpaceEx’ असे नावही देण्यात आले आहे.
- जुलै महिन्यात अखेरच्या आठवड्यात होणाऱ्या अभ्यासाचा मुख्य उद्देश म्हणजे आपली राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करणे होय. तचेस अंतराळात काउंटर स्पेच क्षमतेचे मोजमाप करणे हे होय, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
- चीनने जानेवारी २००७ मध्ये हवामान उपग्रहाविरुद्ध A-Sat क्षेपणास्त्राची चाचणी केली होती. अंतराळातील अमेरिकेचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी चीनने त्यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला (समुद्रात एका जहाजावरून ७ सॅटेलाइट लाँच) तीन दिवसापूर्वीच लाँच केले आहे. भारत सध्या अन्य काउंटर-स्पेस क्षमतेला विकसीत करण्यासाठी काम करीत आहे. वीज शस्त्र (DEWS), लेजर, ईएमपी यासारख्या इलेक्ट्रॉनिक हल्ल्यातून आपल्या उपग्रहाचे संरक्षण करता येऊ शकते.
टोकियो ऑलिम्पिकनंतर मेरी कोमचे निवृत्तीचे संकेत
- भारताची आघाडीची महिला बॉक्सर मेरी कोमने २०२० साली टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकनंतर निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. एका खासगी कार्यक्रमात बोलत असताना मेरी कोमने याबद्दलचे संकेत दिले आहेत. आपल्या अखेरच्या स्पर्धेत देशाला सुवर्णपदक मिळवून देण्याचा मेरी कोमचा मानस आहे. मेरी कोमच्या नावावर सहा विश्वविजेतेपदं जमा आहेत.
- २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्येही देशाला सुवर्णपदक मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.” मेरी कोम पत्रकारांशी बोलत होती.