बाजारात लवकरच येणार 20 रुपयांचे नाणे:
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच 20 रुपयांच्या नाण्याचे अनावरण केले. याशिवाय एक, दोन, पाच आणि दहा रुपयांच्या नव्या नाण्यांचेही अनावरण करण्यात आले. दिव्यांगांना सहजपणे ओळखता येईल अशी या नाण्यांची रचना केलेली आहे.
- या नाण्यांचा आकार 27 मि.मी. असेल. 20 रुपयांच्या नाण्याच्या कडांवर कोणतेही चिन्ह नसेल. नाण्याचे बाहेरील वर्तुळ 65 टक्के तांबे, 15 टक्के जस्त आणि 20 टक्के निकेल या धातूंचे असेल, तर आतील वर्तुळात 75 टक्के तांबे, 20 टक्के जस्त आणि 5 टक्के निकेल असेल.
- नाण्याच्या एका बाजूवर अशोक स्तंभाचे निशाण व खाली ‘सत्यमेव जयते’ लिहिलेले असेल. डाव्या बाजूला ‘भारत’ व उजव्या बाजूला इंग्रजीत ‘INDIA‘ असे लिहिलेले असेल. मागील बाजूला नाण्याचे मूल्य ’20’ असेल. तसेच, रुपया व पिकाचे चिन्ह असेल.
पुरुषांच्या तुलनेत महिलांना 19 टक्के कमी वेतनमान:
- भारतात कर्मचाऱ्यांमध्ये लिंगभेद हा वेतनमानाबाबतही कायम असल्याचे जागतिक महिला दिनापूर्वी जाहीर झालेल्या एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. देशात पुरुषांच्या तुलनेत काम करणाऱ्या महिलांना 19 टक्के कमी वेतन मिळते.
- ‘मॉन्स्टर’च्या वेतन निर्देशांकानुसार, पुरुष आणि महिलांमध्ये वेतनाबाबतची दरी विस्तारली आहे. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना सरासरी 46.19 रुपये अधिक मिळतात. salary leval
- वर्ष 2018 मध्ये पुरुषांना ढोबळ ताशी पगार 242.49 रुपये मिळत होता. तर स्त्रियांच्या ताशी मेहनतान्याची रक्कम 196.30 रुपये होती. अधिकतर क्षेत्रात स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत कमी वेतन आहे, असेही याबाबतचे निरीक्षण सांगते.
राष्ट्रीय हरित लवादाचा ‘फोक्सवॅगन’ला कोटींचा दंड:
- जर्मनची कार उत्पादक कंपनी फॉक्सवॅगनला (Volkswagen) मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) कंपनीला 500 कोटींचा दंड ठोठावला आहे.
- दंडाची ही रक्कम येत्या दोन महिन्यात भरण्याची ताकीद एनजीटीने फॉक्सवॅगनला दिली आहे. आपल्या कारमध्ये बेकायदारित्या चीप सेट लावल्याप्रकरणी एनजीटीने कंपनीला दंड केला आहे. या उपकरणामुळे कार्बन उत्सर्जन कमी होण्याऐवजी त्याच्या आकडेवारीत बदल केला जात होता.
महाराष्ट्र श्री : सुनीत जाधवचा जेतेपदाचा षटकार; अमला ब्रम्हचारी ‘मिस महाराष्ट्र’
- महागणपतीच्या साक्षीने टिटवाळ्यात झालेल्या महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत सुनीत जाधवने सलग सहाव्यांदा विजेतेपद पटकावले.
- यात ‘मिस मुंबई’ मंजिरी भावसारने आपल्या पीळदार शरीरसौष्ठवाचा नजारा सादर करीत फिजीक स्पोर्टस् प्रकारात ‘मिस महाराष्ट्र’चे जेतेपद पटकावले. तर मुंबईच्या अमला ब्रम्हचारीने महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करत ‘मिस महाराष्ट्र’चा मान मिळविला. पुरूषांच्या फिजीक स्पोर्टस् प्रकारात मुंबईचाच रोहन कदम सरस ठरला.
- महाराष्ट्र श्री 2019 चे निकाल –
महाराष्ट्र श्री 2019 – सुनीत जाधव (मुंबई)
उपविजेता- सागर माळी (ठाणे)
प्रगतीकारक खेळाडू – अनिल बिलावा ( मुंबई)
सांघिक विजेतेपद – मुंबई (97 गुण)
उपविजेतेपद – मुंबई उपनगर (66), तृतीय क्रमांक – ठाणे (61)