पुलित्झर पुरस्कार विजेत्या दोन पत्रकारांची म्यानमारच्या तुरुंगातून सुटका
- रोहिंग्यांच्या समस्यांबाबतच्या वार्तांकनामुळे म्यानमार सरकारने तुरुंगात टाकलेल्या रॉयटर वृत्तसंस्थेच्या दोन पत्रकारांची मुक्तता करण्यात आली. या पत्रकारांच्या सुटकेसाठी जागतिक पातळीवर मोठे अभियान छेडले गेले होते.
- वा लोन आणि क्वॉ सो ऊ अशी या दोघांची नाअवे असून यांगोनच्या तुरुंगाबाहेर पडताच त्यांना प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनी गराडा घातला.
सप्टेंबर 2017 मध्ये रखाईन प्रांतात रोहिंग्या मुस्लिमांच्या हत्याकांड आणि त्यानंतर तब्बल साडे 7 लाख रोहिंग्यांना हुसकावून लावल्याबाबतचे वृत्त या दोघांनी प्रसिद्धीस दिले होते. लोन आणि ऊ या दोघांना 2017 च्या डिसेंबरमध्ये अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर अधिकृत गोपनीय कायद्याचा भंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या दोघांनी तब्बल 511 दिवस तुरुंगात काढले आहेत.
अमेरिकेची आणखी एक चांद्र मोहीम
- अमेरिका आणखी एका चांद्र मोहिमेचे नियोजन करीत असून, पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह चंद्रावर पाय ठेवणारी पहिली महिला अमेरिकनच असेल, असे अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स यांनी सोमवारी सांगितले.
- देशाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशावरून येत्या पाच वर्षांत अमेरिका चंद्रावर परत जाईल आणि त्यावर पाऊल टाकणारी पहिली महिला व पुढील पुरुष अमेरिकेचा असेल, असे पेन्स यांनी येथे सॅटेलाईट २०१९ परिषदेत बोलताना सांगितले
- भारतासह १०५ देशांतील १५ हजारांपेक्षा जास्त शास्त्रज्ञ आणि उद्योगांचे प्रतिनिधी सहा मेपासून वॉशिंग्टन डीसीमध्ये सुरू झालेल्या चार दिवसांच्या या परिषदेला उपस्थित आहेत. ही परिषद सगळ्यात मोठी अशी उपग्रह उद्योग घटना असल्याचे सांगण्यात येते. परिषदेत अॅमेझॉन आणि ब्लू ओरिजिनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस, स्पेसएक्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क, वन वेबचे संस्थापक गे्रग वायलर आदींची मुख्य भाषणे झाली.
‘आयएनएस रणजित’ नौदलातून निवृत्त
- 36 वर्षांच्या भारतीय नौदलातील सेवेनंतर ‘आयएनएस रणजित’ या क्षेपणास्त्र विनाशिकेने (मिसाईल डिस्ट्रॉयर) नौदलातून निवृत्ती घेतली.
विशाखापट्टणम येथील नाविक तळावर या विनाशिकेला अखेरची मानवंदना देण्यात आली. - तसेच 1983 साली ‘आयएनएस रणजित’ ही विनाशिका भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू झाली होती.
तर सोव्हिएत महासंघाने तयार केलेल्या काशीन श्रेणीतील पाच विनाशिकांमधील ही तिसरी विनाशिका आहे. - युक्रेनमधील कोमुनारा शिपबिल्डींग प्रकल्पात ‘आयएनएस रणजित’ची उभारणी करण्यात आली होती. त्यानंतर प्रोजेक्ट ’61 एमझेड’ अंतर्गत या विनाशिकेला ‘पोराझायुश्ची’ हे नाव देण्यात आले.
- तर ‘नाटो’च्या यादीमध्ये या विनाशिकेला काशिन क्लास असे संबोधले गेले आहे.
- 16 जून 1979 रोजी ही विनाशिका लॉन्च करण्यात आली आणि त्यानंतर 30 ऑक्टोबर 1981 साली सोव्हिएत महासंघाच्या नौदलात या विनाशिकेला सामील करून घेण्यात आले होते. त्यानंतर ही विनाशिका भारतीय नौदलाला देण्यात आली. भारतीय नौदलात सामील झाल्यानंतर या विनाशिकेचे नामांतरण ‘आयएनएस रणजित’ असे करण्यात आले.
आयसीएसई दहावीच्या परीक्षेत जुही कजारिया देशात पहिली
- कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने दहावी (आयसीएसई) व बारावीचा (आयएससी) निकाल जाहीर काल झाला.
- मुंबईच्या जमनाबाई नरसी शाळेची जुही कजारिया व पंजाबच्या मुक्तसरमधील विद्यार्थी मनहर बन्सल या दोघांनी 99.60 टक्के गुण मिळवीत आयसीएसई 10 वी परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकावला. तर बारावीच्या परीक्षेत मुंबईतील सेंट जॉर्ज हायस्कूलची मिहिका सामंत हिने 99.75 टक्के गुण मिळवत देशात दुसरी येण्याचा मान पटकावला आहे.
इराणकडून होणारी इंधन आयात संपुष्टात
- अमेरिकेने इराणवर लादलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे भारताने इराणकडून केल्या जाणाऱ्या कच्च्या इंधनाच्या आयातीत कपात केली आहे.
- एप्रिलमध्ये या आयातीचे प्रमाण ५७ टक्क्यांनी कमी झाले. चालू महिन्यापासून इराणकडून केली जाणारी आयात पूर्णपणे संपुष्टात येणार
आहे. यामुळे भारताचा इंधनखर्च वाढणे जवळपास निश्चित असून देशांतर्गत पेट्रोल व डिझेलच्या दरांवर त्याचा विपरित परिणाम होण्याचे
संकेत आहेत. - भारताने एप्रिलमध्ये इराणकडून दररोज सरासरी २,७७,६०० बॅरल कच्चे इंधन आयात केले.
- अमेरिकेने इराणवर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आर्थिक निर्बंध लादले. यानंतर इराणकडून होणारी इंधनखरेदी सहा महिन्यांत टप्प्याटप्याने
संपुष्टात आणण्याची सूचना अमेरिकेने भारत व चीनसह अनेक देशांना केली होती.