⁠  ⁠

चालू घडामोडी : ०८ मे २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

Jio चा तिसरा मोठा करार, Vista Equity करणार 11,367 कोटींची गुंतवणूक

jio

लॉकडाउनदरम्यान रिलायन्स ग्रुपने तिसरा मोठा करार केला आहे. काही दिवसांपूर्वी फेसबुक आणि सिल्वर लेक या कंपन्यांनी रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये गुंतवणूक करण्याची घोषणा केली. त्यानंतर आता अमेरिकेची अजून एक मोठी कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये गुंतवणूक करणार आहे. अमेरिकेची खासगी इक्विटी फर्म ‘व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स’ (Vista Equity Partners) रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 11,367 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
या गुंतवणूकीद्वारे व्हिस्टा कंपनी जिओमध्ये 2.32 टक्के हिस्सेदारी खरेदी करेल. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओ प्लॅटफॉर्म्सकडून आज(दि.8) याबाबत माहिती देण्यात आली. या गुंतवणूकीमुळे जिओ प्लॅटफॉर्म्सची इक्विटी व्हॅल्यू 4.91 लाख कोटी रुपये आणि एंटरप्राइज व्हॅल्यू 5.16 लाख कोटी होईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले.
जगातील पाचवी सर्वात मोठी ‘एंटरप्राइजेस सॉफ्टवेअर’ बनवणारी कंपनी म्हणून व्हिस्टाची ओळख आहे. आहे.

गरिबांसाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना

modi

करोना विषाणूशी लढा देण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. करोनाच्या महासाथीमुळे बाधित झालेल्या देशभरातील कुटुंबांना मोफत धान्यपुरवठा करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला असून त्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना जाहीर केली आहे.
८० कोटी लोकांना म्हणजेच एकूण लोकसंख्येच्या दोन तृतीयांश लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमानुसार येणाऱ्या कुटुंबांना एप्रिल, मे आणि जून २०२० मध्ये त्यांना मिळणाऱ्या धान्याच्या दुप्प्ट धान्य मिळणार असून अंत्योदय अन्न योजनेच्या लाभधारकांनाही त्यांना मिळणाऱ्या नियमित धान्याबरोबरच ५ किलो जास्तीचे धान्य वितरित करण्यात येणार आहे. या योजनांना राज्य सरकारकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून ६ मेपर्यंत ६९.२८ लाख मेट्रिक टन धान्य वितरित करण्यात आले आहे.
सरकारला या योजनेतील धान्य, त्याच्या वाहतुकीसाठी, साठवणुकीसाठी तसेच वितरण करण्यासाठी ४६ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

दूरदर्शनच्या प्रसिद्ध निवेदिका मालविका मराठे यांचे निधन

WhatsApp Image 2020 05 07 at 20.45.34

दूरदर्शनच्या प्रसिद्ध निवेदिका मालविका मराठे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ५३ वर्षांच्या होत्या.
मालविका यांनी सुरुवातीला आकाशवाणीत हंगामी उद्घोषक म्हणून काम केले. त्यानंतर त्या दूरदर्शन वाहिनीवरील ‘हॅलो सखी’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे जवळपास १२ वर्षे सूत्रसंचालन करत होत्या. या कार्यक्रमामुळे त्या प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचल्या होत्या.

वर्षातील शेवटचा सुपरमून यंदा अधिक चमकदार

यंदाचा अखेरचा सुपरमून गुरुवारी रशियातील मॉस्कोत श्रमिक महिलेच्या पुतळ्याजवळ काहीसा असा दिसला. तो सामान्यापेक्षा जास्त मोठा आणि चमकदार दिसला. सायंकाळी ४.१५ वाजता तो पूर्ण प्रभावात असताना भारतात सूर्यप्रकाश असल्याने दिसला नाही. त्याला सुपर फ्लॉव्हर मून देखील म्हटले जात आहे.

Share This Article