⁠
Uncategorized

चालू घडामोडी : ०८ नोव्हेंबर २०२०

Current Affairs : 08 November 2020

जो बायडन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष

Biden won Election

जो बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला असून तेच अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत हे आता स्पष्ट झालं आहे.
डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन हे अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत.
बायडन यांना २९० तर ट्रम्प यांना २१४ इतकी इलेक्टोरल मते मिळाली.
अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत बायडन विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत.
बायडन यांना सात कोटींहून अधिक मते मिळाली. बायडन यांच्या विजयामुळे अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदी कमला हॅरीस यांनी निवड होणार आहेत.
आफ्रो-अमेरिकन वंशाच्या कमला हॅरीस आता अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती असणार आहेत.

इस्रोचं RISAT चं यशस्वी प्रक्षेपण

Indian Space Research Organization: करोनाकाळातील इस्रोचं पहिलं मिशन; RISAT  चं यशस्वी प्रक्षेपण - live first isro mission in corona pandemic launch of  pslv c49 from sriharikota | Maharashtra Times

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यंदाच्या वर्षात करोना संक्रमणकाळातलं आपलं पहिलं मिशन पूर्ण केलं.
शनिवारी दुपारी ३.०० वाजता श्रीहरिकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटर भागातून इस्रो एका उपग्रहाचे प्रक्षेपण (Satellite launch) करण्यात आलं.
इस्रोचं हे ५१ मिशन आहे.
या प्रक्षेपणात पीएसएलव्ही सी ४९ (PSLV C49) रॉकेट आपल्यासोबत ईओएस ०१ (EOS01) हा एक प्राथमिक उपग्रह आणि नऊ इतर व्यावसायिक उपग्रह (Commercial Satellite) अंतराळात सोडले.
ईओएस ०१ (EOS01) ची वैशिष्ट्ये
प्राथमिक उपग्रह ईओएस ०१ (EOS01) एक रडार इमेजिंग सॅटेलाईट (RISAT) आहे. या उपग्रहाची भारतीय लष्कराला मोठी मदत होऊ शकते. मिलिटरी सर्व्हिलान्ससाठी याचा वापर केला जाऊ शकतो. सोबतच शेती, भूगर्भ शास्र आणि समुद्रकिनाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठीही या उपग्रहाची मदत होणार आहे.

अमिरातीमध्ये मुस्लीम वैयक्तिक कायदे शिथिल

dubai

अविवाहित जोडप्यांना एकत्र राहण्याची मुभा, मद्यावरील निर्बंध शिथिल करणे आणि तथाकथित ‘ऑनर किलिंग’ हा गुन्हा ठरवणे अशारितीने देशाच्या इस्लामी वैयक्तिक कायद्यांमध्ये मोठे बदल करण्यात आल्याचे संयुक्त अरब अमिरातींनी (यूएई) शनिवारी जाहीर केले.
देशाची कायदा यंत्रणा इस्लामी कायद्यांच्या कठोर अशा अंमलबजावणीवर आधारित असताना, अशाप्रकारच्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या विस्तारातून देशाचे बदलते रेखाचित्र प्रतिबिंबित झाले आहे.
यूएई व इस्रायल यांच्यातील संबंध सामान्य करण्यासाठी अमेरिकेच्या पुढाकाराने या दोन देशांमध्ये झालेल्या करारानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. कायद्यातील या सुधारणांची घोषणा ‘डब्ल्यूएएम’ या सरकारी वृत्तसंस्थेमार्फत करण्यात आली व तिचे तपशील सरकारशी संलग्न असलेल्या ‘दि नॅशनल’ या वर्तमानपत्रात जाहीर करण्यात आले.
२१ वर्षे व त्याहून अधिक वयाच्या लोकांनी मद्यपान करणे, विक्री आणि मद्य बाळगणे यांसाठी असलेली दंड आकारण्याची तरतूद या बदलांन्वये रद्द करण्यात आली आहे.
यापूर्वी मद्य खरेदी करणे, त्याची वाहतूक आणि मद्य घरात ठेवणे यांसाठी परवाना आवश्यक होता. नव्या नियमामुळे मुस्लिमांना मद्यप्राशनाची, अविवाहित जोडप्यांना एकत्र राहण्याची मुभा देण्यात आली आहे.

अमेरिेकेच्या उपराष्ट्रपतीपदी कमला हॅरीस

kamala-harris

अमेरिेकेच्या उपराष्ट्रपतीपदी कमला हॅरीस निवडून आल्या आहेत.
कमला हॅरीस या अमेरिकेच्या इतिहासातील पहिल्या महिला उपराष्ट्रपती ठरल्या.
आफ्रिकन-अमेरिकन आणि आशियाई-अमेरिकन महिला आहेत.
कमला हॅरीस यांच्या आई या भारतीय वंशाच्या डॉक्टर होत्या. तर, वडील जमैकामधील अर्थतज्ञ होते.
कमला हॅरीस या २००३ ते २०११ दरम्यान सन फ्रॅन्सिस्कोच्या ड्रिस्ट्रिक्ट अटर्नी म्हणून कार्यरत होत्या. २०१६ मध्ये त्यांनी रिपब्लिकन सिनेटर लोरेटा सानशेज यांचा पराभव करत अमेरिकन सिनेटमध्ये कनिष्ठ प्रतिनिधी म्हणून निवडून आल्या. अमेरिकन काँग्रेसच्या अप्पर चेंबरपर्यंत निवड होणाऱ्या हॅरीस या दुसऱ्या कृष्णवर्णीय आणि पहिल्या दक्षिण आशियाई-अमेरिकन महिला होत्या.

Related Articles

Back to top button