⁠  ⁠

चालू घडामोडी : ०८ सप्टेंबर २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

Current Affairs : 08 September 2020

DRDO कडून ‘हायपरसोनिक’ तंत्रज्ञानाचं यशस्वी परिक्षण!

hypersonic

भारतानं सोमवारी स्वदेशी निर्मित हायपरसोनिक टेक्नोलॉजी डेमॉन्स्ट्रेटर व्हेईकल (HSTDV) चं यशस्वी परीक्षण केलं.
अमेरिका, रशिया आणि चीन नंतर हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत जगातील चौथा देश ठरला आहे.
या कामगिरीमुळे भारताला अत्यंत प्रगत अशा ध्वनीपेक्षा वेगवान – हायपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांची निर्मिती शक्य होणार आहे.
डिफेन्स रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अर्थात डीआरडीओ (DRDO) कडून ही हायपरसोनिक प्रोपल्शन टेक्नोलॉजी (Hypersonic propulsion technology) विकसीत केलीय.
अत्यंत गुंतागुंतीचं आणि कठीण असं तंत्रज्ञान विकसित करतानाच भारतानं आपल्या क्षमतेचंही प्रदर्शन केलंय. भविष्यात संरक्षण उद्योगासोबतच पुढच्या पीढीच्या हायपरसोनिक व्हेईकलच्या दिशेनं हे तंत्रज्ञान महत्त्वाचं ठरेल.
‘हायपरसोनिक टेक्नोलॉजी डेमॉन्स्ट्रेटर व्हेईकल’ क्रूझ मिसाईलला ताकद देतं. हे ‘स्क्रॅमजेट’ इंजिनच्या सहाय्यानं संचालित होतं.
डीआरडीओकडून सोमवारी ओडिशा समुद्रकिनाऱ्याजवळ डॉ. अब्दुल कलाम बेटाहून मानवरहित ‘स्क्रॅमजेट’चं हायपरसोनिक स्पीड फ्लाइटचं यशस्वी परीक्षण पार पडलं.
जे विमान ६१२६ ते १२,२५१ किमी प्रतीतास वेगानं उड्डाण करू शकतं, त्यांना हायपरसोनिक विमान म्हटलं जातं. भारताच्या HSTDV चं परीक्षण २० सेकंदाहून कमी वेळेचं होतं.
उपयोग काय?
-अत्यंत प्रगत अशा हायपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांची निर्मिती करणे शक्य होईल.
-एचएसटीडीव्ही तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘मॅक ६’ म्हणजे ध्वनीच्या वेगाच्या सहा पट अधिक वेगाने क्षेपणास्त्र डागता येते.
-या तंत्रज्ञानाच्या यशस्वी चाचणीमुळे भारताला शत्रूच्या संरक्षण प्रणालीला चकवा देणारी क्षेपणास्त्रे तयार करता येतील.

रेडिओ खगोलशास्त्राचे प्रणेते शास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरूप यांचे निधन

dr govind swrup

रेडिओ खगोलशास्त्राचे प्रणेते आणि पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर रेडिओ एस्ट्रोफिजिक्स (एन.सी.आर.ए.) संस्थेचे संस्थापक संचालक डॉ. गोविंद स्वरूप यांचे निधन झाले. ते 91 वर्षांचे होते.
‘भारतातील रेडिओ खगोलशास्त्राचे प्रणेते’ अशी त्यांची ओळख होती. त्यांनी खगोलशास्त्राच्या अभ्यासकांचा गट तयार करून या क्षेत्रातील संशोधनाला चालना दिली.
पुण्यापासून 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या खोडद-नारायणगाव येथे जगातील दुसऱ्या क्रमांकाची महाकाय रेडिओ दुर्बीण उभारण्याचे काम त्यांनी केले.
डॉ. गोविंद स्वरुप यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील पहिली आधुनिक रेडिओ दुर्बीण मुंबईजवळील कल्याणच्या परिसरात उभारण्यात आली. या दुर्बिणीच्या सहाय्याने सूर्याची निरीक्षणे घेण्यात आली.
डॉ. गोविंद स्वरूप यांनी दक्षिण भारतात उटी येथेही रेडिओ दुर्बीण उभारली.
गोविंद स्वरूप यांना पद्मश्री, भटनागर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

व्होडाफोन-आयडियाची नव्या ब्रॅंडिंगसह एंट्री

व्होडाफोन आयडिया कंपनीने आपली ओळख बदलली आहे. कंपनीने सोमवारी नवीन ब्रॅंडचे अनावरण केले.
यापुढे व्होडाफोन-आयडिया Vi नावाने ओळखली जाईल, असे कंपनीने म्हटलं आहे. याच बरोबर कंपनीने www.myvi.in ही नवीन वेबसाईट लाँच केली आहे.
दोन वर्षांपूर्वी आयडियाचे व्होडाफोनमध्ये विलीनीकरण झाले होते.

Share This Article