⁠  ⁠

चालू घडामोडी : ०९ एप्रिल २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

Current Affairs 09 April 2020

जगप्रसिद्ध विषाणूशास्त्रज्ञ गीता रामजी यांचे निधन

जगप्रसिद्ध विषाणूशास्त्रज्ञ गीता रामजी यांचे निधन

दक्षिण आफ्रिकेच्या जागतिक ख्यातनाम विषाणूशास्त्रज्ञ गीता रामजी यांचे नुकतेच निधन झाले आहे.
एक ‘लस वैज्ञानिक’ आणि HIV प्रतिबंधक संशोधन अग्रणी म्हणून त्या काम करत होत्या.
ऑरम संस्थेमध्ये मुख्य वैज्ञानिक अधिकारी म्हणून त्या अलीकडे कार्यरत होत्या.
HIV प्रतिबंधित नवीन पद्धती शोधण्याच्या आयुष्यातील वचनबद्धतेसाठी त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
२०१८ मध्ये लिस्बनमध्ये प्रतिभावान स्त्री वैज्ञानिक पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते.

वैद्यकीय साधनांना १ एप्रिलपासून ‘औषधे’ म्हणून मानण्याचे केंद्र सरकारचे संकेत

वैद्यकीय साधनांना १ एप्रिलपासून 'औषधे' म्हणून मानण्याचे केंद्र सरकारचे संकेत

१ एप्रिलपासून वैद्यकीय साधनांना ‘औषधे’ म्हणून मानण्याचे केंद्र सरकारचे संकेत. रसायन व खते मंत्रालयाकडून या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
भारत सरकारच्या सूचनेनुसार सर्व वैद्यकीय उपकरणे गुणवत्ता नियंत्रण आणि किंमतींच्या देखरेखीसाठी औषधे म्हणून सरकारद्वारे नियंत्रित केली जातील असे संकेत जारी करण्यात आले आहेत.
भारतात विकली जाणारी सर्व वैद्यकीय उपकरणे ‘ड्रग्स आणि कॉस्मेटिक्स कायद्यांतर्गत’ औषधे म्हणून मानली जातील, अशी केंद्र सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे.
१ एप्रिल २०२० पासून ही कारवाई अंमलात आणली आहे.
सध्या ड्रग्स आणि कॉस्मेटिक्स कायद्यान्वये भारत सरकार २४ वैद्यकीय उपकरणे वर्गीकृत करते.
सदर २४ वर्गांच्या उपकरणांना ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स कायदा (Drugs and Cosmetics Act – DCA), १९४० आणि ड्रग्स आणि कॉस्मेटिक्स कायदा १९४५ अंतर्गत औषधे म्हणून नियमित केले जाईलक

पॅरासिटामोल आणि हायड्रोक्सीक्लोरोक्वीन (एचसीक्यू) या औषधाची निर्मिती ६ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय

hcq

केंद्र सरकारने पॅरासिटामोल आणि हायड्रोक्सीक्लोरोक्वीन (एचसीक्यू) या औषधाच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे. करोना व्हायरसवर उपचार करण्यात या गोळ्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. ज्या देशांना करोनाशी लढण्यासाठी या गोळ्यांची आवश्यकता असेल, त्यांच्या मागण्यांची पूर्तता केली जाईल, असे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत.
मलेरियासाठी वापरली जाणारी ही गोळी करोनासाठी किती प्रभावी आहे याबाबत डॉक्टर आणि तज्ञांमध्ये मतभेद आहेत. पण केंद्र सरकारने इतर देशांच्या मागणीची पूर्तता करण्याचे संकेत दिल्यानंतर भारतीय कंपन्यांनी निर्मिती ६ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेसह काही युरोपियन देशांना या गोळ्यांची गरज आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर या गोळ्या गेमचेंजर असल्याचं म्हटलं आहे.देशात अनेक कंपन्या या गोळ्यांची निर्मिती करतात. जायडस कॅडिला आणि इप्का लॅबोरेटरिज यामध्ये प्रमुख आहेत. या कंपन्या मासिक निर्मिती ४ टक्क्यांनी वाढवून ४० मेट्रिक टन करण्याची शक्यता आहे. याशिवाय पुढच्या महिन्यात हा दर ५ ते ६ टक्क्यांनी वाढणार असून निर्मिती ७० मेट्रिक टन केली जाणार आहे. या कंपन्यांनी पूर्ण क्षमतेने निर्मिती केल्यास प्रत्येक महिन्याला २०० एमजीच्या ३५ कोटी टॅबलेट तयार केल्या जाऊ शकतात.
भारतात एचसीक्यूच्या एका गोळीची किंमत ३ रुपयांपेक्षा कमी आहे. जाणकारांच्या मते, ७ कोटी रुग्णांवर उपचार करण्यासाठी १० कोटी गोळ्या पुरेशा आहेत. या परिस्थितीत इतर गोळ्यांची निर्यात केली जाऊ शकते. जगावर आलेल्या अभूतपूर्व संकटाच्या पार्श्वभूमीवर मानवतेच्या दृष्टीकोनातून भारताने पॅरासिटामोल आणि एचसीक्यू निर्यातीसाठी परवानगी दिली आहे. शेजारी राष्ट्रांसह या औषधाची आवश्यकता असलेल्या इतर देशांनाही औषध दिलं जाईल, विशेषतः करोनाचा जास्त फटका बसलेल्या देशांना पुरवठा होईल, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे नवनियुक्त प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी दिली. २५ मार्च रोजी काढलेल्या आदेशानुसार एचसीक्यूला प्रतिबंधित औषधांच्या यादीत ठेवत सर्व प्रकारच्या औषध निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती. पण मंगळवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत ही बंदी मागे घेण्याचा निर्णय झाला.

Share This Article