भारताच्या जगजित पोवाडिया यांची INCBच्या सदस्यपदी पुन्हा निवड
- भारताच्या जगजित पोवाडिया यांची इंटरनॅशनल नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डा(INCB)च्या सदस्यपदी पुन्हा निवड झाली आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी असलेल्या चीनच्या हाओ वेई यांचा पराभव करत लक्षणीय मतांसह विजय मिळवला आहे.
- संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या पहिल्या फेरीच्या मतदानात जगजित पोवाडिया यांना 44 मतं मिळाली.
- खरं तर निवडणूक जिंकण्यासाठी फक्त 28 मतांची गरज असते. मंगळवारी 54 सदस्यीय इकोनॉमिक अँड सोशल काऊंसिलच्या 5 सदस्यांच्या निवडीसाठी मतदान घेण्यात आलं. या 5 सदस्य जागांसाठी 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.
- जगजित पोवाडिया यांनी INCBच्या सदस्यपदी पुन्हा निवड झाल्यानं आनंद व्यक्त केला आहे.
- त्यांचा कार्यकाळ 2 मार्च 2020मध्ये सुरू होणार असून, 2025मध्ये ते त्या पदावर राहणार आहेत.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण प्रदान
- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला होता. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते बाबासाहेब पुरंदरे यांच्या घरी जाऊन पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- पद्मविभूषण पुरस्कार पद्म विभूषण पदक, मिनिएचर आणि सनद प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
कायदा शिक्षणाचे जनक डॉ. मेनन यांचे निधन
- भारतातील आधुनिक कायदा शिक्षणाचे जनक म्हणून परिचित असलेले विधिज्ञ डॉ. एन. आर. माधव मेनन यांचे वयोमानासंबंधी आजाराने निधन झाले. ते ८४ वर्षीयांचे होते.
- मेनन यांनी कायद्यातील कारकीर्द केरळ उच्च न्यायालयातून वयाच्या एकविसाव्या वर्षी सुरू केली होती. नंतर ते दिल्लीला गेले. कालांतराने १९६० मध्ये अलिगड मुस्लीम विद्यापीठात अध्यापन केले. १९८६ मध्ये त्यांनी बंगळुरू येथे नॅशनल लॉ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी ही संस्था स्थापन केली, तेथे ते १२ वर्षे कु लगुरू होते.
अणू करारामधून इराणचीही माघार
- अमेरिकेसह अन्य 5 देशांबरोबर 2015 साली केलेल्या अणू करारामधून आज इराणनेही माघार घेतली. अमेरिकेने या करारातून यापूर्वीच माघार घेतली आहे. अमेरिकेकडून इराणवर नवीन निर्बंध लागू केले जाण्याच्या पार्श्वभुमीवर इराणने हे पाऊल उचलले आहे.
- अमेरिकेने इराणविरोधातील लष्करी कारवाईसाठी आपली युद्धसामुग्री, लढाऊ विमाने, विमानवाहू तोफा मध्यपूर्वेच्या दिशेने रवान केल्या आहेत.
- अमेरिकेच्या या हालचाली संभाव्य युद्धाची लक्षणे दाखवत असल्याने इराणने या अणू कराराच्या अंमलबजावणीचे बंधन झुगारून दिले आहे.
- अमेरिकेसह ब्रिटन, फ्रान्स, चीन, जर्मनी आणि रशियाबरोबर इराणने 2015 साली अणू करार केला आहे.
जम्मू काश्मीरमधील उधमपूरला स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मिळाला रस्ता
- श्रीनगर: जम्मू-काश्मीरधल्या उधमपूरला स्वातंत्र्यानंतर पहिला रस्ता मिळाला आहे. उधमपूरमधल्या मर्ता पंचायतीचे ग्रामस्थ स्वातंत्र्यापासून रस्त्याची वाट पाहत होते. अखेर स्वातंत्र्यानंतर 71 वर्षांनी त्यांचं स्वप्न साकार झालं.