---Advertisement---

चालू घडामोडी : ०९ सप्टेंबर २०२०

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Current Affairs : 09 September 2020

फाइव्ह जी तंत्रज्ञान विकासात भारत-अमेरिका-इस्रायल सहकार्य

5g

मोबाइलच्या ‘फाइव्ह जी’ तंत्रज्ञानाची यंत्रणा उभारण्यात हुआवे या चीनच्या कंपनीला अमेरिका व भारतासह अनेक देशांनी वगळले असतानाच आता ही यंत्रणा उभारण्यासाठी भारत, इस्रायल व अमेरिका हे सहकार्य करणार आहेत.
फाइव्ह जी तंत्रज्ञानात या तीन देशांनी पुढाकार घेतला असून अमेरिकेतील भारतीय लोक व इस्रायल यांच्यातील संपर्कातून हा प्रस्ताव पुढे आला आहे. या तीन देशांनी सहकार्य करावे, असे जुलै २०१७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलमधील भेटीत सूचित केले होते.
भारत-अमेरिका-इस्रायल यांच्या आभासी शिखर बैठकीत त्यांनी सांगितले की, जगातील विकासाची आव्हाने हे तीन देश एकत्र येऊन पेलू शकतात. इस्रायलचे भारतातील राजदूत रॉन माल्का व त्यांचे इस्रायलमधील समपदस्थ संजीव सिंगला यांची भाषणे झाली.

बंगळूरुतील उड्डाणपुलास स्वा. सावरकर यांचे नाव

Vinayak Damodar Savarkar

काँग्रेस आणि जनता दलाने (धर्मनिरपेक्ष) विरोध केला असतानाही कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात आलेल्या एका उड्डाणपुलाचे मंगळवारी उद्घाटन केले.
बंगळूरु महापालिके ने ३४ कोटी रुपये खर्च करून ४०० मीटर लांबीचा हा उड्डाणपूल बांधला आहे, हा पूल येलहांका येथील मे. संदीप उन्नीकृष्ण मार्गावर आहे.

भारत आणि फ्रान्स मध्ये 36 राफेल विमानांबाबतचा करार

संरक्षणमंत्री राजनाथसिंह, फ्रान्सचे संरक्षणमंत्री फ्लॉरेन्स पार्ले आणि भारतीय लष्करातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुरुवारी अंबाला हवाई तळावर आयोजित करण्यात येणाऱ्या एका समारंभात पाच राफेल विमाने औपचारिकपणे भारतीय हवाई दलात (आयएएफ) दाखल करून घेण्यात येणार आहेत.
भारत आणि फ्रान्स यांच्यातील संरक्षणविषयक आणि सुरक्षाविषयक सहकार्य अधिकाधिक वृद्धिंगत करण्याबाबत राजनाथसिंह आणि पार्ले अंबालामध्ये चर्चा करणार आहेत. पार्ले यांचे गुरुवारी आगमन होणार असून समारंभ आटोपल्यानंतर त्वरितच ते मायदेशी रवाना होणार आहेत.
भारतात 29 जुलै रोजी पहिली पाच राफेल विमाने दाखल झाली, भारत आणि फ्रान्स यांच्यात 59 हजार कोटी रुपयांचा 36 राफेल विमानांबाबतचा करार करण्यात आला आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now