---Advertisement---

चालू घडामोडी – १ ऑगस्ट २०१६

By Tushar Bhambare

Published On:

chalu-ghadamodi-current-affairs-in-marathi
---Advertisement---

महाराष्ट्र

प्रवीण गेडाम यांची परिवहन आयुक्तपदी नियुक्ती
# नाशिकचे माजी पालिका आयुक्त प्रवीण गेडाम यांची परिवहन आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान परिवहन आयुक्त शाम वर्ध निवृत्त झाल्यानंतर प्रवीण गेडाम यांच्याकडे परिवहन आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. यापूर्वी नाशिक महापालिका आयुक्तपदानंतर शासनाने मुदतीपूर्वीच त्यांची मुंबईतील साहाय्यक विक्रीकर आयुक्तपदी बदली केली होती. तेंव्हापासून आतापर्यंत गेडाम मुंबईतील साहाय्यक विक्रीकर आयुक्तपदी कार्यरत होते.

क्रीडा

नरसिंग यादव निर्दोष, उत्तेजक सेवनप्रकरणी ‘नाडा’चा निर्वाळा
# भारताचा मल्ल नरसिंग यादवच्या उत्तेजक सेवनप्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून उठलेले वादळ आता संपुष्टात आले आहे. राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेच्या(नाडा) शिस्तपालन समितीने नरसिंग यादवला निर्दोष जाहीर केले आहे. उत्तेजक सेवनप्रकरणात नरसिंग यादवचा काहीच दोष नसल्याचा निर्वाळा ‘नाडा’ने दिला आहे. नरसिंग सेवन करत असलेल्या ड्रींक्समध्ये भेसळ करण्यात आली होती, असे ‘नाडा’ने आज दिलेल्या निर्णयात जाहीर केले. ‘नाडा’च्या निर्णयामुळे नरसिंगवरील ऑलिम्पिक समावेशाबाबतचे सावट आता दूर होण्याची शक्यता आहे.

---Advertisement---

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now