⁠  ⁠

Current Affairs 1 March 2018

Saurabh Puranik
By Saurabh Puranik 4 Min Read
4 Min Read

1) भारत जगातील सर्वाधिक वेगवान अर्थव्यवस्था

भारत पुन्हा एकवार जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था बनला आहे. आॅक्टोबर ते डिसेंबर २०१७ च्या तिमाहीत जीडीपी विकासदर ७.२ टक्क्यांवर गेला. ता गेल्या पाच तिमाहींतील उच्चांक आहे. डिसेंबर तिमाहीत चीनचा विकासदर ६.८% होता. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून (सीएसआे) जारी आकडेवारीनुसार कृषी, मॅन्युफॅक्चरिंग, बांधकाम आणि काही सेवा क्षेत्रांत दमदार कामगिरीच्या जोरावर ही वाढ झाली आहे. आर्थिक प्रकरणांचे सचिव सुभाष गर्ग यांनी सांगितले की, मॅन्युफॅक्चरिंग आणि बांधकाम क्षेत्रात तेजी आल्यामुळे विकासदर वाढीस चालना मिळाली आहे. सीएसआेने दुसऱ्या अग्रीम अंदाजात जुलै ते सप्टेंबर २०१७ च्या तिमाहीतील ६.३% विकासदराचा आकडा सुधारित करून ६.५ टक्क्यांवर नेला आहे. वार्षिक विकासदराच्या अंदाज ६.५ टक्क्यांवरून ६.६ टक्क्यांवर नेला. रिझर्व्ह बँकेनेही यंदा ६.६ टक्केच विकासदराचे अनुमान व्यक्त केलेले आहे. २०१६-१७ मध्ये जीडीपी िवकासदर ७.१ टक्के होता. गेल्या तिमाहीत खाणकाम क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रांत वाढ नोंदवला. सर्वाधिक ९% वाढ व्यापार, हाॅटेल, परिवहन व दूरसंचार क्षेत्रात झाली आहे. कृषी क्षेत्रात ४.१% व मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ८.१% वाढ झाली. खाणकाम क्षेत्रात ०.१% घसरण झाली.

2) वर्धा व भंडारा दूरदर्शन केंद्रांचे प्रसारण लवकरच बंद

अ‍ॅनालॉग टेरिस्ट्रियल टीव्ही ट्रान्समिशनच्या डीडी नॅशनल चॅनल व प्रादेशिक वाहिनीअंतर्गत आर्वी (चॅनल ११), पुलगाव (चॅनल २७), वर्धा (चॅनल ३१) व भंडारा (चॅनल ११) या दूरदर्शन केंद्राचे प्रसारण लवकरच बंद होणार असून, संबंधित केंद्राची सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार नाही. हे चॅनल्स डीडी फ्री डिश डायरेक्ट टू होम (डीटीएच) यावर इतर चॅनल्ससोबत उपलब्ध आहेत. त्यासाठी आवश्यक उपकरणे सेटटॉप बॉक्स, डिश अ‍ॅन्टिना आणि इतर उपकरणे बाजारात उपलब्ध आहेत.

3) गोव्यात 21 एप्रिलपासून राज्य चित्रपट महोत्सव

गोवा मनोरंजन संस्था व माहिती व प्रसिद्धी खात्याच्या संयुक्त विद्यमाने, ९ वा गोवा राज्य चित्रपट महोत्सव येत्या २१ ते २४ एप्रिल या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या चित्रपट महोत्सवाचे पुरस्कार कोंकणी चित्रपट दिवसा निमित्त २४ रोजी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांनी दिली. कोंकणी चित्रपटाचे पिता अल जॅरी ब्रागांझा यांनी निर्मिती केलेला मोगाचो आवंडो प्रथम कोंकणी चित्रपट हा २४ एप्रिल १९५० मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. एरव्ही तियात्र व दाल्गाद अकादमी मिळून हा दिवस साजरा करायचे. ते यंदा मनोरंजन संस्था करणार असून गोवा राज्य चित्रपट महोत्सव पुरस्कार २०१८ या दिवसा निमित्त प्रदान करण्यात येणार असल्याचे तालक यांनी सांगितले.

4) पुढच्या वर्षीपासून चंद्रावर सुरु होणार 4 जी नेटवर्क

जगातील अनेक भाग अजूनही 4 जी नेटवर्कच्या सुविधेपासून वंचित आहेत. पण पुढच्यावर्षापासून चंद्रावर 4 जी नेटवर्कची सेवा चालू होणार आहे. चंद्रावर 4 जी नेटवर्क उभारण्यासाठी व्होडाफोन आणि नोकिया या दोन कंपन्या एकत्र आल्या आहेत. व्होडाफोनच्या लंडन मुख्यालयातून ही माहिती देण्यात आली आहे. बर्लिन स्थित एका खासगी स्पेस कंपनीची चंद्रावर लँडर आणि दोन रोव्हर पाठवण्याची योजना आहे. या मिशनसाठी चंद्रावर 4 जी नेटवर्क उभारण्यात येणार आहे. एलन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीच्या फाल्कन 9 रॉकेटद्वारे हे रोव्हर चंद्रावर पाठवण्यात येतील.

5)१ मार्च ‘रोटी डे’

अमित कल्याणकर या पुण्यातील तरुणाने १ मार्च ‘रोटी डे’ म्हणून साजरा करायचे ठरवले आहे. गेली तीन वर्ष तो हा उपक्रम करत आहे. सोशल मीडियावरील प्रसिद्धीमुळे त्याला यंदा राज्यभरात पुणे- मुंबईसह नागपूर, नाशिक, सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, सातारा अशा विविध ठिकाणांहून या उपक्रमासाठी प्रतिसाद मिळत आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Share This Article