Current Affairs : 10 December 2020
जगातील सामर्थ्यवान महिलांच्या फोर्ब्सच्या यादीत निर्मला सीतारामन यांना स्थान
मंगळवारी फोर्ब्सने २०२० मधील पहिल्या १०० प्रभावशाली महिलांची यादी जाहीर केली असून त्यात जर्मनीच्या चान्सलर अन्जेला मर्केल सलग दहाव्या वर्षी प्रथम क्रमांकावर राहिल्या आहेत तर भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन याना या यादीत ४१ वे स्थान मिळाले आहे.
याशिवाय, भारतीय महिलांत रोशनी नाडर मल्होत्रा ५५, किरण शॉ मुझुमदार ६८ व्या तर लँडमार्क समूहाच्या अध्यक्ष रेणुका जनतियानी ९८ व्या क्रमांकावर आहेत.फोर्ब्सच्या या यादीत १० देशांतील प्रमुख महिला, ३८ मुख्य कार्यकारी अधिकारी, पाच मनोरंजन क्षेत्राशी निगडित महिलांचा समावेश आहे.
माजी मंत्री विष्णू सावरा यांचे दीर्घ आजाराने निधन
राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आणि पालघरचे माजी पालकमंत्री विष्णू सावरा (७२) यांचे बुधवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
सन १९९० च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर वाडा मतदारसंघातून निवडून आले होते.
सहा वेळा विजयी होण्याचा सन्मान त्यांनी मिळविला. १९९५-९९ आणि २०१४-१९ च्या युती सरकारमध्ये ते मंत्री हाेते.
पार्थिव पटेलची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती
पार्थिव पटेलची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पार्थिवने निवृत्ती घेत असल्याचा निर्णय जाहीर केला.
भारतीय संघाचा सर्वात तरुण यष्टीरक्षक आणि यष्टींमागच्या आपल्या हालचालींमुळे पार्थिव नेहमी चर्चेत असायचा.
तर 35 वर्षीय पार्थिव पटेलने आतापर्यंत 25 कसोटी, 38 वन-डे आणि दोन टी-20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे.
भारतीय संघाकडून पार्थिवला फारशी संधी मिळाली नसली तरीही स्थानिक क्रिकेटमध्ये पार्थिवने गुजरातचं 194 सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्व केलं आहे.
2002 साली वयाच्या 17 व्या वर्षी पार्थिव पटेलने भारतीय संघाकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी येणार ‘शक्ती’ कायदा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे पाच निर्णय घेण्यात आले आहेत.
तर यामध्ये महत्वाचे म्हणजे महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करता यावी, याकरिता प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी शक्ती या दोन प्रस्तावित कायद्यांना विधिमंडळासमोर सादर करण्यास झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
तसेच शक्ती या विधेयकानुसार शिक्षेचे प्रमाण वाढविण्यात आले असून नवीन गुन्हे देखील समाविष्ट करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ ॲक्ट 2020 आणि स्पेशल कोर्ट ॲड मशिनरी फॉर इंप्लिमेंटेशन ऑफ महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ 2020 अशी दोन विधेयके विधिमंडळात मांडण्यात येतील, असेही निश्चित करण्यात आले.
दरम्यान, आंध्र प्रदेशच्या दिशा कायद्याचा अभ्यास करून महाराष्ट्रासाठी विधेयकाचा मसुदा करण्याकरिता अश्वथी दोरजे यांचे अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने तयार केलेल्या दोन विधेयकांचे मसुदे मंत्रिमडळासमोर 12 मार्च 2020 रोजी ठेवण्यात आले होते. जयंत पाटील, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड या मंत्र्यांचा समावेश होता. या समितीने मसुद्यांना अंतिम रूप दिले आहे.