Current Affairs 10 January 2020
जपानचा पासपोर्ट सर्वात शक्तीशाली ; भारताला ५८ वे स्थान
जगातील सर्वात शक्तीशाली पासपोर्टमध्ये २०२० या वर्षात भारतीय पासपोर्ट दोन स्थानांनी घसरुन ८४ व्या क्रमांकावर आला आहे. भारतीय पासपोर्टधारकांना जगातील ५८ देशात विना व्हिसा प्रवेश मिळू शकतो. नुकत्याच जारी झालेल्या एका अहवालात ही माहिती समोर आली. सर्वात शक्तीशाली पासपोर्टमध्ये जपानचा पहिला क्रमांक आहे, तर सर्वात कमकुवत पासपोर्टच्या यादीत पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर आहे.
आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना (आयएटीए) च्या आकडेवारीनुसार, हेनले अँड पार्टनर्सने क्रमवारी जारी केली आहे. पासपोर्टधारकाला विना व्हिसा किती देशात प्रवेश मिळतो या आधारावर ही क्रमवारी निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वीही या यादीत जपानचाच पहिला क्रमांक होता. जपानच्या पासपोर्टवर जगातील १९१ देशात विना व्हिसा प्रवेश मिळतो.
जगातील सर्वात शक्तीशाली १० पासपोर्ट
क्रमांक | देश | व्हिसा फ्री एंट्री मिळणाऱ्या देशांची संख्या |
१ | जपान | १९१ |
२ | सिंगापूर | १९० |
३ | जर्मनी, दक्षिण कोरिया | १८९ |
४ | फिनलँड, इटली | १८८ |
५ | डेन्मार्क, लक्जमबर्ग, स्पेन | १८७ |
६ | फ्रान्स, स्वीडन | १८६ |
७ | ऑस्ट्रिया, आयरलँड, नेदरलँड, पोर्तुगाल, स्वित्झरलँड | १८५ |
८ | बेल्जियम, ग्रीस, नॉर्वे, ब्रिटेन, अमेरिका | १८४ |
९ | ऑस्ट्रेलिया, कॅनडा, चेक रिपब्लिक, माल्टा, न्यूझीलंड | १८३ |
१० | हंगेरी, लिथुआनिया, स्लोवाकिया | १८१ |
आज नवीन वर्षांचे पहिले छायाकल्प चंद्रग्रहण
नवी दिल्ली : नवीन वर्षांचे पहिले छायाकल्प चंद्रग्रहण आज होणार आहे. या वेळी हे चंद्रग्रहण भारतातूनही दिसणार असल्याचे खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण यांनी सांगितले. हे चंद्रग्रहण मध्यरात्री 2.45 वाजता विशेष चष्म्याऐवजी उघडया डोळ्यांनीदेखील पाहू शकता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
हे छायाकल्प चंद्रग्रहण भारतातून पाहायला मिळणार आहे. आज रात्री 10.38 वाजता चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेमध्ये येण्यास सुरुवात होणार आहे. त्यानंतर, 12.40 वाजता 89 टक्के चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेमध्ये प्रवेश करणार आहे. या वेळी मध्यरात्री 2.45 वाजता संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेतून बाहेर पडणार असल्याची माहिती खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण यांनी दिली. यावेळी पौर्णिमा असूनही ग्रहणात चंद्रबिंब कमी तेजस्वी होणार असल्यामुळे हे चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहता येऊ शकेल असेदेखील त्यांनी सांगितले.
या चंद्रग्रहणाला वोल्फ मून एकल्प्सि असे म्हणतात. हे ग्रहण आशिया, ऑस्ट्रेलिया, युरोप, आफ्रिका, उत्तर अमेरिका, पूर्व साऊथ आफ्रिका येथेही दिसेल. यावर्षीचे हे पहिले छायाकल्प चंद्रग्रहण असून यावर्षीचे चारही चंद्रग्रहण हे छायाकल्प चंद्रग्रहण असतील.
न्यायमूर्ती दिलीप भोसले यांचालोकपाल सदस्यत्वाचा राजीनामा
न्यायमूर्ती दिलीप भोसले यांनी वैयक्तिक कारण देऊन लोकपालच्या न्यायिक सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. नऊ महिन्यांपूर्वी त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती.
‘वैयक्तिक कारणांमुळे लोकपालच्या न्यायीक सदस्यपदाचा सहा जानेवारी रोजी राजीनामा दिला असून, तो १२ जानेवारी २०१० पासून प्रभावी होईल,’ असे ‘ट्विट’ न्यायमूर्ती भोसले यांनी केले आहे; परंतु त्यांनी राजीनाम्यामागील कारणाचा कोणताही तपशील जाहीर केला नाही.
अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती भोसले यांना लोकपालचे अध्यक्ष न्यायमूर्ती पिनाकीचंद्र घोष यांनी २७ मार्च २०१९ रोजी न्यायिक सदस्यपदाची शपथ दिली होती. नियमानुसार लोकपाल समितीत अध्यक्ष आणि कमाल आठ सदस्यांचा समावेश असावा, अशी तरतूद आहे. त्यापैकी चार सदस्य न्यायिक असण्याची अट आहे. लोकपाल सदस्यांची नियुक्ती ही पाच वर्षांसाठी किंवा वयाची ७० वर्षे पूर्ण होईपर्यंत केली जाते.
लोकपालचे अध्यक्ष पिनाकीचंद्र घोष यांनी २७ मार्च रोजी न्यायिक सदस्य म्हणून भोसले यांच्यासह प्रदीपकुमार मोहंती, अभिलाषा कुमारी आणि अजयकुमार त्रिपाठी या तीन माजी मुख्य न्यायमूर्तींना शपथ दिली होती, तर गैरन्यायिक सदस्य म्हणून सशस्त्र सेना बलाच्या पहिल्या महिला प्रमुख अर्चना रमासुंदरम, महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, माजी ‘आयआरएस’ अधिकारी महेंद्र सिंह आणि गुजरात केडरचे माजी ‘आयएएस’ अधिकारी इंद्रजित प्रसाद गौतम यांनी शपथ घेतली होती.
स्वातंत्र्यसैनिक परिवाराशी संबंधित असलेले ६३ वर्षीय दिलीप भोसले हे मुंबई उच्च न्यायालय आणि कर्नाटक उच्च न्यायालयातही न्यायमूर्ती होते; तसेच हैदराबाद उच्च न्यायालयातही त्यांनी १५ महिने प्रभारी न्यायमूर्ती म्हणून काम पाहिले आहे.
जगातील सर्वात उंचीवरील पुलाचे बांधकाम वेगाने सुरू
पुढील वर्षीच्या डिसेंबर महिन्यापर्यंत काश्मीर उर्वरित भारताशी रेल्वेच्या जाळ्याने जोडले जाणार आहे. जगातील सर्वात उंचीवरील या रेल्वे पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी सरकारने नवी मुदत निश्चित केली आहे.
हा रेल्वेमार्ग पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर उंच राहील अशी अपेक्षा आहे. भारतीय रेल्वेच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासातील हा सर्वात आव्हानात्मक प्रकल्प असल्याचे या पुलाचे बांधकाम करणाऱ्या कोकण रेल्वेने म्हटले आहे.
‘रेल्वेच्या दीडशे वर्षांच्या इतिहासातील हे सर्वाधिक आव्हानात्मक काम आहे. काश्मीरला रेल्वेमार्गाने उर्वरित देशाशी जोडणारा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण होईल.
अतिशय खडतर अशा भूप्रदेशात उभारल्या जाणाऱ्या कमानीच्या आकारातील या प्रचंड पुलाच्या बांधकामासाठी ५,४६२ टन लोखंड वापरण्यात आले असून, तो नदीच्या पात्रापेक्षा ३५९ मीटर उंचीवर राहणार आहे. ताशी २६० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना तोंड देता येईल अशी त्याची रचना आहे. ‘अभियांत्रिकी चमत्कार’ ठरणारा १.३१५ किलोमीटर लांबीचा हा पूल बक्कल (कटरा) व कौरी (श्रीनगर) यांना जोडणार आहे.
सध्या चीनमधील बेपान नदीवरील २७५ मीटर उंचीवरील शुईबई रेल्वे पूल हा जगातील सर्वात उंच पूल असून, काश्मीरमधील पूल त्याला मागे टाकणार आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकारी निशिकांत मोरे निलंबित
नवी मुंबईतील अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले पुणे मोटार परिवहन विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांना निलंबित करण्यात आले. त्यांच्या निलंबनाचे आदेश गृह विभागामार्फत देण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
२०१९-२० मध्ये भारताचा विकास दर ५%शक्य, ११ वर्षांत कमी : वर्ल्ड बँक
जागतिक बँकेने आर्थिक वर्ष २०१९-२० साठी भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादन(जीडीपी) वृद्धी दराचा अंदाज घटवून ५% केला आहे. दुसरीकडे, २०२०-२१ साठी ५.८% चा अंदाज व्यक्त केला आहे. याआधी रिझर्व्ह बँक आणि भारत सरकारनेही आपल्या ताज्या अंदाजात वृद्धी दर ५% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. वित्तीय क्षेत्रातील अडचणी आणि मॅन्युफॅक्चरिंग व बांधकाम क्षेत्राच्या कमकुवत प्रदर्शनामुळे वृद्धी दराचा अंदाज घटवला आहे. जागतिक बँकेने जागतिक आर्थिक शक्यता नावाने अहवाल जारी केला आहे. त्यानुसार, बिगर बँकिंग वित्तीय क्षेत्राच्या कर्ज वितरणात नरमाईमुळे भारतात देशांतर्गत मागणीवर बराच परिणाम झाला आहे. कर्जाची अपुरी उपलब्धता आणि वैयक्तिक ग्राहकीत कमतरतेमुळे उत्पादन मर्यादीत राहिले आहे. हे ११ वर्षातील सर्वात मंद वृद्धी दर असेल. अहवालात भारताबाबत नमूद केले की, २०१९ मध्ये आर्थिक हालचालींत घसरण आली आहे. निर्मिती आणि कृषी क्षेत्रात घसरण अधिक राहिली तर सरकारी खर्चाने सरकारसंबंधी सेवांच्या उपक्षेत्रांवर ठिकठाक समर्थन मिळाले. जून तिमाही आणि सप्टेंबर तिमाहीत भारताची जीडीपी वृद्धी अनुक्रमे ५% आणि ४.५% राहिली, २०१३ नंतर हे सर्वात खालच्या स्तरावर आहे. जागतिक बँकेने स्वयंपाकाच्या गॅसवरील सबसिडी टप्प्याटप्प्याने समाप्त करण्याच्या भारताच्या प्रयत्नांचे कौतुक केले. एलपीजी सबसिडीमुळे काळा बाजार तयार होत आहे व घरगुती वापराचा गॅस व्यावसायिक क्षेत्रात पोहोचत होता.सबसिडी हटवण्याच्या कार्यक्रमाने काळा बाजार समाप्त झाला.
द. आशियात बांगलादेशचा वृद्धी दर जास्त
जागतिक अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर २.४% राहील
जागतिक बँकेने २०१९ आणि २०२० साठी जागतिक अर्थव्यवस्थेसाठी वृद्धी दराच्या अंदाजात ०.२% ची कपात केली आहे. त्यानुसार, २०१९ मध्ये जगाच्या अर्थव्यवस्थेची वृद्धी २.४% आणि २.७% चा अंदाज व्यक्त केला होता. अंदाजातील कपातीमागे व्यापार व गुंतवणुकीतून अपेक्षेपेक्षा कमी वसुली झाल्याचे कारण सांगितले आहे. २००८-०९ नंतर सर्वात कमी वृद्धी दर, चीनचा वृद्धी दर १९९० नंतर सर्वात मंद.
२००८-०९ : यापेक्षा कमी भारताचा वृद्धी दर, चीन १९९० नंतर सर्वात मंद
२०१९-२० मध्ये भारताची जीडीपी वृद्धी ५% राहिल्यास हे आर्थिक वर्ष २०१८-१९ नंतर देशातील सर्वात कमी वृद्धी दर असेल. २००८-०९ मध्ये वृद्धी दर ३.१% होता.
संपूर्ण दक्षिण आशिया क्षेत्रासाठी वृद्धी दराचा अंदाज ५.५% आहे. बांगलादेशचा वृद्धी दर ७.२% राहील. पाकिस्तानची जीडीपी वृद्धी २०१९ मध्ये २.४% आणि २०२० मध्ये ३% राहील.