१२ मार्चला QUAD देशांची पहिली बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ मार्च रोजी होणाऱ्या क्वाड (QUAD) देशांच्या प्रमुखांच्या पहिल्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार हाती घेतल्यापासून जो बायडेन आणि मोदी यांच्यातील ही पहिलीच बैठक असेल.
चार देशांच्या क्वाड (QUAD) या संघटनेत भारतासह अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाही सदस्य आहेत.
जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन हेही या समारंभात सहभागी होतील.
चार देशांमधील ही पहिली बैठक आहे.
चारही देशांचे नेते प्रादेशिक आणि जागतिक विषयांवर समान हितसंबंधांसह चर्चा करतील. हिंदी-प्रशांत महासागर क्षेत्रात स्वतंत्र, अखंडित आणि सर्व जहाजांच्या वाहतुकीवर विचारांची देवाण-घेवाण करणार आहेत.
पृथ्वी निरीक्षणासाठी इस्रोकडून रडारनिर्मिती
भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोने अमेरिकेच्या नासा या संस्थेसमवेत उपग्रहामार्फत संयुक्त पृथ्वी निरीक्षण करण्यासाठी एका उच्च विवर्तनक्षम रडारची निर्मिती केली आहे. त्याच्या मदतीने पृथ्वीच्या अधिक स्पष्ट प्रतिमा घेता येणार आहेत.
नासा आणि इस्रो यांच्या (निसार) या संयुक्त प्रकल्पात दुहेरी कंप्रता एल व एस बँड असलेले रडार पृथ्वी निरीक्षणासाठी वापरले जाणार आहे.
‘निसार’ ही दोन वेगेवगेळ्या कंप्रता ए बँड व एस बँडसाठी असणारी पहिलीच मोहीम आहे.
त्यात पृथ्वीचे निरीक्षण काही सेंटीमीटर विवर्तनापर्यंत शक्य होणार आहे
नासा व बेंगळुरू येथील भारतीय अवकाश संशोधन संस्था यांनी याबाबतचा भागीदारी करार ३० सप्टेंबर २०१४ रोजी केला होता.
ही मोहीम २०२२ मध्ये सुरू होणार असून इस्रोच्या श्रीहरीकोटा येथील नेल्लोर जिल्ह्यत श्रीहरीकोटा येथून हा उपग्रह रडारसह पाठवला जाणार आहे.
नासाने यात एल बँड एसएआरची व्यवस्था केली असून वैज्ञानिक माहिती व जीपीएस सव्र्हर्स उपलब्ध केले आहेत.
२०२० मध्ये सर्वाधिक श्रीमंत ठरलेल्या व्यक्तीचा मृत्यू
फ्रेंच अब्जाधीश, राजकारणी आणि डॅसॉल्ट विमान बनविणाऱ्या कुटूंबाचे वंशज असलेले ऑलिव्हियर दासॉल्ट हे रविवारी हेलिकॉप्टर अपघातात ठार झाले.
दासॉल्ट कुटुंबाचा उद्योगाचा पसारा एरोनॉटिक्स, संरक्षण, लिलाव, वाइन आणि मीडियासह अनेक क्षेत्रात पसरलेला आहे.
दासॉल्ट एव्हिएशन ग्रुप गेली 70 वर्षे फ्रेंच विमान उत्पादक कंपनी आहे आणि त्यांच्या पाठोपाठ फाल्कन प्रायव्हेट जेट, मिराज लढाऊ विमाने आणि सर्वात अलीकडील अत्याधुनिक राफेल लढाऊ विमानांचा क्रमांक लागतो.
2020 मध्ये ऑलिव्हियर दासॉल्ट हे सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्याचे फोर्ब्स मासिकाने म्हटले होते. त्यांची संपत्ती 5 अब्ज युरो इतकी असल्याचा अंदाज आहे.