---Advertisement---

चालू घडामोडी : १० ऑक्टोंबर २०२०

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Current Affairs : 10 October 2020

Nobel Peace Prize 2020

Image

जगभरात प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार हा संयुक्त राष्ट्र संघाच्या वर्ल्ड फूड प्रोग्रामला जाहीर करण्यात आला आहे.
शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी जवळपास ३१८ जण स्पर्धेत होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पर्यावरणवादी कार्यकर्ता ग्रेटा यांचीही नावे चर्चेत होती.
युद्ध-संघर्षग्रस्त भागातील शांततेसाठी परिस्थिती सुधारण्यासाठी आणि उपासमारीला रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या या वर्ल्ड फूड प्रोग्रामने मोलाची कामगिरी बजावली असल्याचे नोबेल पुरस्कार समितीने म्हटले आहे.
अन्न आणि कृषी संघटनेच्या स्थापनेनंतर १९६३ मध्ये या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी जगभरातील विविध देशांमधून निधी दिला जातो.
‘वर्ल्ड फूड प्रोगाम’ने २०१९ मध्ये ८८ देशांतील जवळपास १० कोटी नागरिकांपर्यंत खाद्यान्न पाठवले. जगभरातील उपासमार संपुष्टात आणण्यासाठी आणि खाद्य सुरक्षितेला प्रोत्साहन देणारी ‘वर्ल्ड फूड प्रोगाम’ सर्वात मोठी संघटना आहे.

मराठमोळे श्रीकांत दातार हार्वर्ड बिझिनेस स्कूलचे नवे डीन

shrikant datar

भारतीय वंशाचे श्रीकांत दातार यांची अमेरिकेच्या प्रसिद्ध हार्वर्ड बिझिनेस स्कूलचे डीन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दातार भारतीय वंशाच्याच असलेल्या नितीन नोहरीयाची जागा घेतील.
“आर्थर लोव्हस डिकिन्सन बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचे प्राध्यापक आणि हार्वर्ड बिझिनेस स्कूल (एचबीएस) येथील विद्यापीठातील वरिष्ठ सहकारी डीन श्रीकांत दातार हे हॉवर्ड बिझनेस स्कूलचे पुढील डीन असतील, अशी माहिती अध्यक्ष लॅरी बाको यांनी दिली.
श्रीकांत दातार १ जानेवारी २०२१ रोजी हार्वर्ड बिझिनेस स्कूलच्या डीन पदाचा पदभार स्वीकारतील.
दातार यांनी मुंबई विद्यापीठातून आपलं सुरूवातीचं शिक्षण पूर्ण केलं. १९७३ मध्ये ते उत्तीर्ण झाले. चार्टर्ड अकाउंटंट झाल्यानंतर त्यांनी आयआयएम अहमदाबाद येथून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा घेतला.
त्यानंतर दातार यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून सांख्यिकी आणि अर्थशास्त्र विषयात पीएचडी केली. दातार १९८४ ते १९८९ पर्यंत कार्नेगी मेलॉन ग्रॅज्युएट स्कूल ऑफ इंडस्ट्रियल अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर ते १९९६ पर्यंत स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या बिझिनेस स्कूलमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून सेवा बजावली. दातार हे आयआयएम कोलकाताच्या गव्हनिंग बॉडीचाही एक भाग आहेत. दातार हे हॉवर्ड बिझनेस स्कूलचे ११ डीन असतील.

रेडिओलहरीवेधी ‘रुद्रम-१’ची यशस्वी चाचणी

rocket

डिफेन्स रीसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेण्ट ऑर्गनायझेशनने (डीआरडीओ) हवाई दलासाठी विकसित केलेल्या संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या रुद्रम-१ या रेडिओलहरीवेधी क्षेपणास्त्राची शुक्रवारी सुखोई-३०द्वारे ओदिशातील बालासोर तळावरून यशस्वी चाचणी केली.
रुद्रम-१ हे क्षेपणास्त्र शत्रूवर कितीही उंचीवर डागले जाऊ शकते, त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचे संकेत अथवा लहरी पकडण्यासाठीही हे क्षेपणास्त्र तत्पर आहे. या क्षेपणास्त्राला सुखोई आणि तेजस या दोन्ही लढाऊ विमानांमध्ये वापरता येऊ शकते.
रुद्रम-१ची चाचणी यशस्वी झाली असली तरी त्यामध्ये काही बदल अपेक्षित असल्याने त्याची शुक्रवारी चाचणी घेण्यात आली. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी डीआरडीओचे अभिनंदन केले आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now