Current Affairs 11 June 2020
अर्थव्यवस्था पुन्हा उसळी घेणार; वेग असणार तब्बल ९.५ टक्के
- चालू वित्तीय वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेची प्रचंड घसरण झाल्यानंतर पुढच्या वर्षीच्या अनुमानाने काही प्रमाणात दिलासा दिला आहे.
- भारतीय अर्थव्यवस्था ९.५ टक्के वाढीच्या वेगासह उसळी घेणार असल्याचा अंदाज फिच या रेटिंग एजन्सीने वर्तवला आहे. अगोदरच मंदीच्या सावटात असलेल्या अर्थव्यवस्थेला करोना संकटाने घेरलं आणि एप्रिल महिन्यापासून पुन्हा एकदा घसरणीचा वेग वाढला.
- दरम्यान, चालू वित्तीय वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ५ टक्क्यांनी घसरणार असल्याचंही फिचने आपल्या अंदाजात म्हटलं आहे.
- करोना संकटामुळे भारतीय विकासदर अत्यंत वेगाने ढासळला असल्याचं फिचने सांगितलं. या जागतिक संकटानंतर भारतीय विकासदर पुन्हा एकदा उसळी घेणार असून बीबीबी या श्रेणीपेक्षाही हा दर जास्त असेल.
- यामुळे करोनामुळे संकटात असलेली आर्थिक परिस्थिती आणखी बिघडणार नाही, असं सांगत पुढच्या वर्षी वाढीचा दर ९.५ टक्के असेल, असंही फिचने सांगितलं.
- वित्तीय वर्ष २०१९-२० मध्ये सामान्य सरकारी कर्ज अगोदरच जीडीपीच्या ७० टक्के आहे. बीबीबी रेटिंग (४२ टक्के) च्याही हा आकडा पुढे गेला आहे. भारताचं कर्ज जीडीपीच्या तुलनेत २०२०-२१ या वर्षात ८४ टक्क्यांवर जाणं अपेक्षित असल्याचं फिचने म्हटलं आहे. डिसेंबर २०१९ मध्ये फिचने हाच अंदाजित कर्जाचा आकडा जीडीपीच्या ७१ टक्के एवढा सांगितला होता. भारताचा विकास दर वाढणार हा सकारात्मक अंदाज फिचने दिला असला तरी वित्तीय तूट वाढणे आणि इतर नकारात्मक परिणामही करोना संकटामुळे झाल्याचं या एजन्सीने म्हटलं आहे.
आयआयटी बॉम्बे जगात १७२ व्या स्थानावर
- क्यूएसने जगातील अव्वल शिक्षण संस्थांसाठी २०२१ची क्रमवारी जाहीर केली असून यात आयआयटी बॉम्बेने देशात अव्वल स्थान पटकावून जागतिक स्तरावर १७२वे स्थान पटकावले आहे. ही संस्था गेल्या वर्षी १५२ व्या स्थानावर होती.
मायक्रोसॉफ्टचा फंड एम१२ भारतात; बंगळुरूत उघडले जगातील पाचवे कार्यालय
- मायक्रोसॉफ्टचा प्रीमियर व्हेंचर फंड एम १२ आता भारतातही आला आहे. २०१६ मध्ये सुरू झालेल्या या फंडचे पाचवे कार्यालय बंगळुरूत उघडले आहे. याआधी सॅनफ्रान्सिस्को, सिएटल, लंडन आणि तेल अवीवमध्ये त्यांचे कार्यालय होते. एम १२ सर्वसाधारणपणे बी२बी कंपन्यांत गुंतवणूक करते. मायक्रोसॉफ्टअंतर्गत या प्रीमियर फंडला स्मार्टमनी नावाने अोळखले जाते. याचे उद्दिष्ट भारतासह जगभरातील अनोख्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करणे हे आहे.
- एम १२ फंडाने आधीच भारताच्या दोन स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केलेली आहे. यापैकी एक हेल्थटेक प्लॅटफॉर्म इन्होवेकर आणि दुसरा बी२बी लॉजिस्टिक्स सास सोल्युशन्स आहे. भारतात कार्यालय सुरू होण्याआधी फंड आशियात जास्त सुलभतेने गुंतवणूक करू शकेल. भारतात एम १२ चे प्रमुख अभिकुमार यांनी सांगितले की, या फंडाचे कार्यालय भारतात उघडावे, अशी मायक्रोसॉफ्टची दीर्घावधीपासून योजना होती. सर्वसाधारणपणे प्रतिस्पर्धी स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करत नाहीत.
उत्तर प्रदेश सरकारने गोहत्या कायदा अधिक कडक केला आहे.
- गोहत्या केल्यास आता 3 ते 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास तर गोवंशला शारीरिक इजा केल्यास 1 वर्ष 7 महिन्यांची शिक्षा होणार आहे. याबरोबरच गोतस्करी सारखे गुन्हे करणाऱ्यांचे फोटो सार्वजनिक केले जाणार आहे.
- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट ऑनलाइन बैठक झाली. यात उत्तर प्रदेश गोवध निवारण (सुधारित) अध्यादेश, 2020 च्या मसुद्याला संमती देण्यात आली आहे.
- आतापर्यंत गोहत्यासंबंधी गुन्ह्यांत सात वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद होती. मात्र आता ही शिक्षा दहा वर्षांपर्यंत वाढवण्यात येऊन पाच लाख दंडाचीही तरतूद आहे. याबरोबरच गोतस्करीत समावेश असलेले वाहन चालक यांच्यावरही कडक कारवाई करण्यात येणार आहे.
- गोवध निवारण कायदा 1955, उत्तर प्रदेशमध्ये 6 जानेवारी 1956 ला लागू करण्यात आला होता. त्यानंतर 1958, 1961, 1979 आणि 2002 मध्ये या कायद्यात सुधारणा करण्यात आल्या.