Current Affairs : 11 November 2020
IPL2020 Final : मुंबई इंडियन्सने पटकावले विजेतेपद
मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 5 विकेटनीं पराभव करत विजय संपादित केला.
या विजयासह मुंबई इंडियन्सने अंतिम सामन्यात विजय मिळवत आयपीएल स्पर्धेचे पाचवे विजेतेपद पटकावले आहे.
NDA ने स्पष्ट बहुमत मिळवत राखली सत्ता :
बिहारमध्ये NDA ची दिवाळी गोड झाली आहे. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात NDA ने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पहाटेपर्यंत सुरु होती. सर्व 243 जागांचे निकाल हाती असून NDA ने 125 जागा मिळवल्या आहेत.
तर या 125 जागांमध्ये 74 जागा भाजपाने, 43 जागा जदयूने तर मित्र पक्षांनी 8 जागांवर विजय मिळवला आहे.
दुसरीकडे महाआघाडीने 110 जागा मिळवल्या आहेत. हेच बिहारचे मुख्यमंत्री होतील हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे
चार चाकी वाहनांना फास्टॅग अनिवार्य
1 जानेवारी 2021 पासून नवीन अथवा जुन्या चारचाकी वाहनांना ‘फास्टॅग’ अनिवार्य केले जाणार आहे.
‘फास्टॅग’ सुविधेच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल संकलित करण्यात येत आहे.
रेडिओ-फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) तंत्रज्ञानावर ही सुविधा चालते.