---Advertisement---

Current Affairs – 11 September 2018

By Tushar Bhambare

Updated On:

ankur-mittal
---Advertisement---

अंकुर मित्तलचा डबल ट्रॅप नेमबाजीत सुवर्णपदक

  • जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अंकुर मित्तलने डबल ट्रॅप नेमबाजीत सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
  • 150 पैकी 140 गुणांची कमाई करत अंकुरने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. स्लोवाकिया आणि चीनच्या प्रतिस्पर्धी खेळाडूने अंकुरला चांगलीच टक्कर दिली, मात्र शूटऑफमध्ये बाजी मारत अंकुरने अव्वल स्थान कायम राखले. याचसोबत अंकुरने सांघिक प्रकारात शार्दुल विहान आणि मोहम्मद असबसोबत कांस्यपदकाची कमाई केली.
  • या स्पर्धेतून भारताच्या दोन खेळाडूंनी ऑलिम्पिकचा कोटा मिळवला आहे.

telegram ad 728

महिलांच्या सुरक्षेसाठी तीन हजार कोटींच्या नवीन योजना

  • केंद्रीय गृह मंत्रालयाने महिलांच्या सुरक्षेसाठी तीन हजार कोटींच्या नवीन उपाययोजना मंजूर केल्या असून त्यात दिल्लीसह आठ प्रमुख शहरांत सार्वजनिक धोक्याचे बटन, सर्व महिला असलेल्या पोलिस पथकांची गस्त या उपायांचा समावेश आहे.
  • महिला व मुलांसाठी प्रवासी प्रसाधनगृहे, स्मार्ट एलइडी पथदिवे, एकखिडकी तक्रार केंद्रे, न्यायवैद्यक व सायबर गुन्हे विभाग यांचा समावेश महिला शहर सुरक्षा प्रकल्पात करण्यात आला आहे. ही योजना दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरु, हैदराबाद, अहमदाबाद व लखनौ या शहरांमध्ये 2018-19 ते 2020-21 दरम्यान लागू करण्यात येईल, असे गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
  • सुरक्षित शहर प्रस्तावासाठी 2919.55 कोटी रुपये निर्भया निधीतून मंजूर करण्यात आले आहेत. निर्भया निधीची स्थापना 2013 मध्ये करण्यात आली होती. त्याचा हेतू महिलांची सुरक्षा हाच होता.
  • तसेच यात महिला पोलिसांची गस्ती पथके ‘शी टीम’ नावाने काम करतील तर अभयम व्हॅन महिलांच्या तक्रारीला लगेच प्रतिसाद देतील. सीसीटीव्ही कॅमेरे, एलइडी लाइट सुविधा, सार्वजनिक धोक्याचे बटन, समुपदेशकांची सेवा या सोयी दिल्या जाणार असून एकाच ठिकाणी न्यायवैद्यक व सायबर गुन्हे कक्षासह सर्व सेवा देण्यात येणार आहेत. तेथेच तक्रार नोंदवली जाईल. जीआयएस पद्धतीने गुन्ह्य़ांची केंद्रे नेमकी कोणती आहेत हे ठरवले जाईल.

IAAF च्या स्पर्धेत अरपिंदर सिंहची कांस्यपदकाची कमाई

  • झेक प्रजासत्ताक येथील ऑस्ट्राव्हा येथे सुरू असलेल्या IAAFच्या कॉंटिनेंटल कप स्पर्धेत 9 सप्टेंबरला भारताकडून अरपिंदर सिंहने तिहेरी उडीत कांस्यपदकाची कमाई केली. विशेष म्हणजे या स्पर्धेत पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला.
  • या आधी त्याने अरपिंदरने इंडोनेशियात झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये अकराव्या दिवशी अखेरच्या सत्रात भारताच्या खात्यात सुवर्णपदकाची भर घातली होती. या स्पर्धेतील ते भारताचे 10वे सुवर्णपदक होते. तसेच अरपिंदरने 2014च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही कांस्यपदक पटकावले होते.

add header new

---Advertisement---

नियमित अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC

टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा – Mission MPSC Telegram Channel

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now