⁠
Uncategorized

चालू घडामोडी : ११ सप्टेंबर २०२०

Current Affairs : 11 September 2020

अमेरिकी अंतराळ यानाला कल्पना चावलाचे नाव

Kalpana Chawla is the name of the American spacecraft | अमेरिकी अंतराळ यानाला कल्पना चावलाचे नाव

आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राकडे उड्डाण करणाऱ्या एका अमेरिकी व्यावसायिक मालवाहक अंतराळ यानाला दिवंगत कल्पना चावलाचे नाव देण्यात आले आहे.
मानवी अंतराळ यानात तिच्या अमूल्य योगदानाबद्दल हा सन्मान दिला जात आहे. कल्पना अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला होती.
अमेरिकी वैश्विक एरोस्पेस व संरक्षण तंत्रज्ञान कंपनी नॉर्थग्रुप ग्रमॅनने याबाबत घोषणा करताना म्हटले आहे की, आमच्या पुढील अंतराळ यान सिग्नेसचे नाव एस.एस. कल्पना चावला, असे ठेवण्यात येणार आहे.
कल्पनाचा २००३ मध्ये कोलंबिया अंतराळ यानात स्वार असताना चालक दलाच्या सहा सदस्यांसह मृत्यू झाला होता.
कल्पना चावला मूळ भारतीय वंशाची पहिली अंतराळ प्रवासी होती व तिच्या सहभागाने नासामध्ये इतिहास लिहिला गेला आहे.
मानवी अंतराळ यानात तिच्या योगदानाचा दीर्घकाळपर्यंत प्रभाव राहील. च्कंपनीने आपल्या वेबसाईटवर म्हटले आहे की, नॉर्थरोप ग्रमॅन एनजी-१४ सिग्नस अंतराळ यानाचे नाव कल्पना चावला ठेवणे, ही अभिमानाची बाब आहे.

अभिनेते परेश रावल यांची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

Paresh Rawal appointed new chief of National School of Drama : Outlook Hindi

अभिनेता आणि गुजरातचे भाजपचे माजी खासदार परेश रावल यांची गुरुवारी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी परेश रावल यांची नेमणूक केली.
त्यांच्या कलागुणांचा फायदा देशातील कलाकार आणि विद्यार्थ्यांना होईल.

भारत-जपान दरम्यान संरक्षणविषयक सहकार्य करार

modi 2

अनेक वर्षांच्या चर्चेनंतर भारत आणि जपान यांच्यात ऐतिहासिक करार करण्यात आला असून त्यानुसार दोन्ही देशांना व्यूहात्मक रचनेसाठी एकमेकांच्या लष्करी तळांचा वापर करता येणार आहे.
चीनच्या लष्कराचे प्रादेशिक प्राबल्य वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर हा करार करण्यात आला आहे.
भारत आणि जपान यांच्या सशस्त्र दलांमध्ये एकमेकांना मदत आणि सेवा देण्याची तरतूद असलेला करार दोन्ही देशांमध्ये करण्यात आला आहे.
संरक्षण सचिव अजयकु मार आणि जपानचे राजदूत सुझुकी सातोशी यांनी बुधवारी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या, असे संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने सांगितले.
दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांनी एकमेकांच्या सुविधांचा वापर करणे, एकमेकांना सहकार्य करणे आदी मुद्दय़ांचा करारामध्ये समावेश आहे.

सीमेवर तणाव कमी करण्यासाठी पाच कलमी कार्यक्रमावर एकमत

jaishankar

भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये मॉस्कोत एक चर्चा पार पडली.
यावेळी सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये ५ कलमी कार्यक्रमावर एकमत झालं.
तसंच दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू राहणार असून सैनिकांची संख्या कमी करण्याच्या प्रक्रियेतही गती आणण्यावर या बैठकीत चर्चा झाली.
दोन्ही देशांमध्ये संवाद कायम राहिला पाहिजे, सैनिकांना सीमेवरून हटवण्याच्या प्रक्रियेत गती आली पाहिजे, तणाव कमी झाला पाहिजे अशा गोष्टींवर एकमत झाल्याचंही दोन्ही देशांकडून सांगण्यात आलं.

Related Articles

Back to top button