चालू घडामोडी – १२ एप्रिल २०१६
देश-विदेश
डान्सबारवर निर्बंध घालणारे विधेयक विधानसभेतही मंजूर
# डान्सबारच्या नावाखाली अश्लील नृत्यावर आणि अनैतिक कृत्यावर बंदी घालणाऱ्या विधेयकाला विधान परिषदेपाठोपाठ मंगळवारी विधानसभेनेही मंजुरी दिली. दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाल्यामुळे या विधेयकाचे आता कायद्यात रुपांतर होणार आहे.
व्याघ्र संवर्धनावर आज दिल्लीत आशियाई देशांची परिषद
# गेल्या काही वर्षांंपासून आशियाई देशांनी व्याघ्र संवर्धनावर एकत्रित विचारमंथन सुरू केले आहे. आशियाई देशांच्या वरिष्ठ मंत्र्यांचा सहभाग असणारी व्याघ्र संवर्धनावरील तिसरी परिषद उद्या, १२ ते १४ एप्रिलदरम्यान नवी दिल्लीत होत आहे. यावेळी आशियाई देशांचे सर्व मंत्री वाघांच्या अवयवांकरिता असणारी मागणीच नसावी म्हणजे वाघांची शिकारही शून्य होईल, या मुद्यावर प्रामुख्याने करार करणार आहेत. भारतातच सर्वाधिक वाघांच्या शिकारी होत असल्यामुळे भारताचे प्रतिनिधी या परिषदेत काय भूमिका मांडतात, याकडे सर्वाचे लक्ष्य लागले आहे.
नेदरलँडच्या नौदलासाठी अलिबागमध्ये बोटनिर्मिती
# नेदरलँडच्या नौदलासाठी अलिबाग येथील मरीन फ्रन्टिअर्स या कंपनीने ३६ मीटर लांबीच्या अॅल्युमिनियम गस्ती नौकेची निर्मिती केली आहे. भारतीय बनावटीची, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेली अॅल्युमिनियम बोट विभागात मोडणारी ही आजवरची सर्वात मोठी बोट आहे.
जगात वाघांच्या संख्येत शतकानंतर प्रथमच वाढ..
# जगात वाघांची संख्या प्रथमच वाढली असून, त्यातील निम्मे वाघ भारतामध्ये आहेत, असे सोमवारी वन्य जीव अभ्यास गटांनी सांगितले. भारतात गेली काही दशके वाघांची संख्या कमी होत चालली होती, पण आता त्या स्थितीत सुधारणा झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्याघ्रसंवर्धनाबाबत आयोजित बैठकीचे उद्घाटन मंगळवारी करणार असून त्याआधी हे शुभवर्तमान जाहीर करण्यात आले.
कमी खर्चातील सनक्यूब फेमटोसॅट उपग्रहाची निर्मिती
# आगामी काळात छोटय़ा अवकाश मोहिमा व्यक्तिगत पातळीवरही राबवता येणार असून हौशी व विज्ञानाची आवड असणारे लोक छोटे उपग्रह कमी किमतीत अवकाशात पाठवू शकणार आहेत. सन क्यूब फेमटोसॅट हा तीस सेंटिमीटर आकाराचा घनाकृती उपग्रह अॅरिझोना विद्यापीठाचे जेकन थंगा व अमन चंद्रा यांच्यासह काही विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. भारतीय वंशाच्या वैज्ञानिकांच्या मते आता असे छोटे उपग्रह सोडणे ही खर्चिक बाब राहणार नाही. या उपग्रहांच्या प्रक्षेपणाचा व इतर खर्च सध्या एका किलोमागे ६० ते ७० हजार डॉलर्स आहे. .
अर्थव्यवस्था
टाटा स्टील विक्री प्रक्रिया सुरू
# टाटा स्टीलच्या युरोपातील तोटय़ातील प्रकल्प विक्रीची अखेर सोमवारी सुरू झाली. टाटा समूहातील युरोपातील व्यवसाय (लॉंग प्रॉडक्ट्स) ग्रेबुल कॅपिलटला विकत टाटा स्टीलने निर्गुतवणूक प्रक्रिया पार केली.
‘ईएसडीएस’ची २०० कोटींची गुंतवणूक
# सर्वात मोठय़ा डेटाविषयक व्यवसायासाठी ओखले जाणाऱ्या नवी मुंबईतील महापे भागात ईएसडीएसनेही नवा व्यवसाय थाटला आहे. कंपनीने यासाठी महाराष्ट्र शासनाबरोबर २०० कोटी रुपयांचा सामंजस्य करार केला असून दोन वर्षांत ५०० रोजगार निर्मितीचे लक्ष्य राखले आहे.
भारतीय सागरी क्षेत्रातील ‘मेक इन इंडिया’साठी मुंबईत परिषद
# ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून देशाच्या निर्मिती क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीची आंतरराष्ट्रीय प्रसार मोहीम यशस्वी ठरल्यानंतर ७,५०० हून अधिक किलोमीटरचा सागरी मार्ग लाभणाऱ्या भारताच्या सागरी व त्याच्याशी निगडित माल वाहतूक क्षेत्रात परकी निधी ओघ आकर्षिक करण्याच्या दृष्टीने सरकारची पावले पडत आहेत.