---Advertisement---

चालू घडामोडी : १२ डिसेंबर २०२०

By Chetan Patil

Published On:

Current Affairs 12 December 2020
---Advertisement---

Current Affairs : 12 December 2020

जो बायडेन, कमला हॅरिस टाईम ‘पर्सन ऑफ द ईयर’

बायडेन, कमला हॅरिस टाइम "पर्सन ऑफ द ईयर'

टाईम मॅगझीननं अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उप-राष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांना वर्ष २०२० साठी ‘पर्सन ऑफ द इयर’ घोषित केलं आहे.
जो बायडेन यांनी ट्रम्प यांचा मोठ्या फरकानं पराभव केला. तर दुसरीकडे कमला हॅरिस यांच्या हातीदेखील उप-राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं सोपवण्यात आली.
गेल्या वर्षी पर्यावरणाच्या चळवळीत सहभागी असलेल्या ग्रेटा थनबर्गला पर्सन ऑफ द इयर नं सन्मानित करण्यात आलं होतं. तर २०१६ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना हा सन्मान मिळाला होता.
टाईम मॅगझीननं बायडेन आणि कमला हॅरिस यांच्या फोटोंचा एक कव्हर फोटो तयार केला आहे. मॅगझीनच्या फोटोंसोबतच त्यांनी ‘चेंजिंग
अमेरिका स्टोरी’ हे टायटल दिलं आहे. ७८ वर्षीय जो बायडेन यांना राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकांमध्ये ३०६ इलेक्ट्रोल व्होट्स मिळाले होते. तर डोनाल्ड ट्रम्प केवळ २३२ मतं मिळाली होती.
“अमेरिकेची कहाणी बदलण्यासाठी, मतभेदाऐवजी सहानुभूतीला अधिक ताकद असल्याचं सिद्ध करण्यासाठी आणि कठिण काळातून पुढे जात असलेल्या जगाला एक दृष्टी देण्यासाठी,” असं टाईम मॅगझीननं लिहिलं आहे.

भारतीय वंशाचे राजा जॉन ‘नासा’च्या चांद्रवीर चमूत

Untitled 15

अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेने चंद्रावरील ‘आर्टेमिस’ मानवी अवकाश मोहिमेसाठी संभाव्य चांद्रवीरांची नावे निश्चित केली असून त्या अठरा जणांमध्ये भारतीय वंशाचे अमेरिकी राजा जॉन वुरुपतूर चारी यांचा समावेश करण्यात आला आहे.
या चमूत निम्म्या महिला आहेत. चारी हे अमेरिकेच्या हवाई दलातील माजी अधिकारी आहेत. नासाने त्यांची निवड चांद्रमोहिमेतील  संभाव्य चांद्रवीरात केली आहे.
नासाने बुधवारी १८ संभाव्य चांद्रवीरांची यादी जाहीर केली असून आर्टेमिस चांद्र अवतरण मोहिमेत त्यांच्यापैकी काहींना संधी मिळण्याची शक्यता आहे.
ही मोहीम २०२४ मध्ये माणसाला चंद्रावर उतरवणार आहे. दशक अखेरीस चंद्रावर शाश्वत मानवी अस्तित्व निर्माण करण्याचा हेतू या मोहिमेत असून त्याची पहिली पायरी म्हणून २०२४ मध्ये पहिली महिला चंद्रावर उतरणार आहे. यापूर्वी अमेरिकेच्या अपोलो मोहिमांनी चंद्रावर मानवी मोहिमा राबवल्या होत्या.

पीएसएलव्ही-सी ५०दूरसंचार उपग्रह पाठवणार

इस्रोचा स्वदेशी उपग्रह १७ डिसेंबरला या वर्षातील दुसरे प्रक्षेपण करेल. दूरसंचार उपग्रह सीएमएस-०१ ला पीएसएलव्ही सी-५० रॉकेटने पाठवणार आहे.
आधी या उपग्रहाचे नाव जी-सॅट १२ आर ठेवण्यात आले होते, ते बदलून आता सीएमएस-०१ असे करण्यात आले आहे. हे रॉकेट श्रीहरिकोटाच्या अंतराळ केंद्रातून उड्डाण घेईल. ही पीएसएलव्हीची ५२ वी मोहीम अाहे.

mpsc telegram channel

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now