Current Affairs 12 July 2020
व्याघ्र गणनेचे जगतिक रेकॉर्ड
- देशातील 2018 मधील व्याघ्र गणनेचा विश्वविक्रम प्रस्थापित केला असून कॅमेऱ्याद्वारे करण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठी व्याघ्र गणना म्हणून या विक्रमाची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.
- “ऑल इंडिया टायगर एस्टिमेशन 2018′ च्या व्याघ्रगणनेचा निकाल गेल्यावर्षी जागतिक व्याघ्रदिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला होता. जगातील एकूण वाघांच्या संख्येपैकी 75 टक्के म्हणजे 2,967 वाघ भारतात आढळले आहेत.
- “अखिल भारतीय व्याघ्र अंदाजाची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नोंद करण्यात आली आहे.
- 2018-19 मध्ये कॅमेऱ्याद्वारे करण्यात आलेल्या व्याघ्र गणनेची दखल गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. या गणनेमध्ये वन्य जीवांचे 3,48,58, 623 फोटो घेतले गेले. त्यामध्ये 76, 651 वाघांचे आणि 51, 777 फोटो बिबट्यांचे होते. तर उर्वरित फोटो हे वनसंपदेचे होते.
- या फोटोंपैकी 2,461 फोटो हे केवळ वाघांचे होते. त्यात वाघांच्या बछड्यांचा समावेश नव्हता. स्ट्राईप पॅटर्न रेकग्निशन सॉफ्टवेअरच्या मदतीने या वाघांची ओळख निश्चित करण्यात आली होती.
सिंगापूरमध्ये ली सियेन लूंग पंतप्रधानपदी कायम
- सिंगापूरमध्ये करोनाच्या साथीदरम्यान झालेल्या सर्वसाधारण निवडणूकीमध्ये पंतप्रधान ली सियेन लूंग यांच्या सत्तारुढ पीपल्स ऍक्शन पार्टीने आपली सत्ता कायम राखली आहे.
- पीपल्स ऍक्शन पार्टी सिंगापूरमध्ये 1965 पासून सत्तेवर आहे. संसदेतील 93 जागांपैकी 83 जागांवर या पक्षाच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.
- एकूण मतदानांपैकी 61.2 टक्के मते या पक्षाने मिळव्ली आहेत. मतांची टक्केवारी 2015 च्या निवडणूकीत 70 टक्के होती. त्यामध्ये घट झाल्याचे आढळून आले आहे.
- सिंगापूरमध्ये सध्या मोठी मंदी असून विकासदर 7 ते 4 टक्क्यांदरम्यान आहे. करोनाच्या साथीदरम्यान ज्या थोड्या देशांमध्ये निवडणूका झाल्या, त्यात सिंगापूरचाही समावेश होतो आहे.
यंदा मालाबार नौदल युद्ध सरावात प्रथमच ऑस्ट्रेलिया
- यंदा मालाबार नौदल युद्ध सरावात ऑस्ट्रेलियाचाही सहभाग असेल. भारत लवकरच ऑस्ट्रेलियाला याचे निमंत्रण पाठवेल. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, पुढील आठवड्यापर्यंत औपचारिकरीत्या निमंत्रण देण्याची परवानगी मिळेल. मालाबार नौदल युद्ध सरावात भारतासोबत अमेरिका आणि जपानही सहभागी होऊ शकतात.
- २०१६ पासूनच ऑस्ट्रेलियाने या युद्ध सरावात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, चीनसोबतच्या संबंधांमुळे भारताने अजूनपर्यंत ऑस्ट्रेलियाला या नौदलाच्या सरावात सहभागी करणे टाळले आहे.
- काय आहे मालाबार सराव?
- मालाबार नौदल युद्ध सराव भारत, अमेरिका, जपानच्या नौदलादरम्यान दरवर्षी आयोजित केला जातो. याची सुरुवात भारत आणि अमेरिकेने १९९२ मध्ये द्विपक्षीय नौदल सरावाच्या रूपाने केली होती. २०१५ मध्ये यात जपानलाही सामील करण्यात आले.
मुकेश अंबानींनी जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत सातव्या स्थानी
- भारतातले मोठे उद्योजक मुकेश अंबानी यांच्यासाठी २०२० हे वर्ष खूपच चांगलं ठरलं आहे.
- या काळात मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजमध्ये अनेक कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केली. त्यांच्या रिलायन्स जीओच्या व्यवसायातही वाढ झाली आहे. त्याचमुळे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीतही या वर्षी जबरदस्त वाढ झाली आहे.
- त्यामुळे जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत ते सातव्या क्रमांकावर पोहोचले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी प्रसिद्ध उद्योगजक वॉरेन बफेट यांनाही मागे टाकलं आहे. ब्लूमबर्गने ही आकडेवारी जाहीर केली आहे. याबाबत फोर्ब्स इंडियाने वृत्त दिलं आहे.
- रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती सुमारे ७० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे.
- महत्वाची गोष्ट ही आहे की आता मुकेश अंबानी यांचा जगातील १० सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत समावेश झाला असून त्यांनी प्रसिद्ध उद्योगपती वॉरेन बफेट यांनाही मागे टाकलं आहे.
- बफेट यांची एकूण संपत्ती ६७.९ अब्ज डॉलर आहे. ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, गुरुवारी मुकेश अंबानी यांनी एकूण संपत्तीच्या बाबतीत वॉरेन बफेट यांनाही मागे टाकलं. मुकेश अंबानी यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या काही दिवसांत सातत्याने वाढ दिसून आली आहे.
निओवाईज धूमकेतूचे विलोभनीय दर्शन
- निओवाइज हा धूमकेतू पृथ्वीच्या जवळ येतअसून तो रात्रीच्या वेळी विलोभनीय दर्शन देत आहे.
- त्याची शेपटी पिसाऱ्यासारखी आहे.जुलैत महिनाभर तो भारतातून सूर्यास्तानंतर दिसणार आहे.
- या धूमेकतूला दोन शेपटय़ा आहेत. उत्तर अर्धगोलार्धात हा धूमकेतू दिसत असून तो गेल्या आठवडय़ात बुध ग्रहाच्या कक्षेत होता. तो सूर्याच्या खूप जवळ असल्याने त्याची शेपटी पिसाऱ्यासारखी दिसत आहे, त्यात धूळ व बर्फाचे कण असतात.
- आता तो दोन आठवडय़ात पृथ्वीच्या आणखी जवळ येणार आहे. नासाने निओवाइज धूमकेतू मार्चमध्ये अवरक्त अवकाश दुर्बिणीने शोधला होता. या धूमकेतूची जाडी ५ किलोमीटर आहे. त्याचे केंद्रक काजळीसदृश पदार्थाचे असून हा धूमकेतू सौरमालेच्या ४.६ अब्ज वर्षांपूर्वीच्या जन्माशी नाते सांगणारा आहे. ऑगस्टपर्यंत हा धूमकेतू दर्शन देणार आहे. प्रकाशाचे प्रदूषण नसेल तर तो नुसत्या डोळ्यांनी दिसतो. अवकाश स्थानकातून अवकाशवीरांनी या धूमकेतूची छबी टिपली आहे.