सांगलीच्या उर्वी पाटीलने केली ट्रेकींगच्या विक्रमाची पुनरावृत्ती
- उर्वी अनिल पाटील या 11 वर्षाच्या मुलीने हिमालयातील पीरपंजाल रेंज मधील 14 हजार 400 फुटावरील हमता पास सर केला आहे. एवढया लहान वयात हमता पास सर करणारी ती पहिली महाराष्ट्रीय कन्या ठरली असून मागील वर्षी उर्वीने अवघड असा सरपास ट्रेक पूर्ण केला होता.
अंतराळातील युद्धशस्त्र प्रणाली विकासासाठी नव्या संस्थेस मंजुरी
- भारताने आता अवकाश युद्धाची (स्पेस वॉर) तयारी सुरू केली असुन सैन्याचे सामर्थ्य वाढवण्यासाठी केंद्र सरकारने नव्या संशोधन संस्थेच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. संरक्षण अंतराळ संशोधन संस्था (डीएसआरओ) असे या संस्थेचे नाव असणार आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील सुरक्षेसाठीच्या कॅबिनेट समितीने डीएसआरओच्या स्थापनेला मंजुरी दिल्याचे संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या माहितीत सांगितले आहे. उच्च क्षमतेची हत्यार आणि तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम डीएसआरओ करेल अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
ई-सिगारेटवरील बंदीच्या प्रस्तावाला मान्यता
- ई-सिगारेट आणि व्हॅप्स यांसारख्या निकोटिनयुक्त इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर बंदी घालण्यासाठी सेंट्रल ड्रग्ज स्टॅण्डर्ड कंट्रोल संघटनेने (सीडीएससीओ) मंगळवारी ई-सिगारेटला ड्रग्ज म्हणून प्रतिबंधित करण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे.
- या प्रस्तावाला आरोग्य मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यानंतर सीडीएससीओला उत्पादन, विक्री आणि वितरण यावर प्रतिबंध घालता येणे शक्य होणार आहे. मात्र याचा व्हेपर उत्पादने बाजारपेठेला फटका बसणार आहे. यापूर्वी आरोग्य मंत्रालय आणि सीडीएससीओने सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्याच्या आयात आणि विक्रीवर बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता.
- कर्नाटक, केरळ, मिझोराम, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशने ई-सिगारेटच्या उत्पादनावर आणि वितरण व विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश अलीकडेच जारी केले आहेत.
डॉ. वीरेंद्र कुमार लोकसभेचे हंगामी सभापती
- टीकमगडहून विजयी झालेले भाजपचे खासदार डॉ. वीरेंद्र कुमार यांची १७ व्या लोकसभेच्या हंगामी सभापतीपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
- नव्याने निवडणून आलेल्या खासदारांना डॉ. वीरेंद्र कुमार शपथ देतील. वीरेंद्र कुमार हे खटीक दलित समाजाचे असून प्रसिद्धीपासून दूर राहणारे नेते अशी त्यांची ख्याती आहे.
- वीरेंद्र कुमार सागर लोकसभा मतदार संघातून चार वेळा, तर टीकमगड मतदारसंघातून ३ वेळा असे एकूण ७ वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या सरकारमध्ये ते अल्पसंख्याक तसेच महिला व बालकल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री होते. लोकसभेचे सभापती नियुक्त होण्यापूर्वी नव्याने निवडून आलेल्या खासदारांना शपथ देण्यासाठी हंगामी सभापतींची नियुक्ती केली जाते.