Uncategorized
Current Affairs – 12 October 2018
पॅरा आशियाई खेळ : शरद कुमारची उंच उडी सुवर्णपदकावर
- जकार्ता येथे सुरु असलेल्या पॅरा आशियाई खेळांमध्ये शरद कुमारने सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
- जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करणाऱ्या 26 वर्षीय शरद कुमारने सर्व विक्रम मोडीत काढत 1.90 मी. लांब ऊडी मारली.
- याच प्रकारात भारताच्या वरुण भाटीने रौप्य तर थंगवेलु मरिय्यपनने कांस्यपदकाची कमाई केली.
गंगा नदीसाठी उपोषण करणाऱ्या जी.डी. अग्रवाल यांचे निधन
- गंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सरकार पातळीवर कोणत्याही उपायोजना न झाल्याच्या निषेधार्थ अग्रवाल आमरण उपोषणाला बसले होते. ऋषिकेशमधील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
- आयुष्याच्या उत्तरार्धात अग्रवाल यांनी स्वामी ग्यान स्वरुप सानंद असे नाव धारण केले. २०१२ साली सुद्धा ते गंगा नदीसाठी उपोषणाला बसले होते. त्यावेळी जवळपास अडीच महिने जी.डी.अग्रवाल यांचे उपोषण चालले. अखेर तत्कालिन मनमोहन सिंग सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. त्यावेळी सुद्धा त्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथून दिल्लीला आणण्यात आले होते.
- आयआयटी कानपूरमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य म्हणून काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ लोकसभा निवडणुकीच्यावेळी गंगा प्रदूषण मुक्त करण्याचा नारा दिला होता. यावर्षीच फेब्रुवारी महिन्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून गंगा नदीसाठी स्वतंत्र कायदा करण्याची मागणी केली होती.
एस-४०० करारावर ट्रम्प नाराज, अमेरिकेने भारतावर कारवाईचे संकेत
- भारताने रशियाबरोबर केलेल्या एस-४०० एअर डिफेन्स मिसाइल सिस्टिमच्या खरेदी करारावर अद्याप अमेरिकेने आपली भूमिका जाहीर केलेली नाही. या करारात भारताला अमेरिकेकडून सवलत मिळण्याची शक्यता धूसर आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाबरोबर केलेल्या या कराराबद्दल भारतावर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
- रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन मागच्या आठवडयात भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी दोन्ही देशांमध्ये एस-४०० करार झाला. अमेरिकेने सीएएटीएसए कायद्यातंर्गत रशियाकडून शस्त्रास्त्र विकत घेण्यावर बंदी घातली आहे. मागच्या वर्षी अमेरिकन काँग्रेसमध्ये हा कायदा मंजूर झाला. फक्त अमेरिकन राष्ट्राध्यक्ष सीएएटीएसए कायद्यातून एखादा देशाला सवलत देऊ शकतात.
- काल व्हाईटहाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी लवकरच भारतावर काय कारवाई होते ते तुम्ही लवकरच पहाल असे सांगितले. त्यामुळे भारतावर अमेरिकेकडून निर्बंध घातले जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी अमेरिकेने रशियाकडून शस्त्रास्त्र विकत घेतले म्हणून चीनवर अशा प्रकारची कारवाई केली आहे.
नियमित अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC
टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा – Mission MPSC Telegram Channel