⁠  ⁠

चालू घडामोडी : १२ सप्टेंबर २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 4 Min Read
4 Min Read

Current Affairs : 12 September 2020

आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकात घसरण

Index of Economic Freedom - Wikipedia

देशातील व्यापार आणि व्यावसायिक वातावरणाच्या स्वातंत्र्यासंदर्भातील परिस्थितीत भारताची जागतिक स्तरावर घसरण झाली आहे. आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकात भारत २६ स्थानांनी घसरला आहे.
वेगवेगळ्या देशांमधील व्यावसायिक वातावरण किती पोषण आणि देशातील आर्थिक परिस्थिती संबंधित मूल्यमापन करणा-या कॅनडामधील फ्रेजर इन्स्टिट्यूटने प्रकाशित केलेल्या ‘ग्लोबल इकनॉमिक फ्रिडम इंडेक्स’मध्ये भारत २६ क्रमांकांनी घसरून १०५ व्या क्रमांकावर गेला आहे.
या अहवालात १६२ देशांचा समावेश आहे. मागील वर्षी भारत ७९ क्रमांकावर होता. या यादीत हाँगकाँग आणि सिंगापूरसारखे लहान देश अनुक्रमे पहिल्या आणि दुस-या स्थानावर आहेत.
 या यादीमध्ये अव्वल दहा देशांमध्ये न्यूझीलंड, स्वित्झर्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मॉरिशस, जॉर्जिया, कॅनडा आणि आयर्लंडचा समावेश आहे. या यादीमध्ये चीन १२४ स्थानी आहे. यादीमध्ये जपान २० व्या स्थानी, जर्मनी २१ व्या, इटली ५१ व्या, फ्रान्स ५८ व्या तर भारताचा मित्र देश असणारा रशिया ८९ व्या स्थानी आहे.

भारताचा अहवाल काय सांगतो?
व्यापार आणि व्यवसायिक घटकांवर परिणाम करणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रांचे मुल्यपामन करुन प्रत्येक वेगवेगळ्या मुद्द्यांना ० ते १० दरम्यान गुण दिले जातात. यामध्ये जेवढे अधिक गुण तेवढी स्वातंत्र्य अधिक असं समजलं जातं. मागील वर्षी सरकारचा आकार आणि कामगिरी यासंदर्भात भारताला ८.२२ गुण होते. हाच आकडा १.०६ ने कमी होऊन ७.१६ पर्यंत घसरला आहे. कायदेशीर बाबींचा विचार करता मागील वर्षी ५.१७ गुण होते तर यंदा यामध्ये ०.११ अंकांनी घसरण झाली असून आता भारताला ५.०६ म्हणजे केवळ ५० टक्क्यांच्या आसपास गुण देण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापारातील स्वातंत्र्यासंदर्भातील मुल्यमापनामध्ये मागील वर्षी ६.०८ गुण होते. यंदा हे गुण ५.७१ पर्यंत घसले आङेत. मनुष्यबळ तसेच व्यवसाय नियम या क्षेत्रामध्ये मागील वर्षी ६.६३ गुण होते तर यंदा ते ६.५३ पर्यंत कमी झालेत. दिल्लीतील बिगर सरकारी संस्था असणाऱ्या सेंटर फॉर सिव्हिल सोसायटीने यासाठी भारतामध्ये काम केलं आहे.

भारताचा GDP 11.5 टक्क्यांनी घसरण्याचा Moody’s चा अंदाज

भारतीय अर्थव्यवस्थेबाबत Moody's ने देखील व्यक्त केली चिंता, GDP 11.5 टक्क्यांनी घसरण्याचा अंदाज

मूडीज इन्व्हेस्टर्स सर्विस (Moody’s Investors Service) ने चालू आर्थिक वर्षामध्ये भारताच्या जीडीपीमध्ये 11.5 टक्क्यांची घसरण होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.
याआधी मूडीजने भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये (Indian Economy) 4 टक्क्यांची घसरण होईल असा अंदाज व्यक्त केला होता.
मंद विकास दर कमकुवत वित्तीय व्यवस्था आणि सतत वाढत्या कर्जामुळे भारताचे क्रेडिट प्रोफाइलही कमकुवत झाले आहे.
मूडिजने चिंता व्यक्त करत असे म्हटले आहे की, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालेल्या या तणावामुळे अशाप्रकाचे आर्थिक व्यवस्था देशाला वित्तीय तुटीकडे नेऊ शकते. तथापि, देशाच्या मजबूत पायामुळे पुढील आर्थिक वर्षात म्हणजेच 2022 मध्ये भारताची आर्थिक वाढ 10.6% होईल, अशी अपेक्षा मूडीजने व्यक्त केली आहे.

CPL 2020 : त्रिंबागो नाईट रायडर्सला विजेतेपद

CPL

कायरन पोलार्डच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कॅरेबिअन प्रमिअर लिग स्पर्धेत त्रिंबागो नाईट रायडर्स संघाने CPL चं विजेतेपद मिळवलं आहे.
अंतिम सामन्यात नाईट रायडर्सने सेंट लुशिया झौक्सवर ८ गडी राखून मात केली. महत्वाची गोष्ट म्हणजे या स्पर्धेत नाईट रायडर्सचा संघ अजिंक्य राहिला आहे. विजयासाठी मिळालेलं १५५ धावांचं आव्हान नाईट रायडर्सने लेंडल सिमन्सच्या नाबाद ८४ धावांच्या खेळीच्या जोरावर पूर्ण केलं.
सिमन्सला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

एबीसीच्या अध्यक्षपदी देवेंद्र दर्डा यांची निवड

लोकमत समूहाचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांची ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशनच्या (एबीसी) अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. २०२०-२०२१ या कालावधीसाठी ही निवड करण्यात आली आहे.
तसेच आयटीसी लिमिटेडचे करुणेश बजाज यांचीही सर्वानुमते एबीसीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
देवेंद्र दर्डा यांनी माध्यम क्षेत्राशी संबंधित इंडियन न्यूजपेपर सोसायटी (आयएनएस) आणि इफ्रा ( IFRA) अशा विविध संस्थांमध्येही त्यांनी पदभार सांभाळला आहे. तसेच यवतमाळमधील अनेक शैक्षणिक संस्थांच्या अध्यक्षपदाचा कार्यभारही देवेंद्र दर्डा यांच्याकडे असून पश्चिम भारत फुटबॉल असोसिएशनच्या मॅनेजिंग कमिटीमध्येही त्यांचा समावेश आहे.

१९८४ नंतर प्रथमच सुवर्णमंदिरास परदेशातून निधीची परवानगी

१९८४ नंतर प्रथमच सुवर्णमंदिरास परदेशी अंशदान विनियमन कायद्यानुसार (एफसीआरए) परदेशातून निधी स्वीकारण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून जगभरातील संगत येथे सेवा करण्यास असमर्थ होते. आता सूट मिळाली आहे.

Share This Article