⁠  ⁠

चालू घडामोडी – १३ ऑगस्ट २०१६

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 2 Min Read
2 Min Read

क्रीडा

मायकेल फेल्प्सची सुवर्णलूट!
# रिओ दी जानिरो : मायकेल फेल्प्सची रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत ‘सुवर्णलूट’ कायम आहे. २०० मीटर वैयक्तिक मेडले प्रकारात फेल्प्सने सुवर्णपदकाची कमाई केली. सलग चौथ्या ऑलिम्पिक स्पर्धेत फेल्प्सने या प्रकारातील सुवर्णपदकावर कब्जा केला. ऑलिम्पिक स्पर्धेतले फेल्प्सचे हे तब्बल २२वे सुवर्णपदक आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत एका विशिष्ट प्रकारात सलग चार वेळा सुवर्णपदकावर नाव कोरणाऱ्या थाळीफेकपटू अल ओर्टर आणि लांबउडीपटू कार्ल लुइस यांच्या विक्रमाची फेल्प्सने बरोबरी केली. फेल्प्स १०० मीटर बटरफ्लाय आणि ४ बाय १०० मेडले रिले प्रकारात सहभागी होणार असल्याने सुवर्णलूट सुरूच राहण्याची शक्यता आहे.

अल्माझचा विश्वविक्रम
# इथिओपियाच्या अल्माझ अयानाने १०००० मीटर प्रकारात विश्वविक्रमासह सुवर्णपदकावर नाव कोरले. अल्माझने ही शर्यत २९ मिनिटे आणि १७.४५ सेकंदात पूर्ण केली. शर्यतीत याआधीचा विक्रम चीनच्या वांग जुनक्षियाच्या नावावर होता. तिने २९ मिनिटे आणि ३१.७८ सेकंदात शर्यत पूर्ण केली होती.

लिओनेल मेस्सी पुन्हा अर्जेंटिनाकडून खेळणार; निवृत्तीचा निर्णय मागे
# अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. मेस्सीने एक निवेदन प्रसिद्ध करून याबद्दलची माहिती दिल्याची माहिती अर्जेंटिनातील प्रसारमाध्यमांकडून मिळत आहे. मेस्सीच्या या निर्णयामुळे फुटबॉल चाहत्यांचा जीव सुखावला आहे. अर्जेंटिना फुटबॉलमध्ये अनेक समस्या आहेत. त्यात मला आणखी करण्याची इच्छा नाही. निवृत्ती घेण्याचा निर्णय मी गंभीरपणे घेतला होता. परंतु माझे या देशावर आणि जर्सीवर खूप प्रेम आहे, असे मेस्सीने या निवेदनात म्हटले आहे.

अर्थव्यवस्था

महत्त्वाकांक्षी ‘नील क्रांती’साठी हवे अर्थसहाय्य
# नवी दिल्ली: ‘नील क्रांती‘ उपक्रमाअंतर्गत मत्स्यनिर्यातीतून तिप्पट उत्पन्न मिळविण्याचे उद्दिष्ट अंमलात आणण्यासाठी सुमारे 17,199 कोटी रुपयांच्या निधीची गरज भासणार असल्याचे केंद्राच्या एकत्रित राष्ट्रीय मत्स्यकी कृती आराखड्यात नमूद करण्यात आले आहे. व्यावसायिकदृष्ट्या हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी केंद्र सरकारने जागतिक कन्सल्टन्सी फर्म अॅसेंचरची मदत घेण्याचे ठरविले आहे.

[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “1” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]स्पर्धा परीक्षांचे अपडेट आपल्या मोबाईलवर मोफत मिळवा! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]

TAGGED:
Share This Article