Current Affairs 13 February 2020
अनुराधा पाटील यांना यंदाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर
मराठी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत साहित्यिकास ‘विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार’ व मराठी साहित्य निर्मितीमध्ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्या प्रकाशन संस्थेस ‘श्री.पु.भागवत पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. निवड समितीने यावर्षीच्या ‘विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारासाठी’ ज्येष्ठ साहित्यिक अनुराधा पाटील यांची तसेच ‘श्री.पु.भागवत पुरस्कारासाठी पद्मगंधा प्रकाशन, पुणे या संस्थेची निवड केली आहे,
वि.वा.शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून, आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून ज्येष्ठ कविवर्य कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिन राज्य शासनाकडून ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
श्री. देसाई म्हणाले, कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून यादिवशी राज्यभर मराठी भाषेच्या संवर्धन व विकासासाठी पूरक ठरतील असे विविध उपक्रम साजरे करण्याबाबत सर्व मंत्रालयीन विभाग व त्याअंतर्गत सर्व शासकीय कार्यालये, शाळा व महाविद्यालये यांना सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत.
राज्य शासनाकडून या दिवशी विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, श्री.पु.भागवत पुरस्कार, डॉ.अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार व मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार असे चार विशेष पुरस्कार व साहित्यिक योगदानाबद्दल उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीकरिता 35 वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यासाठी विशेष गौरव सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. यावर्षीचे यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार यापूर्वीच दिनांक 5.2.2020 रोजी जाहीर करण्यात आले आहेत.
‘वृक्षमित्र’ स्पर्धेत राजभवनाची हॅटट्रीक; सलग तिसऱ्या वर्षी राजभवन उद्यानाला प्रथम क्रमांकाचे बक्षीस
रुपारेल महाविद्यालय येथे नुकत्याच झालेल्या ५९व्या भाजीपाला, फळे व फुलांच्या प्रदर्शन व स्पर्धेत राजभवन येथील राज्यपालांच्या उद्यानाला सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांकाचा फिरता चषक प्राप्त झाला आहे.
‘नॅशनल सोसायटी ऑफ द फ्रेंड्स ऑफ द ट्रीज’ या वृक्षमित्र संस्थेच्या वतीने मुंबईतील महानगपालिका, शासकीय,निमशासकीय संस्था,रेल्वे तसेच व्यावसायिक संस्थांसाठी उत्कृष्ट उद्यान स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मलबार हिल येथील राजभवनातील राज्यपालांच्या उद्यानाला प्रथम दोन बक्षीसे देऊन गौरविण्यात आले.
पृथ्वीजवळ नवजात ग्रह शोधण्यात यश
रोचेस्टर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने नवा भव्य ग्रह पृथ्वीजवळ शोधला आहे. या नवजात ग्रहाचे नाव 2 मास 1155-7919 बी असे ठेवण्यात आले आहे. आपल्या पृथ्वीपासून तो केवळ 330 प्रकाश वर्ष दूर आहे.
अमेरिकन ऍस्टॉनॉमिकल सोसायटीच्या रिसर्च नोटस्मध्ये हा शोध प्रसिध्द करण्यात आला आहे. वायु आवरणापासून ग्रह बनण्याची प्रक्रियेवरचे नवे संशोधन मांडण्यात आले आहे. हा सापडलेला पदार्थ अत्यांत शीत असून तो गुरूच्या 10 पट मोठा आहे. म्हणजेच हा ग्रह नवजात असावा.
केल्पर मोहीम आणि त्या सारख्या मोहीमांद्वारे यापुर्वीचे ग्रह शोधण्यात आले आहेत. मात्र हे सर्व जुने ग्रह आहेत. आपल्या पालक ग्रहापासून येवढ्या दूर सापडलेला हा चौथा किंवा पाचवा ग्रह असेल. मात्र त्याची निर्मिती कशी झाली किंवा त्याचा शेवट कसा होईल, याची मांडणी करण्यात तज्ज्ञ गुंतले आहेत.
गिया अवकाश संशोधन केंद्रातील डाटाच्या सहायाने संशोधन करण्यात आले आहे. हा नवजात ग्रह हा 50 लाख वर्ष जुना असावा. आपल्या सुर्यापेक्षा एक हजार पट तो वयाने लहान आहे. पृथ्वी सुर्यापासून जेवढी दूर आहे, त्या तुलनेत 600 पट दूर हा ग्रह त्याच्या सूर्यापासून आहे. आपल्या मुळ ताऱ्यापासून येवढ्या लांब त्याचे अस्तित्व आश्चर्यकारक मानले जात आहे.
AusCricketAwards : वाॅर्नर आणि एलिस ठरले सर्वोत्तम क्रिकेटपटू
आॅस्ट्रेलियाचा सलामीवीर आक्रमक फलंदाज डेव्हिड वाॅर्नर याचा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून गौरव करण्यात आला आहे. माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथवर केवळ एका मताने मात करत वाॅर्नरने हा पुरस्कार मिळविला.
वाॅर्नरला सर्वोत्तम क्रिकेटपटूचे अॅलन बोर्डर पदक मिळाले. हा गौरव मिळविण्याची त्याची ही तिसरी वेळ आहे. वाॅर्नरने याआधी २०१६ व २०१७ मध्येही हा पुरस्कार पटकावला होता. या पुरस्कार वितरण सोहळ्यात आॅस्ट्रेलियाची अव्वल महिला क्रिकेटपटू एलिस पेरीला बेलिंडा क्लार्क पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
मत्स्योद्योग विकासासाठी आइसलॅंडबरोबरच्या सामंजस्य कराराला मंजूरी
शाश्वत मत्स्योद्योग विकास क्षेत्रामध्ये भारत आणि आइसलॅंड यांच्यामध्ये सामंजस्य कराराला झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. दोन्ही देशांमध्ये हा करार गेल्या वर्षी 10 सप्टेंबर रोजी झाला होता.
खोल सागरामध्ये आणि इतर ठिकाणी मासे पकडण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आपल्याकडील ज्ञानाची देवाण-घेवाण करणे. तसेच मासेमारीसाठी योग्य स्थानावर विविध सुविधा निर्माण करणे. आधुनिक मत्स्यपालन, व्यवस्थापन आणि प्रक्रिया या क्षेत्रामध्ये मत्स्य व्यवसायातील लोकांना प्रशिक्षणा देण्याची व्यवस्था करणे.
मत्स्यपालन क्षेत्रातल्या शास्त्रीय शिक्षण आणि संशोधनाने मिळालेली माहिती आणि इतर सूचनांचे आदान-प्रदान करणे.आणि उद्योग म्हणून विकास करण्यासाठी खोल समुद्रातून मिळणाऱ्या मत्स्य उत्पादनावर प्रक्रिया करण्यासाठी असलेल्या शक्यता तपासणे हा या सामंजस्य कराराचा प्रमुख उद्देश आहे.
या सामंजस्य करारामुळे भारत आणि आइसलॅंड यांच्यामध्ये मत्स्यपालन क्षेत्राबरोबरच द्विपक्षीय चर्चेसाठी परस्परांमध्ये सहयोग वाढीस लागणार आहे.