स्टिरिया ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यत : हॅमिल्टनला पहिले विजेतेपद
ओलसर वातावरणात पार पडलेल्या पात्रता फेरीत अव्वल स्थान (पोल पोझिशन) पटकावल्यानंतर मर्सिडिझच्या लुइस हॅमिल्टनने रविवारी मुख्य शर्यतीत पूर्णपणे वर्चस्व गाजवत स्टिरिया ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीचे विजेतेपद पटकावले.
यंदाच्या मोसमातील हॅमिल्टनचे हे पहिले जेतेपद ठरले.
पहिल्याच फेरीदरम्यान (लॅप) फेरारीचा सेबॅस्टियन वेटेल आणि चार्ल्स लेकरेक यांनी एकमेकांना धडक दिली.
ड्रायव्हर्स अजिंक्यपद शर्यतीत बोट्टास अव्वल स्थानी असून हॅमिल्टन दुसऱ्या क्रमांकावर आहे. रेड बुलच्या मॅक्स वेस्र्टापेन आणि अलेक्झांडर अल्बन यांनी या शर्यतीत अनुक्रमे तिसरे आणि चौथे स्थान प्राप्त केले.
मॅकलॅरेनच्या लँडो नॉरिस याला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
केवळ शेतीचा अर्थव्यवस्थेला आधार
सध्याच्या परिस्थितीत उत्पादन आणि सेवा क्षेत्राची उत्पादकता कमी झाली आहे. या वर्षात केवळ शेती क्षेत्राचा अर्थव्यवस्थेला आधार मिळणार आहे, असे या उद्योजकांच्या संघटनेने तयार केलेल्या अभ्यास अहवालात म्हटले आहे.
सध्याच्या परिस्थितीचा अंदाज यावा याकरिता फिक्की या संस्थेने अर्थतज्ञ, उद्योजक, बॅंकर इत्यादींशी चर्चा केली.
यावेळी असे सांगण्यात आले की, यावर्षी विकास दर उणे 4.5% इतका कमी होऊ शकतो. करोनाचा संसर्ग ग्रामीण भागात कमी झाला आहे. पाऊस चांगला पडत आहे. त्यामुळे यावर्षी शेती क्षेत्राची उत्पादकता मात्र कमाल पातळीवर राहण्याची शक्यता आहे.
यामुळे विविध कंपन्यांनी ग्रामीण भागाचा विचार करून पुढील उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.
मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र मोठ्या शहरात एकवटले आहे. मोठ्या शहरात संसर्गाचा जास्त परिणाम झाला आहे. त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता यावर्षी 11.4 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. सेवा क्षेत्राची उत्पादकता केवळ 2.8 टक्के राहील.
बहुतांश कंपन्यांचे उत्पादन त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी होत आहे. कंपन्या नवी गुंतवणूक करण्याची शक्यता कमी आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये फक्त सरकार आपला खर्च वाढवून अर्थव्यवस्थेला चालना देऊ शकते. सरकारने छोटे उद्योग आणि ग्रामीण रोजगारवाढीसाठी प्रयत्न केले आहेत.
फॉक्सकॉनची भारतात 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूकीची योजना
आयफोनची निर्मिती करणारी प्रसिद्ध अॅपल कंपनी हळूहळू चीनमधून आपले उत्पादन प्रकल्प दुसऱ्या देशांमध्ये शिफ्ट करत आहे.
अॅपलशी संबंधित असलेली फॉक्सकॉन ही तैवानची कंपनी भारतात व्यवसाय विस्तार करण्याचा विचार करत आहे.
चेन्नईजवळ श्री पेरुंबुदूर येथे कारखान्याचा विस्तार करण्याचा फॉक्सकॉनचा प्लान आहे.
भारतात 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची कंपनीची योजना आहे. फॉक्सकॉन अॅपल कंपनीसाठी आयफोनची जोडणी करण्याचे काम करते.
निओवाइज हा धूमकेतू पृथ्वीच्या जवळ
निओवाइज हा धूमकेतू पृथ्वीच्या जवळ येतअसून तो रात्रीच्या वेळी विलोभनीय दर्शन देत आहे.
त्याची शेपटी पिसाऱ्यासारखी आहे.जुलैत महिनाभर तो भारतातून सूर्यास्तानंतर दिसणार आहे.
धूमेकतूला दोन शेपटय़ा आहेत. उत्तर अर्धगोलार्धात हा धूमकेतू दिसत असून तो गेल्या आठवडय़ात बुध ग्रहाच्या कक्षेत होता.
धूमकेतूची जाडी 5 किलोमीटर आहे. त्याचे केंद्रक काजळीसदृश पदार्थाचे असून हा धूमकेतू सौरमालेच्या 4.6 अब्ज वर्षांपूर्वीच्या जन्माशी नाते सांगणारा आहे.
Mpsc psi
Good