⁠  ⁠

चालू घडामोडी – १३ जून २०१६

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 6 Min Read
6 Min Read

देश-विदेश

चीनचा डाव उलटविण्यासाठी मोदींचा पुतीन यांना फोन
# अणुपुरवठादार गटात(एनएसजी) भारताला स्थान मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत असताना चीनचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून मोदींनी रशियाला साद घातली आहे. मोदींनी थेट रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांना फोन करून याबाबत चर्चा केल्याचे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे. एनएसजीमधील समावेशासाठी अमेरिकेचा पाठिंबा मिळाला असला तरी आशिया खंडातून चीन भारताच्या प्रयत्नांमध्ये अडथळा निर्माण करत आहे. भारताला आणखी एक वर्ष एनएसजीतील समावेशापासून दूर ठेवण्याचा चीनचा मानस आहे. चीनचा हा प्रयत्न उलथून पाडण्यासाठी मोदींनी थेट पुतीन यांना फोन करून सहकार्याची विनंती केल्याचे समजते. दरम्यान, मोदी आणि पुतीन यांच्यात झालेल्या चर्चेचे रशियन सरकारने निवेदन जाहीर केले असून, दोघांत द्विपक्षीय संबंधांना अधिक बळकटी येण्यासाठीची चर्चा झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दहशतवादी हल्ल्यात अमेरिकेत ५० ठार
# अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्याच्या कटू स्मृती विस्मरणात जात असतानाच रविवारी अमेरिका पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने हादरली. फ्लोरिडा राज्यातील ओरलँडो येथे एका आयसिससमर्थक तरुणाने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ५० जण ठार, तर ५३ जण जखमी झाले. ‘११ सप्टेंबर’च्या दहशतवादी हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा नरसंहार असल्याचे मानले जात आहे. अध्यक्ष बराक ओबामा यांनीही हा दहशतवादी हल्लाच असल्याचे सांगत या कटूप्रसंगी संपूर्ण अमेरिका ओरलँडोवासीयांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याची ग्वाही दिली. या घटनेनंतर व्हाइट हाऊसवरील अमेरिकी राष्ट्रध्वज अध्र्यावर उतरविण्यात आला आहे.

भारताला धोरणात्मक भागीदार करण्यास सिनेटमध्ये विधेयक
# अमेरिका व भारत यांना असलेले सुरक्षा धोके सारखेच असून भारताला महत्त्वाचा धोरणात्मक भागीदार करण्यासाठी एका वरिष्ठ रिपब्लिकन सिनेटरने एक विधेयक मांडले आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांनी जागतिक धोरणात्मक बाबींचा विचार करून भारताला महत्त्वाचे स्थान द्यावे, असे या विधेयकात म्हटले आहे. सिनेटच्या सशस्त्र सेवा समितीचे अध्यक्ष जॉन मॅक्केन यांनी नॅशनल डिफेन्स अ‍ॅथोरायझेशन अ‍ॅक्ट (एनडीएए) २०१७ हे सुधारणा विधेयक मांडले आहे. या ४६१८ व्या दुरूस्ती विधेयकात म्हटले आहे, की भारत व अमेरिका यांचे सुरक्षा धोके सारखे असून त्यांच्यात ठोस संरक्षण व धोरणात्मक भागीदारी असली पाहिजे. अमेरिका व भारत यांच्यातील संबंध गेल्या वीस वर्षांत वृद्धिंगत झाले असून त्यात दोन्ही देशांची भरभराट, लोकशाही मूल्ये, आर्थिक सहकार्य, प्रादेशिक शांतता व सुरक्षा तसेच स्थिरता यात मोठी प्रगती झाली आहे.

भारताला धोरणात्मक भागीदार करण्याचे विधेयक
# अमेरिका व भारत यांना असलेले सुरक्षा धोके सारखेच असून भारताला महत्त्वाचा धोरणात्मक भागीदार करण्यासाठी एका वरिष्ठ रिपब्लिकन सिनेटरने एक विधेयक मांडले आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांनी जागतिक धोरणात्मक बाबींचा विचार करून भारताला महत्त्वाचे स्थान द्यावे, असे या विधेयकात म्हटले आहे. सिनेटच्या सशस्त्र सेवा समितीचे अध्यक्ष जॉन मॅक्केन यांनी नॅशनल डिफेन्स अ‍ॅथोरायझेशन अ‍ॅक्ट (एनडीएए) 2017 हे सुधारणा विधेयक मांडले आहे. तसेच या 4618 व्या दुरूस्ती विधेयकात म्हटले आहे, की भारत व अमेरिका यांचे सुरक्षा धोके सारखे असून त्यांच्यात ठोस संरक्षण व धोरणात्मक भागीदारी असली पाहिजे. अमेरिका व भारत यांच्यातील संबंध गेल्या वीस वर्षांत वृद्धिंगत झाले असून त्यात दोन्ही देशांची भरभराट, लोकशाही मूल्ये, आर्थिक सहकार्य, प्रादेशिक शांतता व सुरक्षा तसेच स्थिरता यात मोठी प्रगती झाली आहे. भारताला जागतिक पातळीवर महत्त्वाच्या धोरणात्मक व संरक्षण भागीदाराचा दर्जा द्यावा, असे आवाहन या विधेयकात अध्यक्षांना करण्यात आले आहे. एनडीएए 2017 या विधेयकावर पुढील आठवडय़ात मतदान होण्याची शक्यता असून सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचे बहुमत आहे. भारताला प्रगत तंत्रज्ञान देणे, लष्करी नियोजन करणे, मानवतावादी मदत करणे, तस्करीविरोधात उपायोजना करणे यात सहकार्याची अपेक्षाही त्यात केली आहे.

राज्यसभा निवडणूक विजयी उमेदवारांची यादी
# सात राज्यांतील राज्यसभेच्या 27 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल (दि.11) जाहीर झाला. तसेच यामध्ये उत्तरप्रदेशमधून समाजवादी पक्षाचे 7 आणि बसपाचे दोन उमेदवार आणि भाजपचा एक उमेदवार विजयी झाला. काँग्रेस नेते कपिल सिब्बल हेदेखील बसपाच्या पाठिंब्यावर उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर निवडून आले आहेत. तर हरियाणातून भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा विजयी झाले. राजस्थानमध्ये भाजपने चारही जागांवर विजय मिळवला. भाजप नेते व्यंकय्या नायडू, ओम प्रकाश माथूर, हर्षवर्धन सिंग आणि रामकुमार वर्मा यांनी राजस्थानातून विजय मिळवला. तसेच राज्यसभेच्या 57 जागा रिकाम्या झाल्या होत्या. यापैकी 30 जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याने 27 जागांसाठी निवडणूक झाली होती.

क्रीडा

साईना नेहवालला ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद
# रिओ ऑलिम्पिकपूर्वी भारताची फुलराणी सायना नेहवालने ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिजचे विजेतेपद पटकावले. चीनच्या सुन यू हिला तीन गेमपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात पिछाडीवरून नमवताना सायनाने दुसऱ्यांदा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. जागतिक क्रमवारीत 12व्या स्थानी असलेल्या सुन यू हिने आक्रमक सुरुवात करताना पहिल्या गेममध्ये 21-11 अशी बाजी मारुन सायनावर दडपण आणले. मात्र, यानंतर झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना सायनाने आपला सर्व अनुभव पणास लावताना सलग दोन गेम जिंकत सुन यूला 11-21, 21-14, 21-19 असे नमवले. तसेच याआधी सायनाने उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या रेचानोक इंतानोन आणि उपांत्य सामन्यात 2011 व 2013 साली जागतिक विजेती ठरलेल्या चीनच्या यिहान वांगला पराभूत केले होते. विशेष म्हणजे, हे विजेतेपद यंदाच्या मोसमात सायनाचे पहिले विजेतेपद ठरले. तसेच याआधी 2014 साली या स्पर्धेत बाजी मारलेल्या सायनाला तब्बल वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर विजेतेपदासाठी थांबावे लागले. गतवर्षी दिल्लीला झालेल्या इंडिया सुपर सीरिजचे विजेतेपद पटकावल्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद सायनाने पटकावलेले पहिले विजेतेपद ठरले.

तिरंगी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा द. आफ्रिकेवर विजय
# सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचे शतक आणि गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीमुळे तिरंगी मालिकेत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर 36 धावांनी विजय मिळविला. सेंट किट्समधील मैदानावर (दि.11) रात्री झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 288 धावा केल्या होत्या. तसेच या आव्हानापुढे दक्षिण आफ्रिकेची स्थिती एकवेळ 3 बाद 210 अशी होती. मात्र, त्यानंतर अवघ्या 42 धावांतच त्यांचे बाकीचे खेळाडू बाद झाल्याने आफ्रिकेचा डाव 252 धावांत संपुष्टात आला आणि त्यांना 36 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. संथ खेळपट्टीवर वॉर्नरने संयमी फलंदाजी करत 157 चेंडूत शतक झळकाविले.

TAGGED:
Share This Article