Current Affairs 13 March 2020
स्पोर्ट्स : नीता अंबानी १० प्रभावी महिलांत
आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाच्या मालकीण आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. कारण जगातील सर्वोत्तम दहा प्रभावी महिलांमध्ये नीता अंबानी यांचा समावेश करण्यात आला आहे.
मुंबई इंडियन्स संघाची मालकी नीता यांच्याकडे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई इंडियन्सने दमदार कामगिरी केली आहे. त्याचबरोबर आयपीएलमध्ये सर्वाधिक जास्त जेतेपदे मुंबई इंडियन्सकडे आहेत. नीता अंबानी या फक्त क्रिकेटशी निगडीत आहेत असे नाही, तर फुटबॉलमध्येही जागतिक स्तरावर त्यांचे योगदान आहे. आता तर जगातील सर्वोत्तम दहा प्रभावी महिलांमध्ये नीता अंबानी यांचे नाव सामील करण्यात आले आहे.
सुनील जोशी BCCI च्या निवड समितीचे नवे अध्यक्ष
बीसीसीआयने सुनील जोशी यांची निवड समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. समितीमार्फत १ वर्षानंतर पॅनेलच्या कामगिरीचा आढावा घेण्यात घेईल.
१९९६ मध्ये जोशींनी वनडे आणि कसोटीत पदार्पण केले होते. बऱ्या कामगिरीनंतर देखील त्यांचा १९९९च्या वर्ल्ड कप संघात समावेश झाला नव्हता. २१ जून २०११ रोजी त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
बेंगळुरू येथे ११ वे बेंगळुरू इंडिया नॅनो परिषद व प्रदर्शन
बेंगळुरू येथे ११ वे बेंगळुरू इंडिया नॅनो परिषद व प्रदर्शन पार पडणार आहे. संबंधित संक्रमणास सामोरे जाण्यासाठी संशोधन कार्य सुरु करणे याचे हे उद्देश आहे.
आयोजन (संयुक्त विद्यमाने)
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, कर्नाटक सरकार
जवाहरलाल नेहरू प्रगत शास्त्रीय संशोधन केंद्र
अन्य सरकारी संस्था
कॉर्पोरेट कंपन्या