Uncategorized
Current Affairs 13 September 2019
चांद्रयान-2 : इस्रोला मिळाली नासाची साथ
- लक्ष्याच्या अगदी जवळ आल्यानंतर इस्रोचा विक्रम लँडरशी संपर्क तुटला होता. या चांद्रायन मोहिमेत इस्रोला नासाचीही साथ मिळाली आहे. विक्रम लँडरशी संपर्क साधण्यासाठी नासाने ‘हॅलो’ असा संदेश पाठवला आहे.
- नासाने आपल्या डीप स्पेस नेटवर्कद्वारे संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी इस्रोकडूनही परवानगी मिळाली आहे. विक्रमशी संपर्क प्रस्थापित करण्याच्या आशा कमी होत आहेत. 14 दिवसांनंतर चंद्रावर रात्र होईल.
- त्यावेळी विक्रम लँडरशी संपर्क प्रस्थापित करणं कठिण होईल, असंही सूत्रांकडून सांगण्यात आलं. कॅलिफोर्निया येथे असलेल्या डीएसएम स्टेशनवरून लँडरला रेडिओ फ्रिक्वेन्सी पाठवली असल्याची माहिती स्कॉट टिल्ले यांनी दिली. 2005 मध्ये स्कॉट टिल्ले यांनी नासाच्या एका हेरगिरी करणाऱ्या उपग्रहाचा शोध लावला होता. त्यानंतर ते प्रकाशझोतात आले होते. लँडरला सिग्नल पाठवल्यानंतर चंद्र रेडिओ रिफ्लेक्टरप्रमाणे काम करतो आणि तो सिग्नल पुन्हा पृथ्वीवर पाठवतो. 8,00,000 किलोमीटरच्या प्रवासानंतर तो सिग्नल डिटेक्ट करता येतो, असंही त्यांनी नमूद केलं
अमेरिकेच्या १६ प्रवर्गातील वस्तूंचे आयात शुल्क चीनकडून रद्द
- अमेरिका व चीन यांच्यातील व्यापार युद्ध चिघळत असतानाच चीनने अमेरिकेच्या १६ प्रवर्गातील उत्पादनांवरच्या आयात करात सूट देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पुढील महिन्यात दोन्ही देशात व्यापार चर्चा सुरू होणार असून त्याआधीच एक सकारात्मक निर्णय घेऊन अमेरिकेवर प्रभाव पाडण्याचा चीनचा प्रयत्न दिसून येत आहे.
- अमेरिकेने व्यापार युद्धात दणका दिल्याने चीनच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. चीन व अमेरिका यांच्यात गेले एक वर्षभर व्यापार युद्ध सुरू असून दोन्ही देशांनी एकमेकांच्या उत्पादनांवर आयात शुल्क वाढवले आहे. बुधवारी चीनने एकूण १६ प्रवर्गातील अमेरिकी वस्तूंवरचा आयात कर रद्द करण्याचा निर्णय घेतला असून तो १७ सप्टेंबरपासून लागू होणार आहे. अल्फाल्फा पेलेट, माशांचे खाद्य, वैद्यकीय लिनियर प्रवेगक, मोल्ड रिलीज एजंट या वस्तूंवरचा आयात कर रद्द करण्यात आला आहे. यात सोयाबीन, डुकराचे मांस यांचा समावेश मात्र केलेला नाही.
डीआरडीओकडून मॅन पोर्टेबल अॅन्टी टँक गाइडेड मिसाइलची यशस्वी चाचणी
- संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) ने बुधवारी आंध्र प्रदेशच्या कुर्नुलमधील फायरिंग रेंजवरून मॅन पोर्टेबल अॅन्टी टँक गाइडेड मिसाइलची यशस्वी चाचणी केली. क्षेपणास्र प्रणालीतील ही तिसरी यशस्वी चाचणी होती.
- याला भारतीय सेनेच्या तिसऱ्या पिढीच्या रणगाडा भेदी क्षेपणास्राच्या आवश्यकतेसाठी विकसित केले गेले जात आहे.
डीआरडीओने ही क्षेपणास्त्र प्रणाली विकसित केली आहे. या क्षेपणास्राचे वजन इतर क्षेपणास्त्रांच्या तुलनेने अतिशय कमी आहे. या क्षेपणास्राला मॅन पोर्टेबल ट्राइपॉड लाॅंचरद्वारे लाॅंच केले गेले होते. यानंतर त्याने त्याचे लक्ष्य अत्यंत अचुकतेने व आक्रमकतेने भेदले.
९ महिला खेळाडूंची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस
- भारतीय क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिला खेळाडूच्या नावाची, देशातील दुसऱ्या सर्वोच्च मानाच्या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने सहा वेळा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी बॉक्सर मेरी कोमचं नाव पद्मविभूषण पुरस्कारासाठी सुचवलं आहे. याआधी मेरी कोमला २०१३ साली पद्मभूषण तर २०१६ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इतर पद्म पुरस्कारांसाठीही क्रीडा मंत्रालयाने यंदा महिला खेळाडूंचं नावच पुढे केलं आहे.
- जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेचं जेतेपद पटकावणाऱ्या पी.व्ही.सिंधूला पद्मभूषण तर कुस्तीपटू विनेश फोगट, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर आणि हॉकीपटू राणी रामपाल, नेमबाजपटू सुमा शिरुर, टेबल टेनिसस्टार मनिका बत्रा आणि ताशी-नुंगशी या जुळ्या बहिणींचं नाव पद्मश्री पुरस्कारासाठी सुचवण्यात आलं आहे. २०१७ साली पी.व्ही.सिंधूचं नाव पद्मभूषण पुरस्कारासाठी सुचवण्यात आलं होतं, मात्र अंतिम यादीत तिला स्थान मिळू शकलं नाही. २०१५ साली सिंधूला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
- आतापर्यंत ३ क्रीडापटूंना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. विश्वनाथन आनंद, सचिन तेंडुलकर आणि सर एडमंड हिलरी यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.