Uncategorized
चालू घडामोडी : १४ ऑगस्ट २०२०
Current Affairs : 14 August 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहणारे ठरले
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिवंगत माजी पंतप्रधान अजट बिहारी वाजपेयी यांचा विक्रम मोडला.
- मोदी हे सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहणारे काँग्रेस पक्षाबाहेरील नेता ठरले आहेत. तर सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहणाऱ्यांच्या यादीमध्ये मोदींनी चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे.
- माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या सर्व कार्यकाळामध्ये एकूण दोन हजार २६८ दिवस पंतप्रधानपद भूषवलं होतं.
- सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणाऱ्या नेत्यांच्या यादीमध्ये पहिली तिन्ही नावं ही काँग्रेसच्या नेत्यांचीच आहेत.
- यामध्ये पहिल्या क्रमांकावर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु आहेत.
- त्यानंतर या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी इंदिरा गांधी आणि तिसऱ्या स्थानी मनमोहन सिंह यांचा क्रमांक आहे.
- तर काँग्रेसमध्ये नसलेले पण पंतप्रधान पदाचा कार्यकाळपूर्ण करु न शकलेल्या नेत्यांमध्ये मोरारजी देसाई, चरण सिंग, व्हि. पी. सिंग, चंद्र शेखर, एच. डी. देवेगौडा आणि इंदर कुमार गुजराल यांचा समावेश होतो.
जुलैमध्ये महागाई वाढली; सरकारची आकडेवारी जाहीर
- अन्नधान्याच्या किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे जुलै महिन्यामध्ये किरकोळ किमतीवर आधारित चलनवाढीच्या दरामध्ये वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे ग्राहक मूल्य निर्देशांकावर आधारित अन्नधान्याची चलनवाढही ९.६२ टक्क्यांवर पोहोचली आहे.
- जुलै महिन्यामध्ये देशातील ग्राहक मूल्य निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर ६.९३ टक्क्यांवर पोहोचल्याचे सरकारतर्फे जाहीर करण्यात आले आहे.
- जून महिन्यामध्ये हा दर ६.२३ टक्के होता. त्यामध्ये मोठी वाढ झाली आहे.
- देशातील अन्नधान्याच्या किमतींमध्ये झालेल्या मोठ्या वाढीमुळे चलनवाढीच्या दरामध्ये वाढ होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
- जून महिन्यामध्ये अन्नधान्याची चलनवाढ ८.७२ टक्क्यांवर होती, ती आता ९.६२ टक्क्यांवर पोहोचली आहे.
- केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्यामध्ये मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये चलनवाढीचा दर चार टक्के राखण्याचा संकल्प जाहीर केला होता. यामध्ये दोन टक्क्यांपर्यंत वाढ वा घट होण्याची अपेक्षाही वर्तविण्यात आली होती.
ब्रिटनची अर्थव्यवस्था २०.४ टक्क्यांनी घसरली
- कोरोना लॉकडाऊनमुळे ब्रिटनमध्ये एप्रिल ते जून या तिमाहीत अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असून, देशात अधिकृतरीत्या मंदीची स्थिती निर्माण झाली आहे.
- या वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत अर्थव्यवस्था २०.४ टक्क्यांनी घसरली आहे. दुकाने बंद राहिल्यामुळे घरगुती खर्च घसरला आहे. त्यामुळे कारखाना उत्पादन आणि बांधकामात मोठी घसरण झाली आहे.
- या सर्वांचा परिणाम म्हणून ब्रिटनमध्ये २००९ नंतर पहिल्यांदाच ‘तांत्रिक मंदी’ (टेक्निकल रेसेशन) आली आहे. सलग दोन तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादनात घसरण झाल्यास ‘तांत्रिक मंदी’ आल्याचे मानले जाते.
- ‘आॅफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्स’ने (ओएनएस) म्हटले की, सरकारने निर्बंध उठविण्यास सुरुवात केल्यानंतर जूनमध्ये अर्थव्यवस्था सुधारली आहे. मासिक आधारावर अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर ८.७ टक्क्यांवर आला. मेमध्ये तो १.८ टक्क्यांवर होता.
- राष्ट्रीय सांख्यिकी विभागाचे उपप्रमुख जोनाथन अॅथो यांनी सांगितले की, सुधारणा दिसत असली तरी फेब्रुवारीच्या तुलनेत जूनमध्ये जीडीपी एकषष्ठांशच आहे. दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरन्ट्स, शाळा आणि कार दुरुस्ती केंद्रे बंद राहिल्याने उत्पादन ठप्प झाले आहे. अर्थव्यवस्थेत चारपंचमांश वाटा असलेल्या सेवा क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे. कार उत्पादन १९५४ नंतर नीचांकी पातळीवर घसरले आहे.
‘नया श्रीनगर’ आणि ‘नया जम्मू’ या प्रकल्पांची घोषणा करण्याची शक्यता
- जम्मू व काश्मीर राज्याचा विशेष दर्जा काढून घेतल्याच्या एका वर्षांनंतरही या ठिकाणी वास्तविक विकास नजरेला पडत नसल्याची टीका होत असताना, ‘नया श्रीनगर’ आणि ‘नया जम्मू’ या हायटेक आणि पर्यावरणपूरक शहरांसह महत्त्वाच्या प्रकल्पांची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करण्याची शक्यता आहे.
- या प्रकल्पांच्या अंतिम आराखडय़ावर केंद्रीय नगरविकास मंत्रालय आणि जम्मू- काश्मीर प्रशासन हे संयुक्तपणे काम करत असून, पंतप्रधान वैयक्तिकरीत्या त्यावर देखरेख करत आहेत.
- एका आठवडय़ापूर्वीच केंद्र सरकारने माजी केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते मनोज सिन्हा यांची जम्मू- काश्मीरचे नायब राज्यपाल म्हणून नेमणूक केली आहे.
Current affairs