Current Affairs 14 February 2018
1) बुलेट ट्रेनचे देशातील ७ शहरांमध्ये ४ हजार १०० किमीचे जाळे
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या घोषणेनंतर देशात बुलेट ट्रेनच्या हालचालींना वेग आला आहे. ७ शहरांमध्येदेखील बुलेट कॉरिडोर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात मुंबई-पुणे बुलेट ट्रेनचाही समावेश आहे. वेगवान प्रवासासाठी ओळखल्या जाणा-या बुलेट ट्रेनचे, देशभरात ४ हजार १०० किमी लांबीचे जाळे उभारण्याचा निर्णय नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने घेतल्याची माहिती कॉर्पोरेशनच्या (एनएचसीएल) सूत्रांनी दिली. देशभरात ४ हजार १०० किमी लांबीचे बुलेट ट्रेनचे जाळे उभारण्याचे नियोजन आहे. यात छोटे कॉरिडोर ५ वर्षांत उभे करण्याचे लक्ष्य आहे. याची अंदाजे किंमत निश्चित केलेली नाही. दिल्ली-पटणा, हावडा-कोलकाता, हैदराबाद-चेन्नई, चेन्नई-बंगळुरू-तिरुवनंतपुरम व दिल्ली-जयपूर-जोधपूर या बुलेट ट्रेन प्रकल्पांचा यात समावेश आहे.
२) राज्याचे ११ प्रकल्प केंद्राकडून मंजूर
नरेंद्र मोदी सरकारने तीन वर्षांत महाराष्ट्रातील ११ महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. रस्तेबांधणी, रेल्वे, पोलाद, ऊर्जा, कोळसा, नदीखोरे, पायाभूत सुविधा या क्षेत्रांशी संबंधित ६८ महत्त्वाच्या प्रकल्पांना गेल्या १० वर्षांपासून केंद्रीय पर्यावरण व वन खात्याने मंजुरीच दिलेली नव्हती. त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे ११ प्रकल्प महाराष्ट्रातील होते. त्या खालोखाल गुजरात (८), आंध्र प्रदेश (७), तेलंगणा (५) व अन्य राज्यांतील प्रकल्पांचा समावेश होता.
@MMCurrentAffairs स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा.
हे आहेत प्रकल्प –
१) राष्ट्रीय महामार्ग-२११वरील येडशी ते औरंगाबाद दुपदरी रस्त्याचे चौपदरी २) जेएनपीटी बंदरातील रेल्वेमार्ग दुहेरी करणे ३) एमएमआरडीएच्या मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंकला सीआरझेड परवानगी ४) डीएमआसीद्वारे औरंगाबाद जिल्ह्यात बिडकीन औद्योगिक वसाहत प्रकल्प ५) मुंबईत महमद अली रोडवर बुºहाणी उन्नयन प्रकल्पाचा पुनर्विकास ६) नवीन बांधकाम प्रकल्प व औद्योगिक वसाहतींचा विकास ७) आॅटोलाइन इंडस्ट्रियल पार्क्सतर्फे उभारण्यात येणारे विशेष टाउनशिप प्रकल्प ८) शिरपूर येथील उपसा जलसिंचन प्रकल्प व नदीवरील जलविद्युत प्रकल्प ९) जेएसडब्ल्यू स्टीलच्या एकात्मिक पोलाद प्रकल्पाची क्षमता ५ एमटीपीएवरून १० एमटीपीए वाढविणे, तसेच ऊर्जा प्रकल्पाची क्षमता ३०० मेगावॅटवरून ६०० मेगावॅट करणे १०) उत्तम स्टील अँड पॉवर लिमिटेडतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा गावात उभारायच्या पोलाद प्रकल्पाची क्षमता ३ एमटीपीएपर्यंत वाढविणे ११) सन फ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीच्या पोलाद प्रकल्पाचा विस्तार.
३) दिल्लीत होणार थिएटर आॅलिम्पिक्स
नवी दिल्लीत १७ फेब्रुवारीपासून सुरू होणा-या ‘थिएटर आॅलिंपिक्स’द्वारे भारतीय प्रेक्षकांना जागतिक नाटक पाहायला मिळणार आहे. भारत प्रथमच ‘थिएटर आॅलिंपिक्स’चे यजमानपद भूषवित आहे. हे आठवे थिएटर आॅलिंपिक्स असून ३० देशांतून येणारे २५ हजारांहून अधिक कलाकार, देशातील सतरा शहरांमध्ये होणारे नाटकांचे ४५० प्रयोग, ६०० अँबियन्स परफॉर्मन्सेस, २५० यूथ फोरम अशा कार्यक्रमांची पर्वणी रसिकांना यानिमित्ताने मिळणार आहे. ‘फ्लॅग आॅफ फ्रेंडशिप’ अशी या ‘थिएटर आॅलिंपिक्स’ची संकल्पना आहे. १९९३ साली पहिल्यांदा थिएटर आॅलिंपिक्सचे आयोजन करण्यात आले होते. जगभरातील नाटककारांना वैचारिक-सांस्कृतिक आदानप्रदानासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचा उद्देश यामागे आहे. जपान, रशिया, तुर्कस्तान, दक्षिण कोरिया, चीन, पोलंड येथे याआधी थिएटर आॅलिंपिक्स झाली होती.
४) सिलिकॉन व्हॅलीत ५ वी ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय स्तराचा कठीण अभ्यासक्रम
सिलिकॉन व्हॅलीतील एक शाळा भविष्यातील झुकेरबर्ग व मस्क घडवण्याच्या तयारीत गुंतली आहे. येथील ५ वी ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय स्तराचा आणखी कठीण अभ्यासक्रम तयार केला आहे. उद्यमशीलतेचे गुण विकसित करणे हा त्यामागचा उद्देश आहे. बेसिस इंडिपेंडंट सिलिकॉन व्हॅली(बीआयएसव्ही) स्कूलची संकल्पना अमेरिकी दांपत्य मायकेल व ओल्गा ब्लॉक यांची आहे. २०१८ च्या राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती कार्यक्रमासाठी शाळेचे २१ विद्यार्थी पात्र झाले आहेत. त्यांना २०० कोटींची शिष्यवृत्ती मिळेल.
स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी जानेवारी २०१८ मासिक मोफत डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा.
MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.