Current Affairs 14 January 2020
महागाईचा पाच वर्षातला उच्चांकी दर
डिसेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर हा ७.३५ टक्के इतका नोंदवला गेला आहे. गेल्या पाच वर्षांमधला हा सर्वात उच्चांकी दर आहे. याआधी जुलै २०१४ या महिन्यात महागाईचा दर ७.३९ टक्क्यांवर पोहचला होता. त्यानंतर आता डिसेंबर महिन्यात म्हणजेच मागच्या महिन्यात हा दर ७.३५ टक्के इतका नोंदवला गेला आहे. २०१९ च्या नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर ५.५४ टक्के होता. तर २०१८ च्या डिसेंबर महिन्यात हा दर २.११ टक्के इतकाच होता. मात्र सरकारच्या सांख्यिकी विभागाकडून समोर आलेल्या आकड्यांनुसार गेल्या पाच वर्षांतला उच्चांकी दर महागाईने डिसेंबर महिन्यात गाठला आहे.
इंधन दराने डिसेंबर महिन्यात काहीसा दिलासा दिला. आता केंद्र सरकारने सोमवारी महागाईची आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीमध्ये डिसेंबर महिन्यातला किरकोळ महागाई दर ७.३५ टक्के इतका पोहचला आहे. पाच वर्षांमधला हा सर्वात उच्चांकी दर आहे. डिसेंबर महिन्यात कांदाही १२५ ते १५० रुपये प्रति किलो गेला होता. अवकाळी पावसाच्या अस्मानी संकाटामुळे शेतीचं नुकसान झालं होतं. भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने किंमती वाढल्या होत्या.
महत्त्वाचे मुद्दे
डिसेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर ७.३५ टक्के नोंदवला गेला
नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर ५.५४ टक्के होता
डिसेंबर २०१८ या महिन्यात किरकोळ महगाईचा दर २.११ टक्के इतका नोंदवला गेला
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार डिसेंबर महिन्यात महागाई दर ७.३५ टक्क्यांवर पोहचला आहे. नोव्हेंबरच्या तुलनेत त्यामध्ये वाढ झाली आहे. डिसेंबर महिन्यात कांदा १५० रुपये प्रति किलो पर्यंत महागला होता. सध्याच्या घडीला कांद्याचे दर ७० रुपये प्रति किलोपर्यंत खाली उतरले आहेत. भाजीपाल्याच्या किंमतीही आता कमी झाल्या आहेत.
चंद्रपुरात देशातील पहिलेच जागतिक दर्जाचे बॉटनिकल गार्डन
काेळसा खाणींची माेठी साधनसंपत्ती चंद्रपूर जिल्ह्याला लाभली अाहे. निसर्गाच्या याच दैवी देणगीमुळे चंद्रपूरला देशाच्या नकाशावर माेठी अाेळख अाहे. याशिवाय हिरव्यागार वनराईने नटलेल्या ताडाेबासारख्या प्रसिद्ध अभयारण्यानेही अाता चंद्रपूर जिल्ह्याला नवीन अाेळख मिळवून दिली.
जागतिक दर्जाच्या बाॅटनिकल गार्डनमुळे अाता याच नक्षलग्रस्त समजल्या जाणाऱ्या विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा राेवला जात अाहे. चंद्रपूर शहरापासून अवघ्या १५ किमी अंतरावरील विसापूर गावानजीक जागतिक दर्जाचे बॉटनिकल गार्डन उभारले जात आहे. तब्बल ९५ कोटींचे बजेट असलेल्या या गार्डनमध्ये अत्याधुनिक सुविधांच्या १० इमारती तयार करण्यात येणार आहेत. या बॉटनिकल गार्डनमध्ये अत्याधुनिक मत्स्यालय, सायन्स सेंटर, फुलपाखरू उद्यान, अॅक्वास्केपचा समावेश आहे.
ताडोबाच्या जंगलाची सफारी करणाऱ्या तमाम पर्यटकांसाठी ही बॉटनिकल गार्डन मोठी पर्वणी ठरणार आहे. अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असलेले हे देशातील पहिलेच बॉटनिकल गार्डन ठरत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूरनजीक ३५ एकरांवर हा भव्य प्रकल्प तयार होत आहे. येत्या मार्चपर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्णत्वास येईल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
स्पॅनिश सुपरकप : रिअल माद्रिदने ११ व्यांदा जिंकला कप
रिअल माद्रिदने स्पॅनिश सुपरकपचा बहुमान पटकावला. या क्लबने ११ व्यांदा या ट्राॅफीवर नाव काेरले. यासह रिअल माद्रिद हा सर्वाधिक यशस्वी असा दुसरा क्लब ठरला अाहे. रिअल माद्रिदने फायनलमध्ये रविवारी अॅथलेटिकाे माद्रिदचा पराभव केला. माद्रिदने ४-१ अशा फरकाने शूटअाऊटमध्ये विजयाची नाेंद केली. निर्धारित वेळेपर्यंत ही रंगतदार लढत शून्य गाेलने बराेबरीत राहिली हाेती. टीमने १६ व्यांदा फायनल गाठली हाेती.
अॅथलेटिकाे माद्रिदने पाचव्यांदा फायनलमध्ये पराभवाचा सामना केला. टीमने दाेन वेळा किताबाचा बहुमान पटकावला अाहे. फायनलमध्ये ९० मिनिटांपर्यंतचा सामना शून्य गाेलने बराेबरीत राहिला हाेता. त्यामुळे प्रत्येकी १५ मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात अाला हाेता. मात्र, तरीही दाेन्ही संघ गाेल करण्यात अपयशी ठरले.
जगातील सर्वात मोठा रेडिओ टेलिस्कोप सुरू
चीनमध्ये जगातील सर्वांत मोठा आणि संवेदनशील रेडिओ टेलिस्कोप सुरू करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे या टेलिस्कोपची चाचणीच तीन वर्षे घेण्यात येत होती. तर हा टेलिस्कोप बनविण्यासाठी चीनला तब्बल 20 वर्षे लागली. हा टेलिस्कोप जगभरातील खगोल शास्त्रज्ञांसाठी खुला करण्यात आला आहे.
चीनमध्ये एवढी प्रगत टेक्नॉलॉजी आहे की, हजारो किमी लांबीचे रस्ते आणि गगनचुंबी इमारती बांधण्यासाठी काही महिनेच लागतात. मात्र, या टेलिस्कोप निर्मितीच्या कामाने चीनला मोठा वेळ खर्ची घालावा लागला आहे. हा टेलिस्कोप गुईझोऊ प्रांतामध्ये बांधण्यात आला आहे. 2016 पासून याची चाचणीच घेण्यात येत होती.
हा टेलिस्कोप प्युर्टोरिकाच्या अरेसिबो ऑब्झर्व्हेटरीपेक्षा 2.5 पटींनी संवेदनशील आहे. प्युर्टोरिकास्थित ऑब्झर्व्हेटरीमध्ये जगातील दुसरा मोठा सिंगल डिश रेडिओ टेलिस्कोप कार्यरत आहे. याचा वापर अंतराळात दूरवर जीवजंतूंचा शोध आणि एलियन्सचा शोध घेण्यासाठी करण्याच येतो. चीनचा टेलिस्कोप एका सेकंदात 28 जीबी माहिती गोळा करण्यात सक्षम आहे. यामुळे त्याला फाईव्ह हंड्रेड मीटर अपार्चर स्पेरिकल रेडिओ टेलिस्कोप (फास्ट) असे नाव देण्यात आले आहे. फास्टची अंतराळातील रेंज चार पटींनी जास्त आहे.
‘नासा’च्या चंद्र, मंगळावरील स्वारीत भारतीय वंशाचे कर्नल राजा चारी
अमेरिकेच्या हवाई दलातील भारतीय वंशाचे कर्नल राजा जॉन वुरपुतुर चारी (४१) यांची नासाच्या आगामी चंद्र, मंगळ मोहिमेसाठी निवड झाली आहे. २०२० मधील या मोहिमेसाठी नासाने ११ नव्या अंतराळवीरांची निवड जवळपास निश्चित केली आहे.
नासाच्या या ११ नव्या अंतराळवीरांनी दोन वर्षांपेक्षा अधिक काळाचे अंतराळ यात्री प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आहे. नासाने आपल्या ‘आर्टेमिस’ कार्यक्रमाची घोषणा केल्यानंतर २०१७ मध्ये या यशस्वी अंतराळयात्रींना १८ हजार अर्जदारांमधून निवडले होते. यात चारी यांचाही समावेश होता. येथे एका कार्यक्रमात प्रत्येक अंतराळवीरांना परंपरेने दिली जाणारी चांदीची पीन देण्यात आली.
नासाचे प्रशासक जिम ब्रिडेंस्टाइनने ह्यूस्टनमध्ये बोलताना सांगितले की, २०२० मध्ये अमेरिका अंतराळयात्रींना अंतराळात पाठविणे पुन्हा सुरुवात करणार आहे. आमच्या प्रगतीचे हे एक महत्त्वाचे वर्ष असेल. अंतराळयात्री जेव्हा आपला अंतराळ प्रवास पूर्ण करतील तेव्हा त्यांना सोन्याची एक पीन देण्यात येईल. नव्या अंतराळवीरांना आयएसएस, चंद्र आणि मंगळ मोहिमांवर पाठविले जाऊ शकते. नासाच्या नियोजनानुसार महिला अंतराळयात्रीला २०२४ पर्यंत चंद्रावर पाठविण्याचा विचार आहे. चारी हे अमेरिकी हवाई दलात कर्नल आहेत.