Current Affairs 14 June 2020
आता भारत-जपान मिळून चंद्रावर जाणार, जाक्साने जाहीर केला कार्यक्रम
- भारत आणि जपान सध्या करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहेत. पण भविष्यात हे दोन्ही देश चंद्र मोहिमेसाठी एकत्र येणार आहेत. दोन्ही देशांनी एकत्र येऊन चंद्रयान मोहिमेची योजना आखली आहे. या मोहिमेतंर्गत लँडर आणि रोव्हर चंद्रावर उतरवण्याचे उद्दिष्टय आहे. जपानची अवकाश संशोधन संस्था जाक्साने ही माहिती दिली आहे.
- मागच्यावर्षी चांद्रयान-२ मोहिमेत भारताला फक्त लँडिंगमध्ये अपयश आले होते. विक्रम लँडरचे चंद्रावर हार्ड लँडिंग झाले होते. ते अपयश मागे सोडून भारत आता जपानच्या साथीने पुन्हा चंद्रावर झेप घेणार आहे. भारत आणि जपानची ही संयुक्त चंद्र मोहिम २०२३ नंतर पार पडणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
- भारताने सध्या ‘मिशन गगनयान’ या मानवी अवकाश मोहिमेकडे लक्ष केंद्रीत केले आहे. २०२२ मध्ये भारतीय अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्याची योजना आहे. लँडिंग मॉडयुल आणि रोव्हरची निर्मिती जाक्सा करेल तर इस्रो लँडरची सिस्टिम बनवेल. जपानमधून या यानाचे उड्डाण होणार असून एच ३ रॉकेटमधून हे यान चंद्राच्या दिशेने झेपावेल. सर्वप्रथम २०१७ साली या मिशनबद्दल जाहीरपणे विचार व्यक्त करण्यात आला होता. पंतप्रधान मोदी २०१८ मध्ये जपान दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी सुद्धा यावर चर्चा झाली.
अमेरिकी लष्करात ‘शीख’र
- वॉशिंग्टनअमेरिकेतील सशस्त्र दलात शीख समाजाने नवे शिखर गाठले आहे. महिला सेकंड लेफ्टनंट अनमोल नारंग देशातील प्रतिष्ठित यूएस मिलिटरी अॅकॅडमीतून पदवी मिळवणार असून, हा पल्ला गाठणाऱ्या शीख समाजातील त्या पहिल्या व्यक्ती ठरणार आहेत.
- आता नारंग या लॉटन, ओक्लाहामा येथील फोर्ट सिल संस्थेतून बेसिक ऑफिसर लीडरशिप कोर्स पूर्ण करणार असून, त्यानंतर त्यांना जपानमधील ओकिनावा येथे जानेवारी, २०२१मध्ये पहिली नियुक्ती मिळणार आहे.
- जॉर्जियातील रोझवेल येथे जन्मलेल्या अनमोल या भारतातून अमेरिकेत स्थायिक झालेल्या नारंग कुटुंबातील दुसऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व करतात. अनमोल यांच्या आईचे वडील भारतीय लष्करात होते. त्यामुळे बालपणापासूनच त्यांना लष्करी करिअरची आवड होती. एकदा त्यांनी सहकुटुंब होनोलुलु-हवाई येथील पर्ल हार्बर राष्ट्रीय स्मृतिस्थळाला भेट दिली होती. त्यानंतर लष्करातच सेवा करण्याचा निर्धार त्यांनी केला.
- जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून त्यांनी एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रमही पूर्ण केला. त्यानंतर वेस्ट पॉइंटच्या लष्करी विद्यापीठात त्यांनी न्यूक्लीअर इंजिनीअरिंग या शाखेतून पदवी घेतली. सन १९८७मध्ये अमेरिकन काँग्रेसने एक कायदा संमत करून लष्करी सेवेत कोणत्याही धार्मिक रिती तसेच धार्मिक निष्ठा व्यक्त करणारी वेशभूषा अथवा वस्तू बाळगण्यास मनाई केली.
- शीखधर्मीय जवानांना यामुळे गेली ३० वर्षे दाढी तसेच कडे व पगडी ठेवता येत नसे. त्याविरुद्धचा लढा अलीकडेच यशस्वी झाला असतानाच, आता शीख महिलेनेही नवे क्षितिज गाठले आहे.
क्रिकेटपटू वसंत रायजी यांचं निधन :
- भारताचे सर्वात वयस्कर माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू वसंत रायजी यांचं शनिवार सकाळी निधन झाले. ते 100 वर्षांचे होते.
- तर 1940 च्या दशकात ते एकूण 9 रणजी सामने खेळले होते. तसंच त्यांनी 9 रणजी सामन्यांमध्ये एकूण 277 धावा केल्या.
- तसेच किक्रेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रायजी यांनी लेखन केलं. व्यवसायानं ते चार्टर्ड अकाऊंटंट होते.