देश
‘अग्नी-१’ ची यशस्वी चाचणी
भारताच्या अग्नी-१ या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची उपयोजित चाचणी सोमवारी यशस्वीरित्या पार पडली. चलत प्रक्षेपकाच्या मदतीने ओडिशातील एकात्मिक चाचणी क्षेत्राच्या संकुल चार येथून क्षेपणास्त्राचे उड्डाण करण्यात आले. जमिनीवरून मारा करण्यात येणारे हे क्षेपणास्त्र ७०० किलोमीटर अंतरापर्यंत लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकते. या क्षेपणास्त्रात केवळ ९ मिनिट ३६ सेकंद इतक्या वेळेत हे क्षेपणास्त्र ७०० किलोमीटरचे अंतर पार करण्याची क्षमता आहे. लक्ष्य शोधण्यासाठी या क्षेपणास्त्रात प्रगत दिशादर्शन प्रणालीचा वापर केलेला आहे. स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडने या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली असून क्षेपणास्त्राच्या साठय़ातून कुठलेही क्षेपणास्त्र निवडून त्याची चाचणी केली जाते. यापूर्वी २७ नोव्हेंबर २०१५ रोजी अग्नी-१ क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली होती.Current Affairs – 14 March 2016
नाव – अग्नी १
वजन – १२ टन
लांबी – १५ मीटर
क्षमता – १००० किलो वजन वाहून नेण्याची
विकासक – डीआरडीओ
माहिती अधिकारात लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास मंत्री बांधील
केंद्र व राज्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री हे सार्वजनिक अधिकारीच असून ते माहिती अधिकार कायद्यानुसार जनतेच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास बांधील आहेत, असे मत केंद्रीय माहिती आयोगाने व्यक्त केले आहे. मंत्री हे जनतेला उत्तरे देण्यास बांधील आहेत व लोक माहिती अधिकारात अर्ज करून थेट मंत्र्यांकडून उत्तरे मिळवण्याची अपेक्षा ठेवत असतील तर ते योग्यच आहे. मंत्र्यांच्या कार्यालयातील लोकमाहिती अधिकाऱ्याने संबंधित प्रश्नांची उत्तरे मंत्र्यांच्या वतीने देणे गरजेचे आहे, असे आयोगाने स्पष्ट केले.Current Affairs in Marathi
विज्ञान
प्राण्यांच्या पेशींपासून मांसनिर्मितीचा प्रयोग यशस्वी
भारतीय वंशाचे अमेरिकी वैज्ञानिक उमा एल व्हॅलेटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी अमेरिकेत प्राण्यांच्या पेशींपासून भेसळमुक्त मांस प्रयोगशाळेत तयार केले असून त्यामुळे प्राण्यांची मोठय़ा प्रमाणावर होणारी कत्तल थांबू शकते. मायो क्लिनिकमध्ये शिक्षण घेतलेले हृदयरोगतज्ज्ञ व्हॅलेटी हे मिनेसोटा विद्यापीठात वैद्यकशास्त्राचे सहायक प्राध्यापक आहेत. निकोल गेनोव्हेस हे मूळपेशी जैवशास्त्रज्ञ, विल क्लेम नावाचे जैववैद्यक अभियंता व व्हॅलेटी यांनी मांस निर्मितीसाठी मेमफीस मीटसची स्थापन केली. chalu ghadamodi
क्रीडा
ट्वेन्टी-२० विश्वकरंडक
ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत नीचांकी धावसंख्या करण्याचा विक्रम नेदरलॅंडच्या नावावर आहे. गतस्पर्धेत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्यांचा डाव १०.३ षटकांत ३९ धावांत संपुष्टात आला होता. ट्वेंटी-२० विश्वकरंडक स्पर्धेत सर्वाधिक स्फोटक फलंदाज म्हणून समजला जाणाऱ्या पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदी आणि श्रीलंकेच्या दिल्शानच्या नावावर सर्वात जास्त भोपळे (५ वेळ) फोडण्याचाही विक्रम आहे. एकाच स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम विराट कोहलीने केलेला आहे. त्याने गतस्पर्धेत सहा सामन्यांत ३१९ धावा केल्या होत्या.chalu ghadamodi maharashtra
महाराष्ट्र
राज्याच्या सर्वच मनपा क्षेत्रांसाठी आता स्वतंत्र अतिरिक्त तहसीलदार
राज्यातील महापालिका क्षेत्रांमध्ये वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन सर्वच महापालिका क्षेत्रांत स्वतंत्र अतिरिक्त तहसीलदार नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या बुधवापर्यंत (दि. १६) या बाबत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश सर्व विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत. महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळावर काम करताना बहुतांश तहसीलदारांची दमछाक होत आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली आणि औरंगाबाद येथील तहसील कार्यालयावरील ताण लक्षात घेऊन अलीकडेच अतिरिक्त तहसीलदाराचे स्वतंत्र कार्यालय स्थापन करण्यात आले. chalu ghadamodi 2016
(न्यूज सोर्स – दैनिक लोकसत्ता)