⁠  ⁠

Current Affairs – 14 September 2018

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 2 Min Read
2 Min Read

न्या. रंजन गोगोई सुप्रीम कोर्टाचे नवे सरन्यायाधीश

  • सुप्रीम कोर्टचे न्या. रंजन गोगोई हे आता नवे सरन्यायाधीश (CJI) असणार आहेत. राष्ट्रपतींनी सुप्रीम कोर्टाचे नवे सरन्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे. ३ ऑक्टोबरला रंजन गोगोई सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील.
  • सरन्यायाधीश दीपक मिश्रा हे २ ऑक्टोबरला सेवानिवृत्त होत आहेत. दीपक मिश्रा यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून रंजन गोगोई यांचे नाव केंद्र सरकारला पाठवले होते. ज्यावर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केले आहे.
  • रंजन गोगोईंच्या निमित्ताने पहिल्यांदाच ईशान्य भारतातील व्यक्ती सरन्यायाधीशपदी नियुक्त होते आहे. सर्वोच्च न्यायालयतील ज्येष्ठता क्रम लक्षात घेता न्या. मिश्रा यांच्यानंतर रंजन गोगोई हे दुसऱ्या स्थानी आहेत. सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायमूर्तींना सरन्यायाधीश पदाची जबाबदारी दिली जाते.
  • न्या. रंजन गोगोई हे २००१ मध्ये गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले होते. त्यानंतर फेब्रुवारी २०११ मध्ये ते पंजाब-हरयाणा हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश होते. एप्रिल २०१२ त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदाची जबाबदारी स्वीकारली. आता त्यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी करण्यात आली आहे.

telegram ad 728

कुमारांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्ण

  • उदयवीर सिंगच्या ‘लक्ष्यवेधी’ कामगिरीच्या बळावर जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेतील कुमारांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात गुरुवारी भारताच्या खात्यावर वैयक्तिक आणि सांघिक सुवर्णपदकाची भर पडली.
  • उदयवीरने वैयक्तिक प्रकारात ५८७ गुण (प्रीसिजनमध्ये २९१ आणि रॅपिडमध्ये २९६) मिळवून सुवर्णपदक पटकावले. अमेरिकेच्या हेन्री लेव्हेरेटला (५८४ गुण) रौप्य आणि कोरियाच्या ली जाईक्योनला (५८२ गुण) कांस्यपदक मिळाले. भारताच्या विजयवीर सिधूला ५८१ गुणांसह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले, तर राजकन्वर सिंग संधूला (५६८ गुण) २०वा क्रमांक मिळाला.
  • भारताच्या तीन स्पर्धकांची गुणसंख्या १७३६ झाल्यामुळे सांघिक सुवर्णपदकावरही नाव कोरता आले. चीनला (१७३० गुण) रौप्यपदक आणि कोरियाला (१७२१ गुण) कांस्यपदक मिळाले.
  • आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाच्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारताने ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी साकारली आहे. या प्रतिष्ठेच्या पात्रता स्पर्धेतून भारताने आतापर्यंत टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील दोन स्थाने निश्चित केली आहेत.

add header new

नियमित अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC

टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा – Mission MPSC Telegram Channel

Share This Article